ETV Bharat / state

६,५०० कंत्राटी कामगारांचे हक्काचे ९० कोटी रुपये द्या, अन्यथा कामबंद आंदोलन करू - संदीप देशपांडे - नवी मुंबई महापालिका

नवी मुंबई महापालिकेतील ६,५०० कंत्राटी कामगारांच्या १४ महिन्यांच्या किमान वेतनातील एकूण ९० कोटी रुपयांचा प्रस्ताव स्थायी समिती मंजूर करत नसल्याने, यासंदर्भात भूमिका ठरविण्यासाठी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली.

संदीप देशपांडे
संदीप देशपांडे
author img

By

Published : Jan 21, 2020, 9:05 PM IST

नवी मुंबई - महापालिकेतील ६,५०० कंत्राटी कामगारांच्या १४ महिन्यांच्या किमान वेतनातील एकूण ९० कोटी रुपयांची थकबाकी द्या. अन्यथा कामबंद आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला.

पत्रकारपरिषदेत बोलताना मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे

नवी मुंबई महापालिकेतील ६,५०० कंत्राटी कामगारांच्या १४ महिन्यांच्या किमान वेतनातील एकूण ९० कोटी रुपयांचा प्रस्ताव स्थायी समिती मंजूर करत नसल्याने, यासंदर्भात भूमिका ठरविण्यासाठी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. कंत्राटी कामगारांना त्यांचे हक्काचे पैसे मिळावेत, यासाठी 'महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेने'कडून सातत्याने महापालिका प्रशासनाकडे प्रयत्न केले जात आहेत. महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी प्रशासकीय बाबी पूर्ण केल्यानंतरही सत्ताधारी असलेल्या भाजपकडून जाणीवपूर्वक कंत्राटी कामगारांचा प्रस्ताव स्थायी समितीकडून ३ वेळा मंजूर करण्यात आलेला नाही. सत्ताधारी असलेल्या नाईक कुटुंबीयांनी कंत्राटी कामगारांचे संपूर्ण श्रेय घ्यावे. परंतु, कंत्राटी कामगारांना त्यांचे हक्काचे पैसे द्यावेत, अशी विनंती देशपांडे यांनी यावेळी केली.

हेही वाचा - ठाण्यात मनसेची पोस्टरबाजी; राज्यव्यापी अधिवेशनाची तयारी पूर्ण

कंत्राटी कामगारांना त्यांना हक्काचे पैसे मिळाले नाही तर येत्या २७ जानेवारीला एक दिवसीय कामबंद आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिला. या एकदिवसीय कामबंद आंदोलनामुळे नवी मुंबईकरांना होणाऱ्या त्रासाबद्दल मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी नवी मुंबईकरांची दिलगिरी व्यक्त केली. कंत्राटी कामगारांच्या भावना लक्षात घेऊन समस्त नवी मुंबईकरांनी info@nmmconline.com या ईमेल आयडीवर जास्तीत जास्त मेल करून कंत्राटी कामगारांच्या पाठीमागे उभे राहण्याचे आवाहन शहर अध्यक्ष काळे यांनी केले.

यावेळी मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे, महापालिका कामगार कर्मचारी सेनेचे शहर अध्यक्ष आप्पासाहेब कोठुळे, कामगार सेनेचे उपाध्यक्ष राजेश उज्जैनकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा - फेसबुकवर पोस्ट लिहून तरुणाची आत्महत्या

Intro:६,५०० कंत्राटी कामगारांचे हक्काचे ९० कोटी रुपये दया अन्यथा कामबंद आंदोलन करू - संदीप देशपांडे

नवी मुंबई:

नवी मुंबई महापालिकेतील ६,५०० कंत्राटी कामगारांच्या १४ महिन्यांच्या किमान वेतनातील फरक एकूण ९० कोटी रुपयांची थकबाकी दया अन्यथा कामबंद आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला.
महापालिकेतील ६,५०० कंत्राटी कामगारांच्या १४ महिन्यांच्या किमान वेतनातील एकूण ९० कोटी रुपयांचा प्रस्ताव स्थायी समिती मंजूर करत नसल्याने,
यासंदर्भात मनसेची भूमिका ठरविण्यासाठी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. कंत्राटी कामगारांना त्यांचे हक्काचे पैसे मिळावेत यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेनेकडून सातत्याने महापालिका प्रशासनाकडे प्रयत्न केले जात आहेत. महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी प्रशासकीय बाबी पूर्ण केल्यानंतरही सत्ताधारी असलेल्या भाजपकडून जाणीवपूर्वक कंत्राटी कामगारांचा प्रस्ताव स्थायी समिती ३ वेळा मंजूर करण्यात आलेला नाही. सत्ताधारी असलेल्या नाईक कुटुंबीयांनी कंत्राटी कामगारांचे संपूर्ण श्रेय घ्यावे. परंतु, कंत्राटी कामगारांना त्यांचे हक्काचे पैसे द्यावेत अशी विनंती संदीप देशपांडे यांनी यावेळी केली. कंत्राटी कामगारांना त्यांना हक्काचे पैसे मिळाले नाहीत तर येत्या २७ जानेवारीला एक दिवसीय कामबंद आंदोलन करण्याचा इशारा यावेळी संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिला. या एकदिवसीय कामबंद आंदोलनामुळे नवी मुंबईकरांना होणाऱ्या त्रासाबद्दल मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी नवी मुंबईकरांची दिलगिरी व्यक्त केली. कंत्राटी कामगारांच्या भावना लक्षात घेऊन समस्त नवी मुंबईकरांनी info@nmmconline.com या ईमेल आयडीवर जास्तीत जास्त मेल करून कंत्राटी कामगारांच्या पाठीमागे उभे राहण्याचे आवाहन शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केले. यावेळी मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे, महापालिका कामगार कर्मचारी सेनेचे शहर अध्यक्ष आप्पासाहेब कोठुळे, कामगार सेनेचे उपाध्यक्ष राजेश उज्जैनकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Byts
संदीप देशपांडे मनसे सरचिटणीस Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.