ETV Bharat / state

ठाण्यात ऑक्सिजनचा तुटवडा, ऑक्सिजनचा पुरवठा वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न - ठाणे जिल्हा लेटेस्ट न्यूज

ठाण्यासह राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे आता कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असलेला ऑक्सिजनचा साठा कमी पडू लागला आहे. प्रशासनाकडून ऑक्सिजनाचा साठा वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी तळोजेमधील ऑक्सिजनची निर्मिती करणाऱ्या लिंडे या कंपनीला भेट दिली.

ठाण्यात ऑक्सिजनचा तुटवडा
ठाण्यात ऑक्सिजनचा तुटवडा
author img

By

Published : Apr 14, 2021, 8:31 PM IST

ठाणे - ठाण्यासह राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे आता कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असलेला ऑक्सिजनचा साठा कमी पडू लागला आहे. प्रशासनाकडून ऑक्सिजनाचा साठा वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी तळोजेमधील ऑक्सिजनची निर्मिती करणाऱ्या लिंडे या कंपनीला भेट दिली. या कंपनीत दिवसाकाठी 240 मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती होते.

दरम्यान या ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या कंपनीमध्ये पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित एक बैठक पार पडली. या बैठकीला
रायगड जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांसह, महापालिका आयुक्त तसेच कोकण आयुक्त सुद्धा उपस्थित होते. ठाणे महापालिका क्षेत्रातील ओवी हॉस्पिटलमध्ये गेल्या काही दिवसांपासून ऑक्सिजनचा साठा कमी पडत आहे. तसेच नालासोपारा येथील एका खासगी रुग्णालयात ऑक्सिजन अभावी सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. ठाण्यातील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. ऑक्सिजनचा पुरवठा वेळते झाला नसता तर मोठ्या अनर्थ झाला असता, या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा प्रशासनाकडून ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी युद्धपातळीवर पाऊले उचलली जात आहेत. लिंडेमध्य झालेल्या बैठकीत ऑक्सिजनचा साठा ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्याला पुरवाठा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ठाण्यात ऑक्सिजनचा तुटवडा

ऑक्सिजनचा साठा उपलब्ध नसल्याने दोन कोविड सेंटर बंद

ऑक्सिजनचा साठा नसल्यामुळे ठाण्यातील दोन जंबो कोविड सेंटर बंद ठेवण्यात आले आहेत. तसेच ठाण्यात खासगी रुग्णालयांना देखील ऑक्सिजनचा साठा कमी पडत आहे. ऑक्सिजनचा पुरवाठ करण्याची मागणी खासगी रुग्णालयांनी महापालिकेकडे केली आहे. दरम्यान येत्या दोन ते तिन दिवसांत ऑक्सिजन पुरवठा नियमित सुरू झाला, तरच महानगरपालिका जिल्हा प्रशासन आणि विशेषता कोविड रुग्णांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - रेमडेसिविर पुरवठ्याबाबत आता नियंत्रण कक्षाकडे कंट्रोल; रुग्णांच्या नातेवाईकांना दिलासा तर स्टॉकीस्टवरही लक्ष

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.