नवी मुंबई - शिवजयंतीनिमित्त कामोठेवासीयांनी वेगवेगळ्या शोभा यात्रा काढण्यापेक्षा 'एक शहर एक शोभायात्रा' काढली होती. भव्य दिव्य शोभायात्रेमध्ये तरुणांनी डॉल्बीवर ताल धरला, संपूर्ण शहरातील नागरिक तरुणाई रस्त्यावर लोटली होती. पनवेलमधील कामोठे शहरात अनेक मंडळ आहेत. मात्र, या सर्व मंडळांनी एकीने निर्णय घेत 'एक शहर-एक शोभा यात्रा' काढण्याचे ठरविले होते.
हेही वाचा -
'झाडा'झडतीला तयार; चौकशी करण्यासाठी माजी वनमंत्री स्वतः देणार पत्र
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची आरती करुन ही शोभायात्रा कामोठे पोलीस ठाण्यापासून संपूर्ण शहरात शिस्तपूर्ण वातावरणात पार पडली. या शोभायात्रेत लहान मुले व मुलींनी विविध पेहराव केल्याचे पाहायला मिळाले. नाशिक ढोल आणि डीजेच्या तालावर तरुण-तरुणींपासून आबालवृद्धही गाण्यांच्या तालावर थिरकत होते.
हेही वाचा -