ETV Bharat / state

THANE CRIME : धक्कादायक ! ४ वर्षीय चिमुरडीवर लैगिंक अत्याचार करणाऱ्या २६ वर्षीय नराधमाला बेड्या - ४ वर्षीय चिमुरडीवर लैगिंक अत्याचार

घरात खेळत असलेल्या एका 4 वर्षाच्या चिमुरड्यामुलीवर परिसरातच राहणाऱ्या एका 26 वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी आईच्या तक्रारीवरून कोणगाव पोलिसांनी त्या नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत.(THANE CRIME)

4 year old girl sexually assaulted
४ वर्षीय चिमुरडीवर लैगिंक अत्याचार
author img

By

Published : Aug 3, 2023, 6:59 PM IST

Updated : Aug 3, 2023, 7:51 PM IST

ठाणे : महिलां मुलीं बरोबरच अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनात दिवसें दिवस वाढ होत असल्याच्या घटना पहायला मिळत आहेत. घरात खेळणाऱ्या एका ४ वर्षीय चिमुरडीवर असाच लैगिंक अत्याचार करणाऱ्या २६ वर्षीय नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत त्याच्या विरोधात विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सागर छात्री असे बेड्या ठोकलेल्या त्या नरधमाचे नाव आहे. पोलीस सूत्रांनी दीलेल्या माहितीनुसार पीडित चिमुरडी ही आईवडील आणि भावासह रहायची. तर नराधम सागर हा ही याच परिसरात राहतो. त्याची पीडित चिमुरडीच्या कुटूंबाशी ओळख होती. याच ओळखीचा फायदा घेऊन तो पीडितेच्या घरी येत जात होता. ३१ जुलै रोजी नराधम सागर हा रात्रीच्या सुमारास पीडित चिमुरडीच्या घरी आला होता.

त्यावेळी पीडितेचे वडील कामावर गेले होते. तर आई घराच्या किचनमध्ये काम करत होती. तसेच पीडित चिमुरडीचे भाऊ झोपले होते. याच संधीचा फायदा घेऊन नराधम सागराने खेळण्याच्या बहाण्याने पीडित चिमुरडीवर लैगिंक अत्याचार केला. पीडित चिमुरडीवर नराधमाने केलेल्या अत्याचारामुळे तिला वेदना होऊन त्रास असाह्य झाल्याने ती रडत असल्याचे पाहून किचनमधून तिला बघण्यासाठी आई आली,

त्याच वेळी त्या नराधम सागरने काही कारण देऊन घाई गडबडीत घरातून निघून गेला होता. १ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास पीडित चिमुरडीला पुन्हा त्रास होऊ लागला आणि ती रडू लागली तेव्हा आईने तिच्याकडे विचारपूस केल्यानंतर तिने घडलेला सगळा प्रसंग आईला सांगितला. हे ऐकून आईला धक्काच बसला. दरम्यान पीडित चिमुरडीला ताप आला.

या धक्कादायक प्रकारमुळे कुटूंबाने २ ऑगस्ट रोजी पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगताच पोलिसांनी आईच्या तक्रारीवरून नराधम सागर वर भादंवि कलम ३७६सह पोक्सो कलम १२,४,६,८ प्रमाणे गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचे आधारे नराधमाचा काही तासातच शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या आहे.

हेही वाचा :

  1. Thane Crime News: मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात भर रस्त्यात अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न; अटकेनंतरही आरोपीने दाखविला माज
  2. THANE CRIME : शेअर मार्केटच्या नावाने गुंतवणूकदारांना व्याजाचे आमिष दाखवत घातला नऊ कोटीचा गंडा

Last Updated : Aug 3, 2023, 7:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.