ETV Bharat / state

ठाण्यात रन फॉर व्होट मॅरेथॅान; मतदार जागृतीसाठी धावले ठाणेकर - District Election Officer Thane News

जिल्हातील १८ मतदारसंघासाठी २१ ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीत नागरिकांनी मतदान करावे आणि लोकशाहीला बळकट करावे यासाठी मतदान जनजागृती मॅरेथॅानचे जिल्हाधिकारी कार्यालय कोर्टा नाका येथे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणुक अधिकारी, ठाणे व माइल्स टू गो यांच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

ठाण्यात रन फॉर व्होट मॅरेथॅान
author img

By

Published : Oct 13, 2019, 1:42 PM IST

ठाणे- लहानग्यांपासून ते वयोवृध्दापर्यंत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय धावपटू पासून गृहिणीपर्यंत साऱ्यांनीच जिल्हाधिकारी कार्यालय कोर्टा नाका येथे आज सकाळपासून मोठी गर्दी केली होती. एकाच रंगाचे टीशर्ट परिधान केलेल्या सगळ्या लोकांनी 'एक धाव मतदानासाठी', असा संदेश देत दौड केली. निमित्त होते, रन फॉर व्होट मॅरेथॅान स्पर्धेचे. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी श्री. राजेश नार्वेकर यांनी झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात केली.

ठाण्यात रन फॉर व्होट मॅरेथॅान

जिल्हातील १८ मतदारसंघासाठी २१ ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीत नागरिकांनी मतदान करावे आणि लोकशाहीला बळकट करावे यासाठी मतदान जनजागृती मॅरेथॅानचे जिल्हाधिकारी कार्यालय कोर्टा नाका येथे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणुक अधिकारी, ठाणे व माइल्स टू गो यांच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला सर्व सहभागी खेळाडूंना जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर यांनी शुभेच्छा देवून मतदान करण्याचे आवाहन केले. ही स्पर्धा १० किलोमीटर, ५ किलोमीटर आणि ३ किलोमीटर अशा तीन प्रकारात पार पडली. स्पर्धेत ५ वर्षापासून ते अगदी ८० वर्षाच्या वृद्ध व्यक्तींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सर्व विजेत्या स्पर्धकांना श्री. नार्वेकर यांच्या हस्ते पदक देवून सन्मानीत करण्यात आले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी वैदही रानडे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी अपर्णा सोमाणी उपस्थित होत्या.

हेही वाचा- इतर पक्ष बंडखोरीने पोखरले, आपलं मात्र ठणठणीत चाललयं - राज ठाकरे

अधिकाऱ्यांनी केली ५ किलोमीटर दौड पूर्ण

सकाळपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत मोठ्या उत्साहाने प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी उप जिल्हाधिकारी सर्जेराव मस्के पाटील, तहसीलदार राजेंद्र चव्हाण यांनी ५ किलोमीटरची दौड यशस्वीरित्या पूर्ण केली.

सेल्फी पॉईंटवर गर्दी

यावेळी सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला होता. तरुणांसह, गृहिणी, जेष्ठ नागरिकांनी सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली होती.

आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्पर्धकांनी घेतला सहभाग

या स्पर्धेत विजया भट ( आंतरराष्ट्रीय खेळाडू ), श्रद्धा रननावरे ( आंतरराष्ट्रीय धावपटू) नंदा शेट्टी ( आंतरराष्ट्रीय खेळाडू ), गुरुमूर्ती नायक ( राष्ट्रीय धावपटू ) प्रशांत सारंग ( राष्ट्रीय धावपटू ) या स्पर्धकांसह महाराष्ट्राच्या विविध भागातील नामवंत खेळाडूनी सहभाग घेतला.

Intro:मतदार जागृतीसाठी धावले ठाणेकर
रन फॉर व्होट मॅरेथॅान स्पर्धा उत्साहात संपन्नBody:

लहानग्यांपासून ते वयोवृध्दापर्यंत, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय धावपटू पासून गृहिणी पर्यंत साऱ्यांनीच जिल्हाधिकारी कार्यालय कोर्टा नाका येथे आज सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती... एकाच रंगाचे टीशर्ट परिधान केलेल्या या सगळ्यांनीच एक धाव मतदानासाठी असा संदेश देत दौड केली. निमित्त होते, रन फॉर व्होट मॅरेथॅान स्पर्धेचे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी श्री. राजेश नार्वेकर यांनी झेंडा दाखवून स्पर्धाला सुरुवात करण्यात आली.
जिल्हातील 18 मतदारसंघासाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीत नागरिकांनी मतदान करावे आणि लोकशाहीला बळकट करावे यासाठी मतदान जनजागृती मॅरेथॅानचे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणुक अधिकारी, ठाणे व माइल्स टू गो यांच्या सहकार्याने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

सुरुवातीला सर्व सहभागी खेळाडूंना जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर यांनी शुभेच्छा देवून मतदान करण्याचे आवाहन केले. ही स्पर्धा 10 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि ३ किलोमीटर अशा तीन किलोमीटर प्रकारात पार पडली. स्पर्धेत 5 वर्षापासून अगदी 80 वर्षाच्या वृद्ध व्यक्तींनी उस्फूर्त सहभाग नोंदवला. सर्व विजेत्या स्पर्धकांना श्री. नार्वेकर यांच्या हस्ते पदक देवून सन्मान करण्यात आला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी वैदही रानडे, उप जिल्हा निवडणुक अधिकारी अपर्णा सोमाणी उपस्थित होत्या.

*अधिकाऱ्यांनी केली 5 किलोमीटर दौड पूर्ण*

सकाळ पासून सुरु झालेल्या या स्पर्धेत मोठ्या उत्साहाने प्रशासनातील अधिकारी –कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी उप जिल्हाधिकारी सर्जेराव मस्के पाटील, तहसीलदार राजेंद्र चव्हाण यांनी 5 किलोमीटर ची दौड यशस्वी पूर्ण केली.

*सेल्फी पॉईटवर गर्दी*
यावेळी सेल्फी पॉईट तयार करण्यात आला होता. तरुणांसह , गृहिणी , जेष्ठ नागरिकांनी सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली होती.

आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्पर्धकांनी घेतला सहभाग

या स्पर्धेत विजया भट ( आंतरराष्ट्रीय खेळाडू ), श्रद्धा रननावरे ( आंतरराष्ट्रीय धावपटू

नंदा शेट्टी ( आंतरराष्ट्रीय खेळाडू ), गुरुमूर्ती नायक – ( राष्ट्रीय धावपटू )

प्रशांत सारंग ( राष्ट्रीय धावपटू ) या स्पर्धकांसह महाराष्ट्राच्या विविध भागातील नामवंत खेळाडूनी सहभाग घेतला.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.