ETV Bharat / state

सुरक्षा रक्षकच निघाला भक्षक; तब्बल सहा लाखांवर मारला डल्ला - WATCHMEN THIEF

उल्हासनगर शहरातील कॅम्प क्रमांक. ३ येथील शांतीनगर परिसरात कोहिनूर वेस अपार्टमेंटधील होलचंदानी यांच्या घरातील तब्बल सहा लाख रुपये चोरी गेल्याची घटना घडली आहे.

robbery
सुरक्षा रक्षकच निघाला भक्षक; तब्बल सहा लाखांवर मारला डल्ला
author img

By

Published : Jan 31, 2020, 8:54 PM IST

ठाणे - एका इमारतीच्या सुरक्षेसाठी कार्यरत असणाऱ्या सुरक्षा रक्षकाने त्याच्या 3 सहकाऱ्यांसह घरफोडी करुन 6 लाख 12 हजार रुपयाची रोख रक्कम चोरुन नेली आहे. ही घटना उल्हासनगर कॅम्प क्रमांक 3 येथील शांतीनगर परिसरात 'कोहिनूर वेस' या इमारतीत घडली आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करुन पोलिसांनी चोरांचा शोध सुरू केला व त्यांना एकाला ताब्यात घेण्यात यश मिळाले आहे तर 2 फरार झाले आहेत.

हेही वाचा - औरंगाबाद-जालना महामार्गावर भीषण अपघात; 4 भाविक ठार, 9 गंभीर

उल्हासनगर शहरातील कॅम्प नं.३ येथील शांतीनगर परिसरात कोहिनूर वेस अपार्टमेंट आहे. त्या अपार्टमेंटमध्ये अमित होलचंदानी हे आपल्या कुटूंबासह राहतात. अपार्टमेंटच्या सुरक्षेसाठी मनिष, कृष्णा, अनिल हे सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. त्यांनी आपसात संगनमत करुन अमित यांच्या राहत्या इमारतीच्या टेरेसवरुन येवून बेडरुमच्या खिडकीचे ग्रील उचकवून घरात प्रवेश केला. शेअर्स कागपत्रासह तब्बल 6 लाख 12 हजार रुपयाची रोख रकमेवर डल्ला मारला.

हेही वाचा - फर्रुखाबाद: ओलीस ठेवलेल्या 23 मुलांची सुखरूप सुटका; पोलीस एन्काऊंटरमध्ये आरोपी ठार

Intro:kit 319Body:६ लाख १२ हजाराच्या रोकडवर वॉचमेनांच्या त्रिकुटाने मारला डल्ला

ठाणे : एका इमारतीमध्ये वॉचमेनचे काम करणाऱ्या ३ वॉचमेनांनी एका घरात खिडकी वाटे प्रवेश करून ३ कपाटातील ६ लाख १२ हजार रूपयाची रोख रक्कमेवर डल्ला मारल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
हि घटना उल्हासनगर कॅम्प नं.३ येथील शांतीनगर परिसरात कोहिनूर वेस या इमारतीत घडली आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी चोरट्या वॉचमेनांचा शोध सुरु केला असता एकाला ताब्यात घेतले आहे. तर २ फरार झाले आहेत.
उल्हासनगर शहरातील कॅम्प नं.३ येथील शांतीनगर परिसरात कोहिनूर वेस ही अपार्टमेंट आहे. त्या अपार्टमेंटमध्ये अमित होलचंदानी हे आपल्या कुटूंबासह राहतात. त्या बिल्डींगमध्ये मनिष, कृष्णा, अनिल हे वॉचमेन म्हणून काम करतात. त्यांनी आपसात संगनमत करून अमित यांच्या राहत्या बिल्डींगच्या टेरेसवरून येवून त्यांच्या बेडरूमच्या खिडकीचे ग्रिल उचकटून त्यावाटे घरात प्रवेश केले. त्यांनतर ३ वॉचमेननी अमित यांच्या घरातील कपाटातून १ लाखाची रोख रक्कम त्यांच्या वडीलांच्या कपाटातील २ लाख ३७ हजाराची रक्कम व भावाच्या कपाटातील २ लाख ६५ हजार रूपयाची रोख रक्कम अशी ६ लाख १२ हजार रूपयाची रोकड तसेच शेअर्स शर्टीफीकेट व महत्त्वाची कागदपत्रे लंपास केली.
या प्रकरणी तिन्ही वॉचमेन विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एका वॉचमेनला ताब्यात घेतले आहे. तर वॉचमेननेच घरफोडी केल्याने उल्हासनगरात सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. अधिक तपास मध्यवर्ती पोलिस ठाण्याचे स.पो.नि.अस्लम खतीब करीत आहेत.

Conclusion:ulhasnagr
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.