ठाणे- मनसेचे पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी ठाणे शहर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजप-सेना युतीच्या गेल्या पाच वर्षातील निष्क्रियतेच्या मुद्द्यावर आपण या निवडणूकीला सामोरे जाणार आहोत. तसेच, आपण केलेल्या कामांमुळे जनता आपल्यालाच भरगोस मतांनी जिंकून देईल, असा दावा जाधव यांनी त्यावेळी केला आहे.
आबांच्या पश्चात विधानसभेची निवडणूक खडतर नाही, पण सोपीही नाही - रोहित पाटील
विद्यमान आमदार संजय केळकर यांच्यासमोर अविनाश जाधव यांनी कडवे आव्हान उभे केले आहे. आपण ठाणेकरांना कोपरी ब्रिजच्या रुंदीकरणाचे आश्वासन दिले असून प्रचार रॅलीचा नारळ तिथेच फोडू असे सूतोवाच जाधव यांनी केले आहे. आपल्याला नागरिक आणि विशेषकरून मराठी जनतेचा जबरदस्त पाठिंबा मिळत असल्याने ही लढत आपण मोठ्या फरकाने जिंकू, असे ते म्हणाले. अर्ज दाखल करायला निघण्यापूर्वी अनेक महिलांनी त्यांना औक्षण करून शुभेच्छा दिल्या.
विधानसभेच्या मैदानातून खडसेंची माघार, रोहिणी खडसेंना सहकार्य करण्याचे आवाहन
ठाणे शहर हा सेनेचा बालेकिल्ला असलातरी इथून उमेदवारी मात्र भाजपच्या उमेदवाराला मिळते. यामुळे नाराज झालेले अनेक शिवसैनिक आपल्यासाठी प्रचार करणार असल्याचे सांगत त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला.