ETV Bharat / state

Thane News : ठाणे जिल्ह्यातील राजकीय, गुन्हेगारी क्षेत्रातील महत्वा्च्या बातम्या; वाचा एका क्लिकवर - राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड

ठाण्यात रॅपर्सना एकत्र करून कार्यक्रम करण्याचे आव्हाडांचे ट्विट. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या पोस्टवरून आव्हाडांना नेटकरांची चपराक. तसेच ठाणे जिल्हात जनप्रक्षोभ मोर्चात मुंबईची गर्दी, 'रॅप' गाणाऱ्या तरुणावर शिंदे गटाकडून गुन्हा दाखल, अरविंद सावंत यांनी केलेल्या वक्तव्या विरोधात रिक्षा चालक आक्रमक झाले आहेत.

Thane News
ठाणे जिल्हातील विविध घडामोडी
author img

By

Published : Apr 10, 2023, 6:47 PM IST

ठाणे : वादग्रस्त रॅप गाणे तयार करणाऱ्या तरुणावर पोलिसांनी कायदेशीर कारवाई केल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी ट्वीटरवर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर भाष्य करून तरुणाईची दिशाभूल करणारे ट्वीट केले आहे. सगळ्या रॅपर्सना एकत्र करून ठाण्यात एक कार्यक्रम करण्याची इच्छा आव्हांडांनी व्यक्त करून हॅशटॅग विद्रोह हा ट्रेन्ड सुरू केला आहे. मात्र सोशल नेटकऱ्यांनी आव्हाडांना मविआ सरकारच्या कुकर्माची आठवण करून दिली. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे नेहमी या ना त्या कारणाने चर्चेत असतात. सद्या सत्तेत नसल्याने आव्हाडांची सोशल मीडियावर टिवटिव मात्र सुरू आहे. अश्याच प्रकारे आव्हाड यांनी शुक्रवारी ट्विट करत ठाण्यात रॅप शो करण्याचे आव्हाडांनी ठरवले आहे. वादग्रस्त रॅप गाणे तयार करणाऱ्या तरुणावर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर आव्हाडांनी ट्वीटरवर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर भाष्य करत कार्यक्रम राबविण्याचे ठरविले असल्याने नेटकऱ्यानी आव्हाडांना जुनी आठवण करू दिली आहेत.

ठाण्याच्या जनप्रक्षोभ मोर्चात मुंबईची गर्दी : राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर ठाण्यात हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच कार्यकर्ते ठाकरे गटात राहिले असल्याने, मविआच्या जनप्रक्षोभ मोर्चात मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातून गर्दी जमण्याची नामुष्की ठाकरे गटातील नेत्याला ओढवली आहे. या मोर्चात मविआ नेत्यांनी नेहमीप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप याच्यावर टीका करून येत्या निवडणुकीत आम्हालाच निवडणुक द्या असे साकडे एकप्रकारे आदित्य ठाकरे यांनी उपस्थितांना घातले. हा जनप्रक्षोभ मोर्चा ठाण्यात असल्याने ठाकरे गटाचे बडे नेते झाडून आले होते. यावेळी आदित्य ठाकरे यांनी निवडणुकीचे राजकारण करत येणाऱ्या निवडणुकीत आम्हाला साथ द्या अशी घोषणा केल्याने ठाकरे यांची धडपड पाहायला मिळाली. दरम्यान या मोर्चात अनोळखी चेहरे पहायला मिळाले.

पार्सलच्या पैशावरुन तुफान राडा: एका हायप्रोफाईल सोसायटीच्या गेटवरच ऑनलाईन पार्सलच्या पैशावरुन ग्राहक आणि डिलिव्हरी बॉयच्या टोळीमध्ये तुफान राडा झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण शीळ मार्गावरील लोढा हेवन परिसरात एका हायप्रोफाईल घडली आहे. तर पार्सलच्या पैशावरुन झालेला तूफान राडा सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. हा वाद सुरु असताना काही हातात लाकडी दांडके घेऊन दोन्ही गटाकडून फ्रीस्टाइनने जोरदार हाणामारी झाली. हा हाणामारीचा संपूर्ण सोसायटीच्या गेटवर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी ग्राहक, सुनील मिश्रा आणि ब्लिनकी कंपनीच्या डिलिव्हरी बॉयसह त्याच्या साथीदारांवर परस्परविरोधात गुन्हा दाखल केले.

लुटमारी करणारी सराईत टोळी गजाआड: ओला चालक, रिक्षावाल्यांसह लहानसान व्यवसायिकांची लुटमारी करणाऱ्या सराईत टोळीला मानपाडा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोन तासातच चार जणांना अटक केली. तर टोळीतील एक गुन्हेगार फरार झाला आहे. विशेष म्हणजे अटक गुन्हेगार प्रवाशी म्हणून ज्या ओला कारमध्ये बसायचे त्याच चालकाला बेदम मारहाण करून लुटत होते. तर अटक केलेल्या टोळीमध्ये एक गुन्हेगार हा अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. चंद्रकात उर्फ मोठा चट्या रमेश जमादार, शिवा रुपौपाल तुसंबल, सत्यप्रकाश मुकेशकुमार कनोजिया असे अटक गुन्हेगारांचे नावे आहेत. त्यानंतर घडलेल्या प्रकाराबाबत १ एप्रिल रोजी मानपाडा पोलीस ठाण्यात चालक चौधरी यांच्या तक्रारीवरून भादवि कलम ३९५.३४ प्रमाणे लुटारु अज्ञात टोळीवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याच्यासह तिघांसह एक अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले.दरम्यान, अटक गुन्हेगारांकडून गुन्हयात चोरलेली रोख रक्कम, मोबाईल फोन तसेच इतर गुन्हयात चोरलेले एकूण ९ मोबाईल फोन, १ लॅपटॉप, रोख रक्कम, आणि गुन्हयात वापरलेली रिक्षा असा एकूण २,लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

'रॅप' गाणाऱ्या तरुणावर शिंदे गटाकडून गुन्हा दाखल: चोर आले ५० खोके घेऊन किती बघा चोर आले, हे रॅप सॉंग गाणाऱ्या तरुणावर अंबरनाथ शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात शिंदे गटाच्या युवासेना कोअर कमिटी सदस्य स्नेहल कांबळे यांनी गुन्हा दाखल केला आहे. राज मुंगासे असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव असून तो छत्रपती संभाजीनगर जिल्हातील रहिवाशी आहे. राज्यात गेल्या ९ महिन्यांपासून ठाकरे - शिंदे गटात सत्ता संघर्षावरून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वादग्रस्त पोस्ट टाकून राज्यात राजकीय वाद करून समाजात अशांतता पसरविण्याचे दिसून येत आहे. अश्या वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यावर शिंदे गटांकडून राज्यातील विविध पोलीस ठाण्यात असंख्य गुन्हे आतापर्यत दाखल करण्यात आले आहे. असाच एक गुन्हा अंबरनाथ शहरातील शिंदे गटाच्या युवासेना कोअर कमिटी सदस्य स्नेहल कांबळे यांनी रॅपर राज मुंगासे ह्यांच्याविरुद्ध शिवाजी नगर पोलीस ठाण्यात बदनामीचा गुन्हा दाखल केला आहे. स्नेहल कांबळे यांच्या मते हे रॅप सॉंग गाणाऱ्या तरुणाने अतिशय गलिच्छ भाषेत आणि अश्लील शिव्या देत शिवसेना - भाजप युती सरकार विरुद्ध बदनामीकर रॅप केले असून हे (रॅप) गाणे उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल केले जात असल्याचा आरोप तक्रारीत नमूद केले आहे.

मुख्यमंत्र्याना बदनाम करण्याचा ठाकरे गटाचा डाव फसला : राज्यात शिंदे फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यापासून ठाकरे गटाकडून सातत्याने टीका केली जात आहे. मात्र आता महिलेच्या पदराआडून मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचे कटकारस्थान ठाकरे गटाकडून सतत सुरू असताना असाच एक डाव उधळून लावण्यात आला आहे. गेली 9 महिने सातत्याने पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपुख्यमंत्री यांना सोशल मीडियावर अपशब्द वापरून त्यांना बदनाम करण्याचे काम ठाण्यातील ठाकरे गटाची महिला रोशनी शिंदे हे करत होत्या. त्यामुळें याचा जाब विचारण्यासाठी सोमवारी शिंदे गटाच्या महिला रोशनी शिंदे यांच्याकडे गेल्या होत्या, त्यावेळी थोडी बाचाबाची झाली त्यांनतर त्याचे रूपांतर धक्काबुक्की मध्ये झाले. तू अस करू नको, तुला फायदा घेऊन काही मंडळी घेत आहेत अस यावेळी शिंदे गटाच्या महिलांनी सांगितले. मात्र या घटनेचा फायदा घेत महिलेला पुढे करत बनवा रचण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचे नाव खराब करण्यासाठी ठाकरे गटाने रचलेला डाव फसला आहे.

अरविंद सावंत यांनी केलेल्या वक्तव्या विरोधात रिक्षा चालक आक्रमक: ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षपार्ह वक्तव्य करून रिक्षाचालक शब्द वापरून हिणवले होते. याच वक्तव्याचा विरोधात सोमवारी ठाण्यात रिक्षाचालकांनी एकत्र येत अरविंद सावंत यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला. काँग्रेस-राष्ट्रवादीत नेते रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करणार का? असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी म्हणत उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होण्याची विनंती केली होती, असे अरविंद सावंत यांनी वक्तव्य केले होते. मात्र रिक्षावाला हा शब्द शरद पवारांनी वापरलाच नसल्याचे राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सांगितल्यानंतर अरविंद सावंत यांचा बुरखा फाटला. दरम्यान अरविंद सावंत यांच्या वक्तव्याच्या विरोधात ठाण्यातील रिक्षा चालक संघटना एकत्रित येऊन अरविंद सावंत यांचा चांगला समाचार घेतला आहे.

हेही वाचा: Eknath Shinde On Pawar पवार अभ्यास करूनच बोलतात तुम्ही त्यांचे म्हणणे ऐकून घ्या अदानी प्रकरणी मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.