ठाणे : यावर्षी आंबा पीक जवळपास 50 टक्केच निघाले. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेतही आंबा फारसा उपलब्ध नव्हता, तरीही निर्यात सकारात्मक झाली आहे. खरा हापुस हा किनारपट्टीचा समजला जातो. यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ले, मालवण, देवगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर, रत्नागिरी, गुहागर, दापोली आणि रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन, मुरुड, अलिबाग, उरण असे 11 तालुके किनारपट्टीला येतात.
आंब्याला मोठे मार्केट : यामध्ये प्रामुख्याने हापूस चांगला प्रतीचा देवगड, रत्नागिरी याच किनाऱ्याला येतो. कारण येथे जांभा दगड आहे. पालघर जिल्हा किनारपट्टीला असूनही हापूस आंबा त्या भागात येत नाही. त्याचे कारण तेथे जांबा दगड नाही. याचाच अर्थ हापूसचा संबंध हा जांभा दगडाशी आहे, म्हणून ज्या भागात हापूस होतो त्या प्रदेशात जर सेंद्रिय खतांवर बागा जोपासल्या गेल्या तर या आंब्याला मोठे मार्केट प्रदेशातून मिळू शकते.
आंबा थेट ग्राहकांपर्यंत : ठाणेकर असलेले आणि मुळचे देवगड जिल्ह्यातील विजयदुर्ग येथील रोहित गोखले हे ठाण्यात 14 ते 15 वर्षांपासून आंबा विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्या बागेत पिकवलेले आंबे ते थेट ग्राहकांना विकत असतात. व्यापाऱ्याला आंबा विक्रीस दिला तर कमी पैसे मिळतात. पण, आम्ही आमचा आंबा थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवला तर चांगले पैसे मिळतात. मागच्या वर्षीच्या तुलनेत आंब्याचे पीक कमी असले तरी यंदा भाव चांगला मिळाला आहे. जास्तीत जास्त आंबे परदेशात गेले आहेत. लोकांनी परदेशात भेट म्हणुन आमच्याकडून आंबे पाठवले आहेत. अवकाळी पावसाचा फटका आंब्यांवरती पडला. त्यामुळे यंदा भाववाढ झालेली आहे. तरीदेखील ग्राहकांनी आहे, त्या किमतीत आंबा घेतला आहे. हजार रुपयांना असलेला आंबा गेल्या वर्षी 700 ते 800 रुपये डझन विकला गेला असल्याचे रोहित गोखले सांगतात.
हेही वाचा :