ETV Bharat / state

कोरोना काळात देखील पोलिओ लसीकरण आवश्यक- आयुक्त डॉ. पंकज आशिया - Polio Vaccination Bhiwandi

पल्स पोलिओ उपक्रमाबरोबरच 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या योजनेची देखील माहिती देण्यात आली. याबाबत आयुक्त यांनी सर्व उपस्थितांना माझे कुटुंब माझी जबाबदारी याबाबत प्रतिज्ञा दिली.

पोलिओ लसीकरण
पोलिओ लसीकरण
author img

By

Published : Sep 20, 2020, 4:51 PM IST

ठाणे- पल्स पोलिओ लसीकरण मोहीम बालकांसाठी अतिशय आवश्यक आहे. कोरोना काळामध्ये त्याची अधिक आवश्यकता असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे, कोणत्याही परिस्थितीत लसीकरण टाळू नका. प्रत्येक ० ते ५ वयोगटातील सर्व बालकांना पोलिओची लस द्या, असे आहावन भिवंडी पालिका आयुक्त डॉक्टर पंकज आशिया यांनी केले आहे.

माहिती देताना आयुक्त डॉ. पंकज आशिया

२०२० या वर्षातील पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेची सुरुवात आयुक्त पंकज आशिया यांच्या हस्ते स्वर्गीय इंदिरा गांधी रुग्णालयात पार पडली. येथे डॉक्टर आशिया म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत शून्य ते पाच वयोगटातील सर्व मुलांचे लसीकरण करणे आवश्यक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पल्स पोलिओ मोहीम चांगल्या प्रकारे शहरात राबवण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय नियमांचे व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून पल्स पोलिओ मोहीम यशस्वी करायची आहे. आज व या पुढील ५ दिवस, म्हणजेच २१ ते २५ तारखेच्या दरम्यान वैद्यकीय विभागातील कर्मचारी पथक घरोघरी जाऊन पोलिओ लसीकरण करणार आहे. त्यावेळी त्यांना सहकार्य करावे व आपल्या घरातील सर्व पाच वर्षापर्यंतच्या मुलांना पल्स पोलिओ लस देण्यात यावी, असे आवाहन आयुक्त आशिया यांनी केले.

पल्स पोलिओ उपक्रमाबरोबरच 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या योजनेची देखील माहिती देण्यात आली. याबाबत आयुक्त यांनी सर्व उपस्थितांना माझे कुटुंब माझी जबाबदारी बाबत प्रतिज्ञा दिली. शासनाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून आपल्या कुटुंबाचे रक्षण करावे, असे आवाहन पालिका आयुक्त पंकज आशिया यांनी केले. याप्रसंगी पालिका आयुक्त यांच्या हस्ते पाच लहान मुलांना पोलिओ लस देण्यात आली. यावेळी पालिका आयुक्त यांनी इंदिरा गांधी रुग्णालयाची व कोविड रुग्णालयाची पाहणी केली.

याप्रसंगी पालिका मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नितीन मोकाशी, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बुशरा सय्यद, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जयवंत धुळे, जागतिक आरोग्य संघटनेचे भिवंडीचे समन्वयक डॉक्टर किशोर चव्हाण, जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले उपस्थित होते.

हेही वाचा- तलावात उडी मारून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसाने वाचवले प्राण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.