ETV Bharat / state

गड-किल्ले भाड्याने देण्यापेक्षा मंत्र्यांचे बंगले द्या - राज ठाकरे - बैठक रद्द

राज ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकासाठी ते डोंबिवलीत आले होते. मात्र, बैठकीसाठी येताना वाहतूक कोंडीत अडकल्याने त्यांना याचा फटका बसला. त्यामुळे त्यांनी शनिवारची बैठक रद्द केली.

राज ठाकरे
author img

By

Published : Sep 7, 2019, 9:00 PM IST

Updated : Sep 7, 2019, 9:30 PM IST

ठाणे - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या गड किल्ले भाड्याने देण्याच्या धोरणावर राज्यभरातून टीका होत आहे. आज डोंबिवलीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील सरकारच्या भूमिकेवर सडकून टीका केली. सरकारला उत्पन्न मिळवायचे असेल तर त्यांनी मंत्र्यांचे बंगले भाड्याने द्यावे, असे राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे, अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

हेही वाचा- मुंबईत मोदींच्या हस्ते तीन मेट्रो मार्गिकांचे भूमिपूजन; औरंगाबादलाही जाणार

त्यांनी सरकारचा हा निर्णय केवळ मूर्खपणाचा असल्याचे म्हणत सरकारचे वाभाडे काढले. ते म्हणाले की, महाराष्ट्राला भूगोल आणि इतिहास आहे. मात्र, सरकारला याचे काहीच देणे-घेणे नाही. जर सरकारला उत्पन्न हवे असेल, तर त्यांनी त्यांच्या मंत्र्यांचे बंगले भाड्याने द्यावे, त्यातून त्यांनी पैसे मिळवावेत. भाजप मशीनच्या मदतीने निवडून येते. त्यामुळे ते लोकांना विचारात घेत नाही. राज ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकासाठी डोंबिवलीत आले होते. मात्र, बैठकीसाठी येताना वाहतूक कोंडीत अडकल्याने त्यांना याचा फटका बसला. त्यामुळे त्यांनी शनिवारची बैठक रद्द केली.

हेही वाचा- 'इम्तियाज जलीलांच्या वैयक्तिक महत्त्वकांक्षेमुळे वंचित, एमआयएममध्ये बेबनाव'

विशेष म्हणजे राज ठाकरे डोंबिवलीत येणार म्हणून रस्ते विकास महामंडळाने कल्याण-शीळ मार्गावरील रस्त्यावर जागोजागी पडलेले खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले आहे. तरीही राज ठाकरे यांना कल्याण शीळ मार्गावरील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. राज ठाकरे यांचा गाड्यांचा ताफा काही काळ काटई नाका येथील वाहतूक कोंडीत अडकून पडला होता. त्यानंतर राज ठाकरे यांनी मनसेचे नेते राजू पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन रेम्बो या श्वानाची भेट घेतली. तसेच राजू पाटील यांचे मोठे भाऊ यांच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले.

दरम्यान, आज रद्द केलेली बैठक उद्या सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरणार आहे, अशी माहिती मनसेच्या सूत्रांनी दिली आहे.

Intro:किट नंबर 319

Body:गड-किल्ले देण्यापेक्षा तुमच्या मंत्र्यांचे बंगले भाड्याने द्या ,, राज ठाकरे

ठाणे : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या सरकारच्या गड किल्ले भाड्याने देण्याच्या धोरणावर राज्यभरातून टीका होत आहे, आज डोंबिवलीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील सरकारच्या भूमिकेवर सडकून टीका केली. सरकारला उत्पन्न मिळवायचे असेल तर त्यांनी मंत्र्यांचे बंगले भाड्याने द्यावे अशा शब्दात राज ठाकरे यांनी फडवणीस सरकारच्या गड-किल्ले धोरणावर खरपूस टीका केली.

राज ठाकरे यांनी सरकारचा हा निर्णय केवळ मूर्खपणाचा असल्याचे म्हणत सरकारचे वाभाडे काढले. ते म्हणाले की, महाराष्ट्राला भूगोल आणि इतिहास आहे . मात्र सरकारला याचे काहीच देणे-घेणे नाही. जर सरकारला उत्पन्न हवे असेल तर त्यांनी त्यांच्या मंत्र्यांचे बंगले भाड्याने द्यावे, त्यातून त्यांनी पैसे मिळवावेत , भाजप मशीनच्या मदतीने निवडून येते. त्यामुळे ते लोकांना विचारात घेत नाहीत. राज ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकासाठी डोंबिवलीत आले होते. मात्र बैठकीसाठी येताना वाहतूक कोंडीत अडकल्याने त्यांना याचा फटका बसला, त्यामुळे त्यांनी शनिवारची होणारी बैठक रद्द केली.
विशेष म्हणजे राज ठाकरे डोंबिवलीत येणार म्हणून रस्ते विकास महामंडळाने कल्याण - शीळ मार्गावरील रस्त्यावर जागोजागी पडलेले खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले. मात्र तरीही राज ठाकरे यांना कल्याण शीळ मार्गावरील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. राज ठाकरे यांचा गाड्यांचा ताफा काही काळ काटई नाका येथील वाहतूक कोंडीत अडकून पडला होता. त्यानंतर राज ठाकरे यांनी मनसेचे नेते राजू पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन रेम्बो या श्वनाची भेट घेतली, तसेच राजू पाटील यांचे मोठे भाऊ यांच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले.

दरम्यान, आज रद्द केलेली बैठक उद्या सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आली आहे, या बैठकीत ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत तसेच आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरणार आहेत , अशी माहिती मनसेच्या सूत्रांनी दिली आहे.
सर, राज ठाकरेंची बाईट व्हाट्सपवर पाठवली आहे, कृपया बातमीत वापरणे,

Conclusion:
Last Updated : Sep 7, 2019, 9:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.