ETV Bharat / state

भिवंडी एमआयएम शहराध्यक्षावर बलात्कारापाठोपाठ खंडणीचा पाचवा गुन्हा दाखल - Bhiwandi crime news

भिवंडीतील विविध पोलीस ठाण्यांत खंडणी उकळल्या प्रकरणी गुन्हे दाखल असलेल्या एमआयएम शहराध्यक्ष खालिद गुड्डू याच्याविरोधात आता भिवंडीत बलात्कार तसेच निजामपुरा येथे खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे.

ransom and rape case filled against MIM city president in bhiwandi

author img

By

Published : Oct 5, 2020, 4:07 PM IST

ठाणे - खंडणी उकळल्याप्रकरणी भिवंडी शहरातील विविध पोलीस ठाण्यांत आधीच गुन्हे दाखल असलेल्या एमआयएम शहराध्यक्ष खालिद गुड्डू याच्याविरोधात आता भिवंडी शहर पोलीस ठाण्यात बलात्काराचा तर, निजामपुरा पोलीस ठाण्यात खंडणीचा पाचवा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे खंडणी प्रकरणाचा सूत्रधार असलेल्या खालिद गुड्डू याच्यावर मोठी कारवाई अटळ आहे.

भिवंडीतील अवचित पाडा येथील कलिम अहमद मोहम्मद मोबिन अन्सारी याने आपल्या सर्व्हे क्रमांक ४७, सिटी सर्व्हे क्रमांक ४३६४ या जागेवर इमारत उभारणीचे काम सुरू केले असता आरोपी खालिद गुड्डू याचे साथीदार अब्दुल्ला अब्दुल लतीफ सय्यद आणि हमीद शेख यांनी इमारत बांधकामाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करून केली होती. तसेच अन्सारी यांना इमारत पडण्याची कारवाईची भीती दाखवत बरे-वाईट करण्याचीही धमकी दिली आणि कारवाई टाळायची असेल तर पुनर्विचार याचिका मागे घेण्यासाठी दहा लाख रुपयांची खंडणी मागितली. अन्सारी यांनी पाच रुपयांची खंडणी दिली. याबद्दल अन्सारी यांनी निजामपूरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

या तक्रारीवरून पोलिसांनी खालिद गुड्डूसह साथीदार अब्दुल्ला अब्दुल लतीफ सय्यद व हमीद शेख यांच्या विरोधात भांदवी कलम ३८४ , ३८५ ,३८६ ,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून खालिद गुड्डू व हमीद शेख यांना यापूर्वीच खंडणीच्या इतर गुन्ह्यात अटक केली आहे.

दुसऱ्या एका घटनेत, भिवंडीतीलच २७ वर्षीय महिलेने अटकेत असलेल्या पतीस जामीन मिळवून देण्याची मदत मागितली असता डिसेंबर २०१६ ते डिसेंबर २०१७ या काळात त्याने वेळोवेळी समदनगर येथील कार्यालयात व धामणकर नाका येथील स्टार हॉटेलवरील कार्यालयात पीडित महिलेस वेळोवेळी बोलावून तिच्याशी शारीरिक लगट करत गैरवर्तन केले. या प्रकरणी पीडित महिलेने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता पोलिसांनी त्याच्या विरोधात पोलिसांनी भांदवी कलम ३७६ ,३५४ ,३८४ प्रमाणे बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.