ETV Bharat / state

किरकोळ वादातून चाकू हल्ला, भाडेकरूसह ६ जण जखमी

किरकोळ वादातून एकाने आपल्या कुटुंबीयांसह भाडेकरूवर चाकूने हल्ला केला. यात सहा जण जखमी झाले असून भाडेकरूची प्रकृती गंभीर आहे. पोलीस हल्लेखोराचा शोध घेत आहे.

जखमी शिवनाथ शुक्ला
जखमी शिवनाथ शुक्ला
author img

By

Published : Jan 28, 2020, 3:21 PM IST

नवी मुंबई - कौटुंबीक किरकोळ वादातून एका व्यक्तीने कुटुंबातील व्यक्तींवर जीवघेणा हल्ला करून हल्लेखोर पळून गेल्याचा प्रकार नवी मुंबईतील घणसोली परिसरात घडला आहे. यामध्ये 6 व्यक्ती जखमी झाले असून हल्लेखोराच्या दिव्यांग मुलीचादेखील समावेश आहे. याप्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे.

माहिती देताना प्रकाश शुक्ला

किरण पाटील (वय 45 वर्षे), असे या हल्लेखोराचे नाव आहे. तो नवी मुंबईतील घणसोली गावात राहत असून त्याचा पानटपरीचा व्यवसाय आहे. तो भांडखोर स्वभावाचा असल्याने त्याची पत्नी मुलीला घेऊन वेगळी राहत होती. जवळच वडिलोपार्जित मालिकीचे दुमजली घर आहे. हल्लेखोर किरण पाटील हा खालच्या मजल्यावर, तर त्याचा भाऊ वरच्या मजल्यावर राहत होता. दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या भावाने दुरूस्तीचे काम काढल्याने त्याने त्याचे सामान खालच्या मजल्यावर ठेवले होते. दुरूस्तीचे काम होऊनही त्याने सामान खालीच ठेवले होते. याचा राग किरणच्या मनात होता.

हेही वाचा - मुंब्र्यात मुशायऱ्याचे आयोजन; जितेंद्र आव्हाडांसह कन्हैय्या कुमारची उपस्थिती

त्याने दुपारी सगळे एकत्र असताना वाद उकरून काढला व सोबत आणलेल्या चाकूने घरातील सदस्यांवर वार करू लागला. यावेळी त्याने दिव्यांग मुलीलाही लाथा बुक्क्याने मारहाण केली. एवढ्यावर न थांबता त्याने भाडेकरूवरही चाकू हल्ला केला व पळून गेला. यामध्ये त्याची पत्नी रेखा पाटील, भाऊ शंकर पाटील, भावाची पत्नी अलका पाटील व मुलगी शिवांगी पाटील व भाडेकरू शिवनाथ शुक्ला हे जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्यात शिवनाथ शुक्ला हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या मूत्रपिंडांला (किडनी) इजा झाली आहे. यामुळे शुक्ला यांच्यावर वाशी येथील नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार करून मुंबई येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात येणार आहे.

हेही वाचा - मोफत कर्करोग रुग्णालयाचे लवकर भूमिपूजन - सांबरे

या प्रकरणी हल्लेखोर किरण पाटील याच्यावर रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांनी दिली. रबाळे पोलीस पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा - 'सरकारमध्ये सर्व काही आलबेल' कोणतेही मतभेद नसल्याचा एकनाथ शिंदेंचा निर्वाळा

Intro:किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणातून कुटुंबियांवर जीवघेणा हल्ला....

नवी मुंबई:
कौटुंबिक किरकोळ वादातून एका व्यक्तीने कुटुंबातील व्यक्तींवर जीवघेणा हल्ला करून हल्लेखोर पळून जाण्याचा प्रकार नवी मुंबईतील घणसोली परिसरात घडला आहे. यामध्ये 6 व्यक्ती जखमी झाल्या असून, यात हल्लेखोराच्या दिव्यांग मुलीचादेखील समावेश आहे. या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.मात्र हल्लेखोर फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
किरण पाटील(45) असे या हल्लेखोराचे नाव असून, तो नवी मुंबईतील घणसोली गावात राहत असून त्याचा पानटपरीचा व्यवसाय आहे. व जवळचं वडिलोपार्जित मालिकीचे दुमजली घरं आहे. वरच्या मजल्यावर राहणाऱ्या भावाने त्याच्या घराच्या दुरुस्तीचे काम काढले होते, मात्र दुरुस्ती होऊन काही दिवस सामान खाली ठेवले होते, याचाच राग मनात धरून किरणं पाटील हा वारंवार भांडणं करून वाद घालत होता.किरण पाटीलच्या भांडखोर स्वभावाला वैतागून त्याची पत्नी मुलीला घेऊन वेगळी राहत होती.असेच दुपारी सगळे एकत्र असताना किरण पाटील याने वाद उकरून काढला व आपल्या सोबत आणलेल्या चाकूने घरातील सदस्यांवर वार केले. व त्याच्या दिव्यांग मुलीलाही लाथा बुक्क्यांने मारहाण केली तसेच तेथे उपस्थित असलेल्या भाडोत्रीवर ही जीवणघेणा हल्ला केला. व त्याने तेथून पळ काढला या हल्ल्यात सहाजण जखमी झाले असून, यामध्ये किरण पाटील यांची पत्नी रेखा पाटील, भाऊ शंकर पाटील, भावाची पत्नी अलका पाटील व मुलगी शिवांगी पाटील जखमी व भाडोत्री शिवनाथ शुक्ला तसेच हल्लेखोरांनी दिव्यांग मुलगी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. किरण पाटील याने केलेल्या चाकू हल्ल्यात शिवनाथ शुक्ला हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या किडनीला जखम झाली आहे. त्यांना वाशी येथील नवी मुंबई महानगरपालिका इस्पितळात अतिदक्षता विभागात दाखल केले असून, त्यांना आज मुंबईतील नायर इस्पितळात हलवण्यात येणार आहे.
याप्रकरणी हल्लेखोर किरण पाटील याच्यावर रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाली असल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर यांनी दिली असून.रबाळे पोलीस हल्लेखोराचा कसोशीने शोध घेत आहेत.

Byts
प्रकाश शुक्ला (जखमी भाडोत्री यांचा पुतण्या)Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.