ETV Bharat / state

ठाणे लोकसभा : मोदी 'विचारां'ची लाट ओसरली; राष्ट्रवादी विजयाचा 'आनंद' करणार साजरा ?

२०१४ च्या निवडणुकीच्या मोदी लाटेत शिवसेनेचे राजन विचारे अनपेक्षितपणे निवडून आले. या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीविरोधी लाट आली आणि राजन विचारे यांनी संजीव नाईक यांचा तब्बल २ लाख ८५ हजार मतांनी पराभव केला. थोडक्यात ठाणे लोकसभा मतदार संघात एकाच पक्षाला अनेकवर्ष सत्ता काबीज करण्याचे भाग्य हे शिवसेनेला त्या काळात मिळाले. त्यानंतर मात्र या मतदारसंघातील कब्जेदार सतत बदलत राहिले आहेत.

राजन विचारे आणि आनंद परांजपे
author img

By

Published : Apr 21, 2019, 2:54 PM IST

Updated : Apr 21, 2019, 4:56 PM IST

ठाणे - लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. पहिल्या दुसऱ्या टप्प्यातील मताचे कौल ईव्हीएममध्ये सील झाले आहेत. आता तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. तर चौथ्या टप्प्याच्या प्रचारांच्या तोफा जोरजाराने धडाडू लागल्या आहेत. चौथ्या टप्प्यात मतदान होणाऱ्या ठाणे मतदारसंघात यावेळीही चुरशीची लढाई पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी शिवसेनकडून विद्यमान खासदार राजन विचारे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद पंराजपे हे रिंगणात आहेत. या दोन्हीही प्रादेशिक पक्षाच्या उमेदवारांच्या या तुल्यबळ लढतीचा घेतलेला विशेष आढावा.

ठाणे लोकसभा

ठाणे मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जात होता. मात्र, भूमिपुत्र, मराठी, आगरी मतदारांची मोठ्या प्रमाणात संख्या होती तोपर्यंतच ठाण्यात शिवसेनेचा किल्ला राहिला. परंतु कालांतराने ठाण्याचे वाढलेले नागरीकरणामुळे ठाणे लोकसभा मतदारसंघात बहुजनाचा, विविध जाती जमातीचा वावर वाढला. याच कारणामुळे शिवसेनेतून राष्ट्रवादीत घरोबा केलेल्या गणेश नाईक यांनी ठाणे लोकसभा मतदार संघावर २००४ आणि २००९ च्या निवडणुकीत ठाणे लोकसभा मतदार संघातून संजीव नाईक यांनी विजय मिळवला. त्यानंतर पुन्हा वाढलेल्या नागरीकरणाचा फटका ठाणे लोकसभा मतदारसंघावर कब्जा करणाऱ्यांना बसला.

२०१४ च्या निवडणुकीच्या मोदी लाटेत शिवसेनेचे राजन विचारे अनपेक्षितपणे निवडून आले. या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीविरोधी लाट आली आणि राजन विचारे यांनी संजीव नाईक यांचा तब्बल २ लाख ८५ हजार मतांनी पराभव केला. थोडक्यात ठाणे लोकसभा मतदार संघात एकाच पक्षाला अनेकवर्ष सत्ता काबीज करण्याचे भाग्य हे शिवसेनेला त्या काळात मिळाले. त्यानंतर मात्र या मतदारसंघातील कब्जेदार सतत बदलत राहिले.

मतदारसंघावर राष्ट्रवादी कब्जा करण्याचे संकेत-

मोदी लाटेत २०१४ ला राजन विचारे हे २ लाख ८५ हजार मतांनी निवडून आले. त्याच राजन विचारेंना २०१९ ची निवडणूक जड जात असलायचे चित्र सध्या दिसत आहे. मोदी लाट जवळपास संपली आणि आक्रोश पुढे आल्याने २०१४ च्या निवडणुकीत विचारेंनी जेवढा लीड घेतला होता. तेवढी मते आता मिळतील का? असा प्रश्न आताच्या परिस्थित निर्माण झाला आहे. त्यामुळे यावेळी राष्ट्रवादी पुन्हा ठाणे लोकसभा मतदारसंघावर कब्जा करेल असेच सकारात्मक चित्र दिसत आहे.

खरे तर मागच्यावेळी पराभव झालेले डॉ. संजीव नाईक यांना या निवडणुकीत निश्चितच यश लाभण्याची तीव्र शक्यता असताना त्यांनी माघार घेतल्याने शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेले आनंद परांजपे यांनी पुन्हा राष्ट्रवादीच्या तिकिटावर ठाणे लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रणागंणात उडी घेतली आहे.

उमेदवारांची माहिती

या मतदारसंघात एकूण २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र येथील खरी लढत युती आणि आघाडीच्या उमेदवारांमध्येच पाहायला मिळणार आहे.

शिवसेना - राजन विचारे
ठाणे महापालिकेचे माजी नगरसेवक, महापौर, आमदार आणि २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार संजीव नाईक यांचा पराभव करुन खासदार, शिक्षण १२ वी पर्यंत. पाच वर्षे अनेकदा वादात सापडले.

राष्ट्रवादी - आनंद परांजपे
ठाणे लोकसभेचे खासदार २००८-०९ त्यानंतर कल्याणचे खासदार (२००९ ते २०१४), २०१४ मध्ये राष्ट्रवादीत प्रवेश यावेळी शिवसेनेच्या श्रीकांत शिंदे यांनी त्यांचा पराभव केला. सध्या ठाणे शहर जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत, वडील प्रकाश पराजंपे यांच्या भरीव कामाचा फायदा त्यांना होऊ शकतो, सुशिक्षित, उच्चशिक्षित आणि आंदोलनाच्या माध्यमातून ओळख निर्माण झालेला चेहरा. या शिवाय मनसेचा जाहीर पाठिंबा मिळाला असल्याने यांचे पारडे जड मानले जात आहे.

मल्लीका अजरुन पुजारी - (भारिप - वंचित बहुजन आघाडी) नवी मुंबईमधील विकासक, भारिपचे कार्यकर्ते एवढीच ओळख.

या निवडणुकीत आपची भुमिका मात्र तळ्यात-मळ्यात आहे. निवडणुकीबाबत अद्यापही त्यांचा निर्णय झालेला नाही. महाराष्ट्र क्रांती सेनेकडून - रविंद्र साळुंखे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र, उमेदवाराचे नाव चर्चेतील नाही. केवळ मराठा समाजातील उमेदवार म्हणूनच ओळख आहे.

पक्षीय बलाबल-
ठाणे लोकसभा मतदारसंघातील आमदारांचे संख्याबळ पाहता शिवसेना आणि भाजपचे वर्चस्व आहे. ठाणे, मीरा भाईंदर आणि बेलापूर विधानसभा मतदार संघात भाजप तर कोपरी पाचपाखाडी, ओवळा माजिवडा आणि ठाणे यामध्ये शिवसनेचे आमदार आहेत. मात्र, हे सर्व आमदार जवळपास मोदी लाटेच्या अनुषंगाने निवडून आल्याने यावेळी लाटेच्या आधारावर ही निवडणूक जिंकणे विचारेंना कठीण जाणार आहे. एवढ्या सगळ्या विधानसभा मतदारसंघात केवळ एरोली मतदार संघात राष्ट्रवादीला यश मिळवता आले आहे.

विधानसभा मंतदारसंघातील वर्चस्व-

  • ऐरोली - संदीप नाईक (राष्ट्रवादी)
  • बेलापूर - मंदा म्हात्रे (भाजप)
  • ठाणे - संजय केळकर (भाजप)
  • कोपरी पाचपाखाडी - एकनाथ शिंदे (शिवसेना)
  • ओवळा-माजीवाडा - प्रताप सरनाईक (शिवसेना)
  • मीरा भायंदर- जितेंद्र मेहता (भाजप)

२०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकानंतर झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत नवीमुंबई महानगरपालिकेत राष्ट्रवादीने कब्जा केला. आज नवीमुंबई पालिकेत ५३ राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत. तर अपक्ष म्हणून जे पाच नगरसेवक निवडून आले आहेत, ते राष्ट्रवादीच्या बाजूने असल्याने ही राष्ट्रवादीसाठी जमेची बाजू आहे. तर शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या ही १६ वरुन ३७ वर गेली आहे. तर भाजप नगरसेवकांची संख्या ही एक वरुन ६ वर गेली आहे. यावरून एकच चित्र दिसत आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीची लाट ही हळूहळू महानगरपालिकेच्या निवडणुकीपर्यंत ओसरत गेली. २०१४ च्या निवडणुकांमध्ये मोदी लाटेचा असर आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचा आक्रोशाचा फटका बसल्याचे चित्र आहे.

ठाणे महापालिकेत शिवसेनेचे ६७ नगरसेवक असून भाजपचे २३ नगरसेवक आहेत. मागील निवडणुकीच्या तुलनेत या दोनही पक्षांच्या नगरसेवकांची संख्या वाढलेली आहे. तर राष्ट्रवादीचे मात्र ३५ नगरसेवक आहेत. काँग्रेसचे ३, एमआयएमचे २ नगरसेवक आहेत.

राजन विचारेंची राजकीय बलस्थाने-

मिरा भाईंदर महापालिकेत राष्ट्रवादीचा पत्ता साफ झाला असून त्यांच्या नगरसेवकांची संख्या ही शुन्य आहे. काँग्रेसचे येथे १२ नगरसेवक असून मुझफर हुसेन यांची भूमिका येथे निर्णायक ठरणार आहे. त्यात गिल्र्बट मेन्डोसा हे शिवसेनेशी जवळीक साधून असल्याने त्याचा फायदा शिवसेनेला होणार आहे. शिवाय प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या विरोधात विधानसभेत निवडणूक लढविलेले भाजपचे संजय पांडे यांनाही शिवसेनेत खेचल्याने ही सुध्दा विचारेंना जमेची बाजू आहे. शिवसेनेचे येथे पूर्वी ९ नगरसेवक होते, आता तीच संख्या २२ वर पोहोचली आहे. तर भाजप नगरसेवकांची संख्या थेट ६१ वर गेली आहे.

मनसेच्या व्हिडिओ सभा राष्ट्रवादीला तारणार?

२०१४ च्या सर्वच निवडणुकीत मात्र मनसेचा संपूर्ण सफाया झाला असून लोकसभे पाठोपाठ, विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुकीत त्यांना भोपळा सुध्दा फोडता आलेला नाही. त्यामुळे त्यांच्या मताचा फायदा कितपत आणि कसा होईल यावर फारसे गणित अवलंबून नसेल. याच परिस्थितीची जाणीव झाल्याने किंबहुना मनसे प्रमुखांनी केवळ सावधान करण्यासाठी प्रचाराची रणधुमाळी उठवली. त्याचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला नक्कीच होतोय, कदाचित या उदारमतवादी वर्तणुकीमागे येणाऱ्या विधानसभेसाठी राजकीय समीकरणाची नांदी ठरण्याची चिन्हे आहेत. मराठी टक्का असलेले मतदान मनसेच्या पदरात पडते. पण तेच मतदान काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत मिळवले तर नर्विवाद विजय असे समीकरण कदाचित राज ठाकरे यांना दिसले असावे, अन असे झाल्यास येणाऱ्या काळात इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची चिन्हे दिसत आहेत.

मतदार संख्या-

सहा विधानसभा मिळून म्हणजेच ठाणे लोकसभा मतदारसंघात एकूण - २३ लाख ७० हजार १८९ एवढे असून यामध्ये पुरुष मतदार -१२ लाख ६० हजार ८१ आहेत. तर स्त्री मतदारांची संख्या १० लाख ४७ हजार १०८ एवढी आहे. मागील वेळेच्या तुलनेत स्त्री मतदारांच्या संख्येत सुमारे ९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे त्यासुध्दा निर्णायक भूमिकेत आल्या आहेत.

या लोकसभा निवडणुकीत प्रथम मतदान करणाऱ्याची संख्या विलक्षण आहे. तरुण मतदारांची संख्येमध्ये -१८ ते १९ वयोगटातील मतदारांची संख्या १३ हजार ४७ एवढी असून यामध्ये पुरुष मतदार - ६१४७ आणि स्त्री मतदार -५३८३ एवढी आहे. तर २० ते २९ वयोगटातील मतदार हे निर्णायक मतदार ठरणार आहेत.

ठाणे विधानसभा मतदारसंघात एकूण -३ लाख १५ हजार ९९२ एवढे मतदार असून यामध्ये पुरुष मतदार -१ लाख ८० हजार ४५० आणि स्त्री मतदार -१ लाख ३५ हजार ५४२ एवढे आहेत. त्यामुळे हेच मतदार निर्णायक भूमिका बजावणार आहेत.

जातीय समिकरणे-

नवी मुंबई हा पट्टा आगरी, कोळी, पश्चिम महाराष्ट्र मोठा वर्ग, खान्देश मोठा वर्ग, माथाडी कामगार वसाहत असून हा निर्णायक ठरणार आहे. तर ठाण्यात कोपरी भागात सिंधी समाज अधिक असून पुढे वागळे, किसनगर, लोकमान्य नगर भागात बहुभाषीक असले तरी येथे कामगार वर्गाचा अधिक भरणा आहे. तर नौपाडय़ात ब्राम्हणांचा टक्का अधिक आहे. घोडबंदर भागात नव्याने वसाहती झाल्याने येथे बहुभाषिक असून सुशिक्षीत मतदार येथे आहेत. तसेच बाळकुम, कोलशेत, ढोकाळी आदींसह घोडबंदरच्या काही भागात आगरी कोळी बांधवाचा बेल्ट आहे. मिरा भाईंदरमध्ये गुजराथी, मारवाडी यांची संख्या अधिक असून इतर भाषीक समुहांचाही येथे चांगलाच वरचष्मा आहे.

मतदारसंघातील समस्या-

या मतदारसंघात रेल्वेच्या अनेक समस्या असून, बाहेरगावी जाणाऱ्या काही गाडय़ा ठाणे रेल्वे स्थानकात थांबत असल्या तरी ठाण्यासाठी विशेष लोकल वाढलेल्या नाहीत, नवीन ठाणे स्टेशनचा मुद्दा अद्यापही कागदारवरच आहे. ठाणे पूर्वचा सॅटीस मार्ग कागदावर, मिरा भाईंदरमध्ये सुध्दा रेल्वेच्या समस्या आहेत. नवी मुंबईत माथाडी समाजाचे आजही अनेक प्रश्न प्रलंबीत आहेत. आगरी, कोळी समाजाला आजही मानाचे स्थान मिळालेले नाही.

---------- Forwarded message ---------
From:MANOJ VITTHAL DEVKAR <manoj.devkar@etvbharat.com>
Date: Sat, Apr 20, 2019, 6:41 PM
Subject: लोकसभा मतदारसंघाचा आढावा
To: <maharashtrainput@gmail.com>, <etvmarathiinput@gmail.com>, eenadu input <eenaduinput@etvbharat.com>

२५ ठाणे लोकसभा मतदार संघ 

ठाणे लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला भूमिपुत्र, मराठी, आगरी मतदारांची मोठी संख्या होती तोपर्यंत ठाण्यात शिवसेनेचा किल्ला होता. परंतु कालांतराने ठाण्याचे वाढलेले नागरीकरणामुळे ठाणे लोकसभा मतदारसंघात बहुजनाचा, विविध जाती जमातीचा वावर वाढला. याच कारणामुळे शिवसेनेतून राष्ट्रवादीत घरोबा केलेल्या गणेश नाईक यांनी ठाणे लोकसभा मतदार संघावर २००४ आणि २००९ च्या निवडणुकीत ठाणे लोकसभा मतदार संघातून संजीव नाईक यांनी विजय मिळवला. त्यानंतर पुन्हा वाधेलेल्या नागरीकरणाचा फटका ठाणे लोकसभा मतदार संघावर कब्जा करणाऱ्यांना बसला. २०१४ च्या निवडणुकीच्या मोदी लाटेत शिवसेनेचे राजन विचारे अनपेक्षितपणे निवडून आले. या निवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी विरोधी लाट आली. कि, राजन विचारे यांनी संजीव नाईक यांचा तब्बल २ लाख ८५ हजार मतांनी पराभव केला. थोडक्यात ठाणे लोकसभा मतदार संघात एकाच पक्षाला अनेकवर्ष सत्ता काबीज कार्नायचे भाग्य हे शिवसेनेला त्या काळात मिळाले त्यानंतर मात्र कब्जेदार हे बदलते राहिले. लाटेत २०१४ ला राजन विचारे हे २ लाख ८५ हजार मतांनी निवडून आले. त्याच राजन विचारेना २०१९ ची निवडणूक जड जात असलायचे चित्र दिसत आहे. मोदी लाट जवळपास संपली आणि आक्रोश पुढे आल्याने जेवढा लीड घेतला होता तेवढी मते मिळतील काय? आ प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे यंदा पुन्हा राष्ट्रवादी ठाणे लोकसभा मतदार संघावर कब्जा करेल असेच सकारात्मक चित्र दिसत आहे. खरे तर मागच्यावेळी पराभव झालेले डॉ संजीव नाईक यांना या निवडणुकीत निश्चितच यश लाभण्याची तीव्र शक्यता असताना त्यांनी माघार घेतल्याने शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेले आनंद परांजपे यांनी पुन्हा राष्ट्रवादीच्या तिकिटावर ठाणे लोकसभा मतदार संघात उडी घेतली आहे. ठाणे लोकसभा मतदार संघातील आमदारांचे संख्याबळ पाहता शिवसेना आणि भाजपचे वर्चस्व आहे. ठाणे, मीरा भाईंदर आणि बेलापूर विधानसभा मतदार संघात भाजप तर कोपरी पाचपाखाडी, ओवळा माजिवडा आणि ठाणे यामध्ये शिवसनेचे आमदार आहेत. मात्र हे सर्व आमदार जवळपास मोदी लाटेच्या अनुषंगाने निवडून आलेयाने यंदा लाटेच्या आधारावर निवडणूक जिंकणे कठीण जाणार आहे. एवढ्या सगळ्या विधानसभा मतदार संघात केवळ एरोली मतदार संघात राष्ट्रवादीला यश मिळवता आले. 

                 २०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकानंतर झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत नवीमुंबई महानगरपालिकेत राष्ट्रवादीने कब्जा केला. आज नवीमुंबई पालिकेत ५३ राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत. तर अपक्ष म्हणून जे पाच नगरसेवक निवडून आले आहेत, ते राष्ट्रवादीच्या बाजूने असल्याने ही राष्ट्रवादीसाठी जमेची बाजू आहे. तर शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या ही 16 वरुन 37 वर गेली आहे. तर भाजपा नगरसेवकांची संख्या ही एक वरुन 6 वर गेली आहे. यावरून एकाच चित्र दिसत आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीची लाट हि हळूहळू महानगरपालिकेच्या निवडणुकी पर्यत ओसरत गेली. २०१४ च्या अर्वाच निवडणुकांमध्ये मोदी लाटेचा असर आणि कोन्ग्रेस-राष्ट्रवादीचा आक्रोशाचा फटका बसल्याचे चित्र आहे. 

          ठाणो महापालिकेत शिवसेनेचे 67 नगरसेवक असून भाजपाचे 23 नगरसेवक आहेत. मागील निवडणुकीच्या तुलनेत या दोनही पक्षांच्या नगरसेवकांची संख्या वाढलेली आहे. तर राष्ट्रवादीचे मात्र 35 नगरसेवक आहेत. कॉंग्रेसचे 3, एमआयएमचे 2 नगरसेवक आहेत. 
*मिरा भाईंदर महापालिकेत राष्ट्रवादीचा पत्ता साफ झाला असून त्यांच्या नगरसेवकांची संख्या ही शुन्य आहे. कॉंग्रेसचे येथे 12 नगरसेवक असून मुङझफर हुसेन यांची भुमिका येथे निर्णायक ठरणार आहे. त्यात गिल्र्बट मेन्डोसा हे शिवसेनेशी जवळीक साधून असल्याने त्याचा फायदा शिवसेनेला होणार आहे. शिवाय प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या विरोधात विधानसभेत निवडणुक लढविलेले भाजपाचे संजय पांडे यांनासुध्दा शिवसेनेत खेचल्याने ही सुध्दा विचारेंना जमेची बाजू आहे. शिवसेनेचे येथे पूर्वी 9 नगरसेवक होते, आता तीच संख्या 22 वर पोहचली आहे. तर भाजपा नगरसेवकांची संख्या थेट 61 वर गेली आहे. 

           २०१४ च्या सर्वच निवडणुकीत मात्र मनसेचा संपूर्ण सफाया झाला असून लोकसभेपाठोपाठ, विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुकीत त्यांना भोपळा सुध्दा फोडता आलेला नाही. त्यामुळे त्यांच्या मताचा फायदा कितपत आणि कसा होईल यावर फारसे गणित अवलंबून नसेल.याच परिस्थितीची जाणीव झाल्याने किंबहुना मनसे  प्रमुखांनी केवळ सावधान करण्यासाठी प्रचाराची रणधुमाळी उठवली. त्याचा फायदा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला नक्कीच होतोय, कदाचित या उदारमतवादी वर्तनुकीमागे येणाऱ्या राजकीय समीकरणाची नांदी ठरण्याची चिन्हे आहेत. मराठी टक्का असलेले मतदान मनसेच्या पदरात पडते. पण तेच मतदान कोन्ग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत मिळवले तर नर्विवाद विजय असे समीकरण कदाचित राज ठाकरे यांना दिसले असावे,अन असे झाल्यास येणाऱ्या  काळात इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची चिन्हे दिसत आहेत. 

             यंदाच्या निवडणुकीत प्रथम मतदान करणाऱ्याची  संख्या विलक्षण आहे. तरुण मतदारांची संख्या -18 ते 19 वयोगटातील मतदारांची संख्या 13 हजार 47 एवढी असून यामध्ये पुरुष मतदार - 6147 आणि स्त्री मतदार -5386 एवढी आहे.
तर 2क्ते 29 वयोगटातील मतदार हे निर्णायक मतदार ठरणार आहेत. सहा विधानसभा मिळून म्हणजेच ठाणो लोकसभेत -3 लाख 15 हजार 992 एवढे मतदार असून यामध्ये पुरुष मतदार - 1 लाख 80 हजार 450 आणि स्त्री मतदार -1 लाख 35 हजार 542 एवढे आहेत. त्यामुळे हेच मतदार निर्णायक भुमिका बजावणार आहेत. 
तर ठाणे लोकसभा मतदार संघात एकूण - 23 लाख 70 हजार 189 एवढे असून यामध्ये पुरुष मतदार -12 लाख 60 हजार 81 आहेत. तर स्त्री मतदारांची संख्या 10 लाख 47 हजार 108 एवढी आहे. मागील वेळेच्या तुलनेत स्त्री मतदारांच्या संख्येत सुमारे 9 टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे त्यासुध्दा निर्णायक भुमिकेत आल्या आहेत.  
*नवी मुंबई हा पट्टा आगरी, कोळी, पश्चिम महाराष्ट्र मोठा वर्ग, खान्देश मोठा वर्ग, माथाडी कामगार वसाहत असून हा निर्णायक ठरणार आहे. तर ठाण्यात कोपरी भागात सींधी समाज अधिक असून पुढे वागळे, किसनगर, लोकमान्य नगर भागात बहुभाषीक असले तरी येथे कामगार वर्गाचा अधिक भरणा आहे. तर नौपाडय़ात ब्राम्हणांचा टक्का अधिक आहे. घोडबंदर भागात नव्याने वसाहती झाल्याने येथे बहुभाषिक असून सुशिक्षीत मतदार येथे आहेत. तसेच बाळकुम, कोलशेत, ढोकाळी आदींसह घोडबंदरच्या काही भागात आगरी कोळी बांधवाचा बेल्ट आहे. मिरा भाईंदर मध्ये गुजराथी, मारवाडी यांची संख्या अधिक असून इतर भाषीक समुहाचाही येथे चांगलाच वरचष्मा आहे.   

समस्या - या मतदार संघात रेल्वेच्या अनेक समस्या असून, बाहेरगावी जाणा:या काही गाडय़ा ठाणे  रेल्वे स्थानकात थांबत असल्या तरी ठाण्यासाठी विशेष लोकल वाढलेल्या नाहीत, नवीन ठाणो स्टेशनचा मुद्दा अद्यापही कागदारवर आहे, ठाणे  पूव्रेचा सॅटीस मार्ग कागदावर, मिरा भाईंदरमध्ये सुध्दा रेल्वेच्या समस्या आहेत. नवी मुंबईत माथाडी समाजाचे आजही अनेक प्रश्न प्रलंबीत ाहेत. आगरी, कोळी समाजाला आजही मानचे स्थान मिळालेले नाही. 

 उमेदवारांची माहिती 
शिवसेना - राजन विचारे - ठाणो महापालिकेचे माजी नगरसेवक, महापौर, आमदार आणि 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार संजीव नाईक यांचा पराभव करुन खासदार, शिक्षण 12 वी र्पयतच. पाच वर्षे अनेकदा वादात सापडले 
राष्ट्रवादी - आनंद परांजपे - नाव घोषीत, ठाणो लोकसभेचे खासदार 2008-2009 नंतर कल्याणचे खासदार 2009 ते 2014, 2014  मध्ये राष्ट्रवादीत प्रवेश यावेळी शिवसेनेचे श्रीकांत शिंदे यांनी केला पराभव, सध्या ठाणो शहर जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्षपदाची धुरा, वडील प्रकाश पराजंपे यांच्या भरीव कामाचा फायदा होऊ शकतो, सुशिक्षित, उच्चशिक्षित आणि आंदोलनाच्या माध्यमातून दिसत असणारा चेहरा
मनसेचा जाहीर पाठींबा   
भारीप - बहुजन वंचित आघाडी - मल्लीका अजरुन पुजारी - नवी मुंबईमधील विकासक, भारीपचे कार्यकर्ते एवढीच ओळख.
आपची भुमिका मात्र तळ्यात मळ्यात आहेत, निवडणुकीबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. 
महाराष्ट्र क्रांती सेना - रविंद्र साळुंखे यांची उमेदवारी जाहीर - नाव चर्चेतील नाही, केवळ मराठा समाजातील उमेदवार म्हणूनच ओळख 

byte प्रमोद खरात (जेष्ठ पत्रकार ) २ मिलिंद बल्लाळ (राजकीय विश्लेषक ) p2c मनोज देवकर 
Last Updated : Apr 21, 2019, 4:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.