ETV Bharat / state

Kalyan Crime : अल्पवयीन मुलीवर चौघांचा सामूहिक बलात्कार, इन्स्टाग्रामवर केला संपर्क - Gang Rape of a Minor Girl In Kalyan

कल्याणमध्ये राहणाऱ्या पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर चार नराधमांनी आळीपाळीने बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुन्हा कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून, एकाची बालसुधार गृहात रवानगी केली आहे.

Kalyan Crime News
सामूहिक बलात्कार करणारे चार नराधम अटक
author img

By

Published : Apr 27, 2023, 10:34 PM IST

माहिती देताना पोलीस

ठाणे : कल्याण पूर्वेत राहणाऱ्या एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बहाण्याने बोलवून मित्राच्या घरी नेऊन सतत दोन दिवस अळीपाळीने चार नराधमाने सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात सामूहिक बलात्कारासह पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दखल करून चारही नराधमांना पोलिसानी बेड्या ठोकल्या आहेत. साहिल राजभर (वय 18) , सुजल रमेश गवती ( वय 20 ) विजय राजेश बेरा (वय 21) आणि एक अल्पवयीन मुलगा असे नारधामाची नावे आहेत.

इंस्टाग्रामवर पीडित मुलीशी संपर्क: पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार पीडित अल्पवयीन १५ वर्षीय मुलगी ही कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुटूंबासह राहते. तर आरोपी पैकी एक तिचा मित्र आहे. त्यातच २४ एप्रिल रोजी पीडित मुलीला आरोपी पैकी एकाने इंस्टाग्रामवर पीडित मुलीशी संपर्क करून माझ्या प्रेयसीला संशय आहे कि, माझे प्रेम तुझ्यावर आहे, तर प्लिज तिला येऊन सांग कि, आमच्या दोघांचे तसे काही नाही केवळ मैत्री आहे. असे बोलून पीडित मुलीला बोलावले होते. त्यानंतर एका मित्राच्या घरी तिच्यावर चार आरोपींनी अळीपाळीने सामूहिक बलात्कार केला.

मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार: दरम्यान, पीडित मुलगी बाहेर गेली पण बराच वेळ झाला घरी आली नाही म्हणून, घरच्यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिली. तक्रारींचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी पीडित मुलीचा शोध सुरू केला. या दरम्यानच्या काळात आरोपींनी दुसऱ्या दिवशीही दुसऱ्या मित्राच्या खोलीवर नेऊन पुन्हा तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर २६ एप्रिल रोजी पीडित मुलगी कल्याण रेल्वे स्थनाकात कोळसेवाडी पोलिसांना आढळून आली.

सामूहिक बलात्कार केला: पोलिसांनी तिच्याकडे अधिक चौकशी केली असता सामूहिक बलात्काराचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर पीडित मुलीच्या तक्रारीवरून चार नराधम मित्रांवर भादंवि कलम ३७६, आणि पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला असता, १२ तासाच्या आतच चारही नराधमांना अटक करून आज कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता अधिक पोलीस कोठडी सुनावली आहे.तर एका अल्पवयीन आरोपीची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास कोळसेवाडी पोलीस करीत आहेत.

हेही वाचा: Thane Crime धावत्या एक्सप्रेसमध्ये प्रवाशांची लूटमार करणारी सराईत चौकडी गजाआड १० लाखांचा मुद्देमालही जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.