ETV Bharat / state

ठाणे जिल्ह्यातही 31 डिसेंबरपर्यंत शाळा बंद राहणार, पालकमंत्र्यांचे आदेश - शाळा बंद ठेवण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश ठाणे

ठाणे जिल्ह्यातील शाळाही ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना दिले आहेत. दिवाळीनंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे, त्यामुळेच खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

Schools in Thane district closed till December 31
ठाणे जिल्ह्यात 31 डिसेंबरपर्यंत शाळा बंद राहणार
author img

By

Published : Nov 20, 2020, 9:50 PM IST

ठाणे - मुंबईप्रमाणे ठाणे जिल्ह्यातील शाळाही ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना दिले आहेत. सेामवारपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू होणार होते, मात्र आता नवीन वर्षातच शाळा सुरू होण्याची शक्यता आहे.

ठाणे जिल्ह्यात 31 डिसेंबरपर्यंत शाळा बंद राहणार

दिवाळीनंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे, त्यामुळेच खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यात ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर, केडीएमसी, भिवंडी आणि उल्हासनगर या सहा महापालिका आणि अंबरनाथ, बदलापूर या नगरपालिकांचा समावेश आहे. जिल्ह्यात सर्वाधिक शाळा असून, विद्यार्थांची संख्या लाखोंच्या घरात आहे. ठाण्यात कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत असून, शाळा बंद ठेवल्याने त्यावर नियंत्रण राहिल, असे शिंदे यांनी म्हटले आहे. शालेय शिक्षण विभागाने सोमवार, २३ नोव्हेंबरपासून राज्यातील नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यादृष्टीने शाळांमध्ये साफसफाई फवारणी, शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात येत होती. मात्र दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली होती. त्यातच दिवाळीनंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ हेाताना दिसत आहे. स्थानिक परिस्थिती बघून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात यावा असे शिक्षणमंत्र्यांनी प्रशासनाला निर्देश दिले आहेत. त्यामुळे मुंबईच्या आयुक्तांनी ३१ डिसेंबरपर्यंत शाळा सुरू होणार नसल्याचे सांगितले, त्याबरोबरच आता ठाणे जिल्ह्यातील शाळाही बंद राहणार आहेत.

परिस्थिती पाहून निर्णय घेऊ

मुंबई पाठोपाठ ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना दिले आहेत. पालकमंत्र्यांच्या निर्णयाची अमलबजावणी केली जाईल, शाळा या 31 डिसेंबरनंतर उघडण्याचा निर्णय घेऊ, अशी माहिती महापौर नरेश म्हस्के यांनी दिली आहे. याबाबत पालक व शैक्षणिक संस्थांशी चर्चा केली, पालकांमध्ये व शैक्षणिक संस्थेमध्ये अजूनही भीती आहे. पालक मुलांना शाळेत पाठवण्यासाठी तयार नाहीत व शैक्षणिक संस्था शाळा सुरु करण्यास तयार नसल्याने, पालकमत्र्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे म्हस्के यांनी सांगितले. तसेच ३१ डिसेंबरपर्यंत जर परिस्थिती सुधारली तर पालकमंत्र्यांशी चर्चा करून निर्णयात बदल करू, असे देखील म्हस्के यांनी सांगितले आहे.

ठाण्यासोबतच पालघर आणि रायगड जिल्ह्यातही शाळा बंद ठेवण्याची मागणी

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबईतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. त्याप्रमाणेच ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे अनिल बोरनारे यांनी केली आहे. याबाबत बोरनारे यांनी ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्यातील संबंधित प्रशासकी अधिकारी व राजकीय पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.