ETV Bharat / state

RSF Tear Gas Testing: रेल्वे सुरक्षा बलाचा कॅम्पमधील अश्रूधारेंच्या टेस्टिंगमुळे नागरिकांची पळापळ; नागरिकांना डोळे, घशाला त्रास - pungent smell of chemicals dombivali

ठाणेतील डोंबिवली शहरालगत आज रेल्वे सुरक्षा बलाचा कॅम्पमध्ये (RSF Camp Thane) अश्रूधारेंची टेस्टिंग (RSF  tear gas testing) घेण्यात आली. यामुळे झालेल्या वायूगळतीत इंदिरा नगर झोपडपट्टीत धूर पसरून नागरिकांची पळापळ झाली आहे. या धुरामुळे नागरिकांना डोळे, घशाला त्रास (Citizens suffered from eye and throat problems) झाल्याचे समोर आले आहे. Latest news from Thane, घटनेची माहिती रामनगर पोलीसांना देण्यात देण्यात आली असता पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा परिसरातील आरएसएफ कॅम्पमध्ये टेस्टिंग सुरू असल्याची माहिती मिळाली. Latest news from Thane,

RSF Tear Gas Testing
अश्रूधारेंच्या टेस्टिंगमुळे नागरिकांची पळापळ
author img

By

Published : Dec 3, 2022, 8:32 PM IST

ठाणे : केमिकल आणि उग्र वासामुळे (pungent smell of chemicals dombivali) कायम चर्चेत असलेले डोंबिवली शहर पुन्हा एकदा चर्चेत आले. यावेळी कारण मात्र वेगळे आहे असून रेल्वे सुरक्षा बलाचा कॅम्पमध्ये (RSF Camp Thane) अश्रूधारेंची टेस्टिंगमुळे (RSF tear gas testing) डोंबिवलीत लगतच्या परिसरात धूर पसरून नागरिकांची पळापळ झाली आहे. तर काही नागरिकांना या धुरामुळे डोळे, घशाला त्रास (Citizens suffered from eye and throat problems) झाल्याचे समोर आले आहे. Latest news from Thane,

नागरिकांच्या प्रतिक्रिया

नागरिकांना श्वास घेण्यास त्रास : शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास डोंबिवली पूर्वेकडील इंदिरानगर झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तर लहान मुलांनाही श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. तसेच महिला पुरुषांचे डोळे जळजळू लागले. त्यामुळे परिसरात नेमके काय झाले याची कोणालाच कल्पना नव्हती. जो तो घराबाहेर येऊन पळू लागला. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

वायू गळती होऊन घडली घटना : या घटनेची माहिती रामनगर पोलीसांना देण्यात देण्यात आली असता पोलीस पथक घटनास्थळी दाखल होऊन नजीकच रेल्वे सुरक्षा बलाचा कॅम्पमध्ये गेले असता, या ठिकाणी अश्रूधारेंची टेस्टिंग सुरू होती. या टेस्टिंग दरम्यान वायू गळती होऊन हवेच्या वेगामुळे वायू वस्तीत शिरले .याचा परिणाम होऊन नागरिकांना त्रास होऊ लागला.

सध्या स्थिती नियंत्रणात : सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र अश्रूधारेंच्या टेस्टिंग दरम्यान वाहत्या हवेमुळे वायू इंदिरानगर परिसरात पसरले. सध्या परिस्थिती व्यवस्थित आहे, अशी माहिती रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.