ठाणे - इलेक्ट्रॉनिक दुकानात वस्तू केली खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या दोघांनी ३ दुकानातून चोरी केल्याची घटना घटना घडली होती. मध्यवर्ती पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दुकलीचा शोध घेऊन अटक केली असून, त्यांच्याकडून चोरी केलेल्या इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. पवन चावला (१९), निरज गुप्ता (१९) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
हेही वाचा - वालधुनी नदीच्या पुलाखालील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळले पुरुष जातीचे मृत अर्भक
मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगर शहरातील कॅम्प नं. ३ येथील टील्सन मार्के टमध्ये शॉप नं. १९ मध्ये व्यापारी अब्दुल खान यांचे लालवानी इलेक्ट्रॉनीक्स रिपेअरींगचे दुकान आहे. ते दुकानात बसले असताना रात्री ८ च्या सुमारास १८ ते २० वयोगटातील २ तरूण त्यांच्या दुकानात वायरचा माईक चेक करण्याच्या बहाण्याने आले. त्या दोघांनी दुकानातील भिंतीलगत दुरूस्तीसाठी ग्राहकांचा ठेवण्यात आलेला २० हजार रूपये किंमतीचा एम्प्लीफायर चोरून नेला. तसेच त्या दोघांनी चंदर मोटवानी यांच्या दुकानात इलेक्ट्रॉनीक वस्तू खरेदी करण्याचा बहाणा करीत ५ माईकचे ३ बॉक्स सुमारे ३ हजार ३५० रूपये किंमतीचे चोरून नेले.
अशोक दीपचंदानी यांच्या दुकानातून देखील त्या दोघांनी एक पारस कंपनीची एफएस मशीन व एक माईक असा १२०० रूपयाचा माल चोरून नेला. एकाच परिसरात ३ दुकानात चोरी झाल्याने व्यापारी वर्गांमध्ये संतापाचे वातावरण पसरले होते.
या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात व्यापारी अब्दुल खान यांनी दिलेल्या तक्रारीवरुन दोन अज्ञात चोरटयांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरिक्षक सुधाकर सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक योगेश गायकर, एएसआय तडवी, हवालदार बेंद्रे, चौधरी, गावीत, ठाकूर, हेमंत पाटील यांनी अवघ्या ६ तासातच चोरी झालेल्या ठिकाणावरील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून त्याद्वारे तपास करीत आरोपी पवन चावला, निरज गुप्ता, या दोघांना शोधून ताब्यात घेतले. त्यांनी इलेक्ट्रॉनीकच्या ३ दुकानात चोरी केल्याची कबुली दिली असून, पोलिसांनी त्यांच्याकडून चोरी केलेल्या इलेक्ट्रॉनीक वस्तू पोलिसांनी जप्त केल्या आहेत. अधिक तपास पोलीस अधिकारी गायकर करीत आहेत.
हेही वाचा - शेतकऱ्याच्या घरात पाच लाखांची चोरी.. मुलांच्या लग्नासाठी जमवली होती रक्कम