नवी मुंबई - नवी मुंबईतील वाशी पाम बीच रोड परिसरात असणाऱ्या त्या सद्गगुरु बार आणि रेस्टॉरंटचे मालक असल्याचा निशाणा एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी साधला आहे. समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधताना ते एका बारचे मालक असल्याचा दावा केला होता. आता त्या बारचा परवाना आपल्या नावे असल्याचा खुलासा समीर वानखेडे यांनी केला आहे.
सरकारी सेवेत रुजू झाल्यापासून हा परवाना समीर वानखेडे यांच्या नावे -
समीर वानखेडे हे भारतीय महसूल सेवेमध्ये (आयआरएस) रुजू झाल्यापासून बारचा परवाना त्यांच्या नावे असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या बार संदर्भात असणारे कायदेशीर हक्क समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. शिवाय कायदेशीर परवाना असल्याने यात बेकायदेशीर असं काहीच नाही असेही समीर यांचे म्हणणे आहे. समीर वानखेडे हे भारतीय महसूल सेवेमध्ये २००६ सालापासून रुजू झाले. तेव्हापासूनच हा परवाना समीर यांच्या नावे आहे. तसेच बार आणि रेस्टॉरंटचा उल्लेख समीर यांच्या वार्षिक स्थावर मालमत्तेमध्ये देखील आहे, असेही स्पष्टीकरण त्यांनी दिलंय.
वाशीमधील 'त्या' सद्गगुरु बारचा परवाना माझ्याच नावावर, समीर वानखेडेंची कबुली - समीर वानखेडे बार परमिट
नवी मुंबईतील वाशी पाम बीच रोड परिसरात असणाऱ्या त्या सद्गगुरु बार आणि रेस्टॉरंटचे मालक असल्याचा निशाणा एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी साधला आहे. आता त्या बारचा परवाना आपल्या नावे असल्याचा खुलासा समीर वानखेडे यांनी केला आहे.