ETV Bharat / state

ठाणे महापालिकेत फिरताहेत रिव्हॉल्वरधारी, मुख्यालयातील सुरक्षेचे तीन तेरा

ठाणे महापालिकेच्या व्हीआयपी प्रवेशद्वारातून कंबरेला रिव्हॉल्वर लटकवून एक आगंतुक व्यक्ती थेट महापालिकेत शिरल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली आहे. त्यानंतर ही रिव्हॉल्वरधारी व्यक्ती बराच वेळ महापौर व इतर बड्या पदाधिकाऱ्यांची कार्यालये असलेल्या पहिल्या मजल्यावर रिव्हॉल्वरचे प्रदर्शन करीत फिरतांना असल्याचे दिसून आले. त्यामुळे महापालिकेची सुरक्षाव्यवस्था ढिसाळ बनल्याचा प्रत्यय आला आहे.

author img

By

Published : Aug 3, 2019, 7:43 AM IST

Updated : Aug 3, 2019, 7:54 AM IST

ठाणे महापालिका मुख्यालयात फिरताहेत रिव्हॉल्वरधारी

ठाणे - महापालिकेच्या व्हीआयपी प्रवेशद्वारातून कंबरेला रिव्हॉल्वर लटकवून एक आगंतुक व्यक्ती थेट महापालिकेत शिरल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली आहे. त्यानंतर हा रिव्हॉल्वरधारी व्यक्ती बराच वेळ महापौर व इतर बड्या पदाधिकाऱ्यांची कार्यालये असलेल्या पहिल्या मजल्यावर रिव्हॉल्वरचे प्रदर्शन करीत फिरतांना असल्याचे दिसून आले. त्यामुळे महापालिकेची सुरक्षाव्यवस्था ढिसाळ झाल्याचा प्रत्यय आला आहे.

ठाणे महापालिका मुख्यालयात फिरताहेत रिव्हॉल्वरधारी, मुख्यालयातील सुरक्षेचे तीन तेरा

ठाणे महापालिकेचे मुख्यालय पाचपाखाडी येथे आहे. पालिका मुख्यालयात आंतरबाह्य सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित आहे. तर, महापालिकेची सुरक्षाव्यवस्था पाहण्यासाठी मुख्य सुरक्षा अधिकारी मछिंद्र थोरवे यांच्या नियंत्रणाखाली सद्यस्थितीत एकूण 1130 सुरक्षारक्षक तैनात आहेत. थोरवे हे निवृत्त पोलीस अधिकारी असल्याने त्यांचा पालिकेच्या प्रत्येक घडामोडींवर पहारा असतो. असे असतानाही गुरुवारी वर्षा मॅरेथॉनची महत्वाची बैठक महापौरांच्या कार्यालयात सुरू होती. यावेळी एक व्यक्ती या कार्यालयाबाहेरील व्हरांड्यात चक्क कंबरेला रिव्हॉल्वर लावून येरझाऱ्या घालीत असल्याचे दिसून आले.

त्याच्या या शस्त्र प्रदर्शनाने अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र, पालिकेतील एकाही सुरक्षा कर्मचाऱ्याने त्याला हटकण्याची अथवा विचारपूस करण्याची तसदी घेतली नाही. सदरची व्यक्ती बदलापूर येथील असून पालिकेत एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याला भेटण्यासाठी आल्याचे समजले. याबाबत प्रवेशद्वारावरील सुरक्षारक्षकांकडे विचारपूस केली असता, पालिकेत भेट देणारे सुरक्षेच्या कामात सहकार्य करत नाहीत. त्यामुळे नेहमीच वादाचे प्रसंग उद्भवत असल्याचे सांगितले.

या प्रसंगानंतर पालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला असता मागील सहा महिन्यांपासून पालिकेचे मेटल डिटेक्टर ही बंद असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुख्यालयात सुरक्षेचे तीन तेरा वाजल्याचा प्रत्यय आला.

Intro:ठाणे महापालिका मुख्यालयात फिरताहेत रिव्हॉल्वरधारी पालिकेचे मेटल डिटेक्टर 6 महिन्यांपासून बंदBody:

ठाणे महापालिकेची सुरक्षाव्यवस्था ढिसाळ बनल्याचा प्रत्यय आला आहे.पालिकेच्या व्हीआयपी प्रवेशद्वारातून कंबरेला रिव्हॉल्वर लटकवून एक आगंतुक व्यक्ती थेट महापालिकेत शिरल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली.त्यानंतर ही रिव्हॉल्वरधारी व्यक्ती बराच वेळ महापौर व इतर बड्या पदाधिकाऱ्यांची कार्यालये असलेल्या पहिल्या मजल्यावर रिव्हॉल्वरचे प्रदर्शन करीत फिरतांना असल्याचे दिसून आले.
ठाणे महापालिकेचे मुख्यालय पाचपाखाडी येथे असून पालिका मुख्यालयात आंतरबाह्य सीसी टीव्ही यंत्रणा कार्यान्वित आहे.तर, महापालिकेची सुरक्षाव्यवस्था पाहण्यासाठी मुख्य सुरक्षा अधिकारी मछिंद्र थोरवे यांच्या नियंत्रणाखाली सद्यस्थितीत एकूण 1130 सुरक्षारक्षक तैनात आहेत.थोरवे हे निवृत्त पोलीस अधिकारी असल्याने त्यांचा पालिकेच्या प्रत्येक घडामोडींवर वॉच असतो.असे असतानाही गुरुवारी वर्षा मॅरेथॉनची महत्वाची बैठक महापौरांच्या कार्यालयात सुरु असताना एक वक्ती या कार्यालयाबाहेरील व्हरांड्यात चक्क कंबरेला रिव्हॉल्वर लावून येरझाऱ्या घालीत असल्याचे दिसून आले.त्याच्या या शस्त्र प्रदर्शनाने अनेकांच्या भुवया उंचावल्या.मात्र,पालिकेतील एकाही सुरक्षा कर्मचाऱ्याने त्याला हटकण्याची अथवा विचारपूस करण्याची तसदी घेतली नाही.सदरची व्यक्ती बदलापूर येथील असून पालिकेत एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याला भेटण्यासाठी आल्याचे समजले.याबाबत प्रवेशद्वारावरील सुरक्षारक्षकांकडे विचारपूस केली असता,पालिकेत भेट देणारे सुरक्षेच्या कामात सहकार्य करीत नाहीत.त्यामुळे नेहमीच वादाचे प्रसंग उद्भवतात.
या प्रसंगानंतर पालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला असता मागील सहा महिन्यांपासून पालिकेचे मेटल डिटेक्टर ही बंद असल्याचे समोर आले त्यामुळे मुख्यालयात सुरक्षेचे तीन तेरा वाजल्याचा प्रत्यय आला.Conclusion:null
Last Updated : Aug 3, 2019, 7:54 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.