ETV Bharat / state

ठाण्यातील व्यावसायिकाला मागितली तब्बल ५७१ कोटींची खंडणी

खंडणी मागितल्या प्रकरणी प्रसिद्ध लोढा ग्रुपच्या एका भागीदाराने मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. खंडणीखोराने तब्बल ५७१ कोटींची खंडणी मागितली आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र
author img

By

Published : Jun 8, 2019, 8:00 PM IST

ठाणे - खंडणी मागितल्या प्रकरणी प्रसिद्ध लोढा ग्रुपच्या एका भागीदाराने मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. खंडणीखोराने तब्बल ५७१ कोटींची खंडणी मागितली आहे. आतापर्यंतच्या गुन्हेगारी जगतातील सर्वात मोठ्या खंडणीच्या गुन्ह्याने व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. विकास बागचंदका असे खंडणीचा गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

मानपाडा पोलीस ठाणे

गुन्हा दाखल होताच पोलिसांनी खंडीणीखोराचा तपास सुरू केला आहे. लोढा ग्रुपचे ग्राहक सेवा अधिकारी सुरेंन्द्रन नायर (रा. मानपाडा रोड, अयोध्यानगरी) यांनी या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. नायर सोमवारी ९ वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पूर्वेकडील निळजे लोढा, हेवन ग्रीन पार्क येथील कार्यलयात बसले होते. त्यावेळी नायर यांच्या व्हॉटसअॅपवर कंपनीची बदनामी करत ५७१ कोटी ३३ लाखांची मागणी केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

खंडणीची रक्कम दिली नाही तर जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच कंपनीच्या अधिकाऱ्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. दरम्यान, खंडणी व धमकीचा व्हॉटसअॅपवर मेसेज येताच नायर यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेवून विकास बागचंदका यांच्या विरोधात खंडीणी व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास एपीआय जाधव करीत आहेत.

अबब ! बांधकाम व्यवसायिकाकडे मागितली ५७१ कोटींची खंडणी; सर्वात मोठ्या खंडणीच्या गुन्ह्याने व्यावसायिकांमध्ये खळबळ  

ठाणे : तब्बल ५७१ कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी प्रसिद्ध लोढा ग्रुपच्या भागीदाराने मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे आतापर्यंतच्या गुन्हेगारी जगतातील सर्वात मोठ्या खंडणीच्या गुन्ह्याने व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. विकास बागचंदका असे खंडणीचा गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी खंडीणीखोराचा तपास सुरु केला आहे.    

पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार डोंबिवली पूर्वेकडील मानपाडा रोड अयोध्यानगरी अंबिका टोवर येथे राहणारे लोढा ग्रुपचे सिनियर वाईस प्रेसिडट ग्राहक सेवा सुरेन्द्रन नायर यांनी मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीत नायर सोमवारी नऊ वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पूर्वेकडील निळजे लोढा हेवन ग्रीन पार्क येथील कार्यलयात बसले होते.

त्यावेळी तक्रारदार नायर यांच्या व्हाटसअपवर कंपनीची बदनामी करत ५७१ कोटी ३३ लाखांची मागणी केली. आणि जर खंडणीची रक्कम दिली नाही तर कंपनी व कंपनीच्या अधिकाऱ्यांना खोट्या गुन्ह्यात अडकून कोठडीत डांबून ठेवण्याची व जीविताची वाताहत करण्याची धमकीचे मेसेज व्हाटसअपवर पाठवल्याचे पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रार नमूद केले आहे. दरम्यान, खंडणी व धमकीचा व्हाटसअपवर मेसेज येताच नायर यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेवून विकास बागचंदका यांच्या विरोधात खंडीणी व धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास एपीआय जाधव करीत आहेत.

I’m protected online with Avast Free Antivirus. Get it here — it’s free forever.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.