ETV Bharat / state

कल्याणामध्ये ३ ठिकाणी आढळले विषारी घोणस, नागरिकांमध्ये भीती

author img

By

Published : Jan 26, 2020, 8:21 PM IST

कल्याण शहरातील ३ वेगवेगळ्या ठिकाणी शनिवारी रात्रीच्या सुमारास ३ विषारी घोणस साप आढळून आले. यावेळी सर्पमित्रांनी वेळीच पोहचून सापांना पकडले त्यामुळे नागिरकांनी सुटकेचा श्वास सुटकेचा निश्वास घेतला. मात्र, गेल्या ४ महिन्यांपासून येथे शेकडो विषारी-बिन विषारी सापांचा वावर वाढल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

कल्याणात ३ ठिकाणी विषारी घोणस आढळल्याने नागरिकांमध्ये भीती

ठाणे - कल्याण शहरातील मानवी वस्तीत गेल्या ४ महिन्यांपासून शेकडो विषारी-बिन विषारी सापांचा वावर आढळून येत आहे. या सापांना सर्पमित्रांनी पकडून जीवदान दिले. त्यातच पुन्हा कल्याण पश्चिम परिसरात ३ वेगवेगळ्या ठिकाणी काल(शनिवार) रात्रीच्या सुमारास विषारी घोणस साप आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

पहिली घटना कल्याण पश्चिमेकडील पौर्णिमा चौकात सृष्टी सोसायटीत घडली आहे. या सोसायटीच्या आवारातील पार्किंगमध्ये एक रहिवाशी आपली दुचाकी पार्क करण्यासाठी गेला असता, त्याला एका वाहनाखाली साप दिसला. त्याने सोसायटीच्या रहिवाशांना सोसायटीच्या पार्किंगमध्ये साप शिरल्याची माहिती दिली. त्यानंतर एका रहिवाशाने 'वार संस्थे'चे सर्पमित्र हितेशला संपर्क करून कळविले. काही वेळातच सर्पमित्रांनी घटनास्थळ गाठून सापाला पकडले. हा साप घोणस जातीचा असून साधारण ३ फूट लांबीचा आहे.

दुसऱ्या घटनेत कल्याण पश्चिमेकडील सापर्डे गावातील कैलास पाटील यांच्या बंगल्याच्या आवारातील एका ड्रममध्ये पालापाचोळ्याचा आधार घेत ६ फुट लांब विषारी घोणस साप शिरला. याबाबत त्यांनी तातडीने सर्पमित्राला संपर्क करून माहिती दिली. सर्पमित्राने बंगल्यासमोरील गार्डनच्या भिंती लगत असलेल्या ड्रममधून पालापाचोळ्यात लपलेल्या विषारी घोणसला पकडले.

तिसऱ्या घटनेत आधारवाडी कारागृहासमोर असलेल्या पोलीस वसाहतीतील एका इमारतीच्या गेटजवळ रात्रीच्या सुमाराला वसाहतीतील मुले २६ जानेवारीच्या कार्यक्रमाची तयारी करीत होते. दरम्यान त्यांना चट्या बट्याचा साप दिसला. हा साप इमारतीच्या आत शिरण्याचा प्रयत्न करीत असल्याने येथील काही तरुणांनी त्या सापाला हुसकवण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत पोलीस वसाहतीतील आंनद पानसरे यांनी सर्पमित्र हितेशला फोन करून माहिती दिली. या सापालाही सर्पमित्रांनी इमारतीच्या गेटजवळच पकडून पिशवीत बंद केले. साप पकडल्याचे पाहून पोलीस वसाहतीतील रहिवाशांनी सुटकेचा निश्वास घेतला.

हेही वाचा - 'साहेबांचे खरे वारसदार हिंदूहृदयसम्राट राज ठाकरे' ठाण्यात मनसेची बॅनरबाजी

दरम्यान, या तिन्ही विषारी घोणस सापांना वन अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन जंगलात सोडणार असल्याची माहिती 'वार संस्थे'चे सर्पमित्र हितेश यांनी दिली. मात्र, वारंवार सापांच्या वाढत्या वावरमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्याचे पाहवयास मिळत आहे.

हेही वाचा - तिहेरी हत्याप्रकरणी आरोपी त्रिकुटाला जन्मठेपेची शिक्षा

Intro:kit 39Body:कल्याणात ३ ठिकाणी विषारी घोणस आढल्याने नागरिकांमध्ये भीती

ठाणे : कल्याण शहरातील मानवी वस्तीत गेल्या ४ महिन्यापासून शेकडो विषारी - बिन विषारी सापांचा वावर आढळून आल्याचे सर्पमित्रांनी पकडलेल्या सापांना जीवदान दिले. त्यातच पुन्हा कल्याण पश्चिम परिसरात ३ वेगवेगळ्या ठिकाणी काल रात्रीच्या सुमाराला विषारी घोणस साप आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
पहिल्या घटनेत कल्याण पश्चिमेकडील पौर्णिमा चौकात सृष्टी सोसायटीत घडली आहे. या सोसायटीच्या आवारातील पार्किंगमध्ये एक रहिवाशी आपली दुचाकी पार्क करण्यासाठी गेला असता त्याला एका वाहनाखाली चटया बाट्याचा साप दिसला. त्यावेळी त्याने दुचाकी घेऊन त्या ठिकाणावून पळ काढला. आणि सोसायटीच्या रहिवाशांनी साप सोसायटीच्या पार्किंगमध्ये शिरल्याची माहिती दिली. त्यानंतर एका रहिवाशाने वार संस्थेचे सर्पमित्र हितेशला संपर्क करून माहिती दिली. काही वेळातच सर्पमित्र घटनास्थळी दाखल होवून त्याने या सापाला पकडले. हा साप घोणस जातीचा असून ३ फूट लांबीचा आहे.
दुसऱ्या घटनेत कल्याण पश्चिमेकडील सापर्डे गावातील कैलास पाटील यांच्या बंगल्याच्या आवारातील एका ड्रममध्ये पालापाचोळ्याचा आधार घेत ६ फुटाचा लांब विषारी घोणस साप असल्याचे पाटील यांना त्या सापाच्या आवाजावरून माहिती पडले. त्यांनी तातडीने सर्पमित्र हितेशला संपर्क करून माहिती दिली. सर्पमित्राने बंगल्यासमोरील गार्डनच्या भिंती लगत असलेल्या ड्रममधून पालापाचोळ्यात लपलेल्या विषारी घोणसाला पकडले, साप पडकल्याचे पाहून बंगल्यातील राहणाऱ्या पाटील कुटुंबाने सुटकेचा निश्वास घेतला.
तिसऱ्या घटनेत आधारवाडी कारागृहासमोर असलेल्या पोलीस वसाहतीतील एका इमारतीच्या गेट नजीक रात्रीच्या सुमाराला वसाहतीतील मुले २६ जानेवारीच्या कार्यक्रमाची तयारी करीत असताना त्यांना चटया बाट्याचा साप दिसला. हा साप इमारतीच्या आत शिरण्याचा प्रयत्न करीत असल्याने येथील काही तरुणांनी त्या सापाला हुसकविण्याचा प्रयत्न केला. तोपर्यत पोलीस वसाहतीतील आंनद पानसरे यांनी सर्पमित्र हितेशला कॉल करून माहिती दिली. याही सापाला इमारतीच्या गेट नजीकच पकडून पिशवीत बंद केले. साप पकडल्याचे पाहून पोलीस वसाहतीतील रहिवाशांनी सुटकेचा निश्वास घेतला.
दरम्यान , या तिन्ही विषारी घोणस सापांना वन अधिकाऱ्यांची परवनगी घेऊन जंगलात सोडणार असल्याची माहिती वार संस्थेचे सर्पमित्र हितेशने दिली. मात्र वारंवार सापांच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्याचे पाहवयस मिळाले आहे.

Conclusion:kalyan
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.