ETV Bharat / state

शिवसेनेचे 'ठाणे' धोक्यात; सेनेच्या विद्यमान खासदाराविरोधात भाजप नगरसेवकांचे बंड - ASHOK RAUL

शिवसेनेचे ठाण्यातील खासदार राजन विचारेंच्या विरोधात भाजप नगरसेवकांचे बंड... विचारेंना पुन्हा तिकीट दिल्यास काम न करण्याचा दिला इशारा... ठाणे लोकसभेची जागा मेरीटनुसार भाजपला देण्याचीही केली मागणी

शिवसेनेचे 'ठाणे' धोक्यात
author img

By

Published : Feb 25, 2019, 10:18 PM IST

ठाणे - राज्यात शिवसेना भाजपची युती झाली असली तरी, स्थानिक पातळीवर सेना-भाजपच्या कार्यकर्त्यांची मने मात्र जुळलेली दिसत नाहीत. सेनेचे विद्यमान खासदार राजन विचारे यांनाच सेनेने पुन्हा तिकीट दिले तर शिवसेनेसोबत काम करणार नाही, असा पवित्रा भाजप नगरसेवकांनी घेतला आहे.

शिवसेनेचे 'ठाणे' धोक्यात

ठाणे लोकसभेची जागा मेरिटनुसार भाजपला द्यावी. तसेच राजन विचारे यांना ही जागा दिल्यास ठाण्यातील भाजप नगरसेवक काम करणार नाहीत, असे निवेदन ठाण्यातील २३ भाजप नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे. त्यामुळे शिवसेनेचे ठाणे धोक्यात असल्याचे चित्र सध्याच्या घडामोडींवरून दिसून येत आहे.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे लोकसभेची जागा मेरीटीनुसार भाजपला द्यावी, अशी मागणी ठाण्यातील भाजपच्या नगरसेवकांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. याचबरोबर जर ही जागा भाजपला सोडली नाही, तर निवडणुकीचे कामही करणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.

आगामी निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी सर्व मतभेद दूर सारून शिवसेना भाजपने युतीची घोषणा केली. मात्र, ठाणे लोकसभा मतदार संघात भाजपचे विधानसभेत मंदा म्हात्रे, नरेंद्र मेहता, संजय केळकर तर निरंजन डावखरे आणि रमेश पाटील हे विधानपरिषदेचे आमदार आहेत. परंतु, शिवसेनेचे मात्र विधानसभेत एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक हे दोन आणि रविंद्र फाटक हे विधान परिषदेचे आमदार आहेत. त्यामुळे या संख्याबळाचा विचार केल्यास मेरीटनुसार भाजपच आघाडीवर आहे. त्यामुळे ही जागा भाजपला सोडावी, अशी मागणी या नगरसेवकांनी केली आहे. इतकेच नव्हे तर, जर ही जागा भाजपला सोडली नाही, तर निवडणुकीचे कामही करणार नाही, असा इशाराही नगरसेवकांनी दिला आहे.

undefined

विशेष म्हणजे, शिवसेनेचे विद्यमान खासदार राजन विचारे यांनी भाजपचे आमदार आणि नगरसेवकांच्या अनेक कामांमध्ये अडथळे निर्माण करण्याचे काम केले आहे. तसेच लोकांशी उध्दटपणे वागणे यामुळे ठाणेकर सुध्दा त्यांच्यावर नाराज आहेत. या संदर्भात आपल्याकडे वारंवार तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. मात्र, त्यावर अद्याप कारवाई झालेली नाही. याकडेही भाजपचे गट नेते नारायण पवार यांनी यावेळी लक्ष वेधले आहे.

Intro:शिवसेनेचे 'ठाणे ' धोक्यात - सेनेच्या विद्यमान खासदाराविरोधात भाजप नगरसेवकांचे बंडBody:
राज्यात शिवसेना भाजपची युती झाली असली तरी, स्थानिक पातळीवर सेना-भाजपच्या कार्यकर्त्यााची मने मात्र जुळलेली दिसत नाही. सेनेचे विद्यमान खा. राजन विचारे यांनाच सेनेने पुन्हा तिकीट दिले तर शिवसेनेसोबत काम करणार नाही असा पवित्रा भाजप नगरसेवकांनी घेतला आहे.ठाणे लोकसभेची जागा मेरिटनुसार भाजपला द्या, राजन विचारे यांना ही जागा दिल्यास ठाण्यातील भाजप नगरसेवक काम करणार नाहीत. असे निवेदन ठाण्यातील 23 भाजप नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे लोकसभेची जागा मेरीटीनुसार भाजपाला द्यावी अशी मागणी ठाण्यातील भाजपाच्या नगरसेवकांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. याचबरोबर जर ही जागा भाजपाला सोडली नाही, तर निवडणुकीचे कामही करणार नाही असा इशाराही देण्यात आला आहे.
आगामी निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी सर्व मतभेद दूर सारून शिवसेना – भाजपने युतीची घोषणा केली. मात्र ठाणे लोकसभा मतदार संघात भाजपाचे विधानसभेत मंदा म्हात्रे, नरेंद्र मेहता, संजय केळकर तर निरंजन डावखरे आणि रमेश पाटील हे विधानपरिषदेचे आमदार आहेत. परंतु शिवसेनेचे मात्र विधानसभेत एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक हे दोन आणि रविंद्र फाटक हे विधान परिषदेचे आमदार आहेत. त्यामुळे या संख्याबळाचा विचार केल्यास मेरीटनुसार भाजपाच आघाडीवर आहे. त्यामुळे ही जागा भाजपाला सोडावी अशी मागणी या नगरसेवकांनी केली आहे.इतकेच नव्हे तर, जर ही जागा भाजपाला सोडली नाही, तर निवडणुकीचे कामही करणार नाही असा इशाराही नगरसेवकांनी दिला आहे. विशेष म्हणजे, शिवसेनेचे विद्यमान खासदार राजन विचारे यांनी भाजपाचे आमदार आणि नगरसेवकांच्या अनेक कामांमध्ये अडथळे निर्माण करण्याचे काम केले आहे. तसेच लोकांशी उध्दटपणे वागणे यामुळे ठाणेकरसुध्दा त्यांच्यावर नाराज आहेत. या संदर्भात आपल्याकडे वारंवार तक्रारी करण्यात आलेल्या आहेत, मात्र त्यावर अद्याप कारवाई झालेली नाही. याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.

BYTE: नारायण पवार ( भाजप गट नेते आणि बाजप नगरसेवक -ठामपा )
BYTE: अशोक राऊळ ( भाजप नगरसेवक-ठामपा )

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.