ETV Bharat / state

Ganeshotsav 2023 : कोकणातला गणेशोत्सव, रेल्वे प्रवासावर दलालांचा डल्ला, मनसे आमदारांची रेल्वे राज्यमंत्र्यांकडे धाव

गणरायाच्या आगमनाच्या दोन दिवस अगोदर म्हणजेच 17 सप्टेंबर, शुक्रवारी रेल्वेचे आरक्षण अवघ्या काही मिनिटांत फुल झाले आहे. चाकरमान्यांनी गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याची तयारी सुरू केली असतानाच दलालांमुळे कोकणात जाणे कठीण होणार आहे. त्यामुळे या आरक्षित तिकिटांचा फेरआढावा घेण्यात यावा अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना पत्र लिहून केली आहे.

Ganeshotsav
Ganeshotsav
author img

By

Published : May 21, 2023, 7:24 PM IST

ठाणे : गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांनी कोकणात जाण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, यंदाही तिकीट दलालांमुळे कोकणची वाट चांगलीच कठीण होणार असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे गणरायाच्या आगमनाच्या दोन दिवस अगोदर म्हणजेच 17 सप्टेंबर, शुक्रवारी रेल्वेचे आरक्षण अवघ्या काही मिनिटांत भरले आहे. आता कोकण रेल्वे, कोल्हापूरकडे जाणाऱ्या गाड्यांचे एकही आरक्षित तिकीट शिल्लक नाही. त्यामुळे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी या आरक्षित तिकिटांचा आढावा घेऊन कोकणवासीयांना श्रीगणेशाची यात्रा करता यावी यासाठी कोकणवासीयांसाठी नवीन गाड्यांचे नियोजन केले आहे.

रावसाहेब दानवे यांना पत्र : मनसे आमदार राजू पाटील यांनी यासाठी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे धाव घेतली आहे. गणपतीच्या दिवसात हजारो मुंबईकर कोकणात जाणाऱ्या गाड्यांवर अवलंबून असतात. 17 सप्टेंबरच्या प्रवास तारखेच्या 120 दिवस आधी, शुक्रवारी आरक्षणे उघडली. मात्र, पहिल्या दिवशी अवघ्या तीन मिनिटांत आरक्षण पूर्ण झाल्याने चाकरमान्यांमध्ये निराशा पसरली आहे. त्यामुळे गणरायाच्या स्वागतासाठी गावोगाव जाणाऱ्या कोकणवासीयांच्या नजरा आता गणपती स्पेशल रेल्वे गाड्यांकडे लागल्या आहेत. मात्र, रेल्वेकडून अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आली नसल्यामुळे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना पत्र लिहून मागणी केली आहे.

नव्या गाड्यांचे नियोजन करा : या पत्रात आमदार पाटील यांनी कोकणवासीयांच्या व्यथा मांडल्या आहेत. दरवर्षी अशीच परिस्थिती निर्माण होते. मात्र रेल्वे मंत्रालय यावर कोणत्याही प्रकारची उपाययोजना करत नाही. त्यामुळे आज सर्व आरक्षण दलालांच्या हाती असून परदेशातून तिकिटे बुक केली जातात, असे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे. असे असतानाही मंत्रालय गांभीर्याने घेत नाही. त्याची कधीही चौकशी होत नसल्याने दलालांना संधी मिळत आहे. गौरी गणपतीच्या मुहूर्तावर जाणाऱ्या सर्व भाविकांना आरक्षण मिळावे. कोकणवासीयांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी सर्व रेल्वे गाड्यांच्या आरक्षणाचा आढावा घेऊन नव्या गाड्यांचे नियोजन करण्याची मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.

हेही वाचा -

  1. Arvind Kejriwal : केजरीवाल मुंबईत घेणार शरद पवार, उद्धव ठाकरेंची भेट, केंद्राच्या 'या' अध्यादेशाविरोधात समर्थन मागणार
  2. Sameer Wankhede CBI Inquiry : समीर वानखेडेंची दुसऱ्या दिवशीही सीबीआयकडून पाच तास चौकशी; म्हणाले, न्याय व्यवस्थेवर विश्वास....
  3. Sexual Assault Case Thane : ठाण्यात ६ वर्षीय मुलीचा विनयभंग, खून प्रकरणात पोलीस अपयशी, आरोपी निर्दोष

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.