ETV Bharat / state

Sai Patil Performance: चिमुकल्या सई पाटीलची कामगिरी; इंडिया वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डने घेतली दखल - 220 किमीचा यशस्वी सायकल प्रवास

Sai Patil Performance: वयाच्या सहाव्या वर्षी कंसाचा खडक ते उरण हे ११ किमीचे अंतर एक तासात पूर्ण केले. सईचा खूप अभिमान वाटतो संपूर्ण देशात तिचा नावलौकिक झालेला आहे. प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना अशी शिकवण तर दिलीच पाहिजे. काश्मीर ते कन्याकुमारी हा 3600 किलोमीटर चा प्रवास सायकलवरून पूर्ण केरात विक्रम प्रस्थापित केला होता. आता याच विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली

Sai Patil Performance
Sai Patil Performance
author img

By

Published : Nov 13, 2022, 4:48 PM IST

ठाणे: बाळकूम गावची जलपरी सई आशिष पाटील हिने वयाच्या अवघ्या १० व्या वर्षी काश्मीर ते कन्याकुमारी हा 3600 किलोमीटर चा प्रवास सायकलवरून पूर्ण केरात विक्रम प्रस्थापित केला होता. आता याच विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे. सोबत वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डने ही याची नोंद घेतली आहे. यापूर्वी सईने वयाच्या सहाव्या वर्षी ठाण्याच्या खाडीवरून १०० फूट उंचीवरून उडी घेत अनोखा विक्रम केला होता.

Sai Patil Performance
Sai Patil Performance

११ किमीचे अंतर एक तासात: वयाच्या सहाव्या वर्षी कंसाचा खडक ते उरण हे ११ किमीचे अंतर एक तासात पूर्ण केले. सईचा खूप अभिमान वाटतो संपूर्ण देशात तिचा नावलौकिक झालेला आहे. प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना अशी शिकवण तर दिलीच पाहिजे. आणि खंबीरपणे मागे उभं राहिले पाहिजे, असं यावेळी साईच्या आई- वडिलांचे म्हणणे आहे.

Sai Patil Performance
Sai Patil Performance

जगात आपली ओळख निर्माण केली: १६ डिसेंबर २०२१ रोजी कश्मीरमधील कटरा येथील पवित्र वैष्णो देवीच्या प्रवेशद्वारापासून तिने प्रवास प्रारंभ केला, सुमारे ३६३९ किमीचा हा प्रवास तिने अवघ्या ३८ दिवसात पूर्ण केला. हे आकडे इतके मोठे आहेत. हे पाहताच आपण सर्वाना तिच्या मेहनतीचा अनुमान लावणे, देखील कठीण होत आहे. भारतात डिसेंबर, जानेवारी म्हटल की, थंडी आलीच. त्यात या काळात उत्तरेकडील राज्यातील बथंडीत सईने एकही विश्रांती न घेता आपला प्रवास पूर्ण केला. अनेक समस्या तिच्या प्रवासात आल्या असतील. परंतु न डगमगता खंबीरपणे हा विक्रम सईने पूर्ण केला. या विक्रमाचे कौतुक नक्कीच शब्दात सामावणारे नाही. अवघ्या १० वर्षाच्या सईच्या या विक्रमाने बाळकूम गावासोबतच, ठाणे आणि महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे.

Sai Patil Performance
Sai Patil Performance

220 किमीचा यशस्वी सायकल प्रवास: यापूर्वी सईने असे अनेक नेत्रदीपक कामगिरी केल्या आहेत. ठाणे महापौर जलतरण स्पर्धेत बॅकस्ट्रोक, फ्रीस्टायल, बटरफ्लाय, बेस्ट्रोक स्पर्धेत पदक पटकावली. क्षेत्र कार्ल ते बाळकूम ठाणे हा १२० किमीचा प्रवास फक्त 6 तासात पूर्ण केला. कारगिल आणि काश्मीरमध्ये भारत मातेच्या संरक्षणार्थ वीरमरण आलेल्या शाहिद जवानांना श्रद्धांजली समर्पित करत कारगिल ते श्रीनगर हा 220 किमीचा यशस्वी सायकल प्रवास केला.

लहान वयात माणुसकीचे दर्शन: अमृतसर ते अटारी बॉर्डर हा भारतीय जवानांप्रती सायकल चालवीत अभिमान व्यक्त केला. जलपरी सई पाटील या विक्रमी सायकल प्रवासा दरम्यान मुलगी वाचावा, मुलगी शिकवा, स्त्रीभूण हत्या थांबा, माझे आरोग्य माझी जबाबदारी असे विविध संदेश दिले आहेत. रस्त्यावर पडलेल्या मृत प्राण्याला बाजूला घेऊन जाऊन सईने लहान वयात माणुसकीचे दर्शन घडवून दिले आहे.

ही नव्या रेकॉर्डच्या प्रतीक्षेत: सईने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवल्यानंतर सई आणि सईचे कुटुंबीय आता आणखीन एका विक्रमाच्या तयारीला लागलेले आहे. आणि त्यासाठी पाटील कुटुंबीय प्रयत्नात आहे. 26 नोव्हेंबर रोजी आणखीन एक रेकॉर्ड बनवण्याचा साईचा प्रयत्न आहे. त्यासाठी कुटुंबीय तिच्याकडून सराव करून घेत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.