ETV Bharat / state

विशेष : ‘लॉकडाऊन’मुळे भिवंडीतील यंत्रमाग उद्योग मृत्यूशय्येवर !

लॉकडाऊनमुळे मंदीच्या यंत्रमाग व्यवसाय सापडला आहे. २० हजार कोटींचे वार्षिक टर्न ओव्हर आणि प्रतिदिन ३ कोटी मीटर सुती कापडाचे उत्पादन करणाऱ्या भिवंडी शहरातील यंत्रमाग व्यवसायाला लॉकडाऊनमुळे सुमारे ५ लाख यंत्रमागांची धडधड ठप्प झाल्याने कापड उद्योग शेवटची घटका मोजू लागला आहे.

Powerloom industry in crises
‘लॉकडाऊन’मुळे भिवंडीतील यंत्रमाग उद्योग मृत्यू शय्येवर
author img

By

Published : Apr 9, 2020, 10:12 PM IST

ठाणे : आदी नोटबंदी त्यानंतर सीएसटी आणि आता लॉकडाऊनमुळे मंदीच्या यंत्रमाग व्यवसाय सापडला आहे. २० हजार कोटींचे वार्षिक टर्न ओव्हर आणि प्रतिदिन ३ कोटी मीटर सुती कापडाचे उत्पादन करणाऱ्या भिवंडी शहरातील यंत्रमाग व्यवसायाला लॉकडाऊनमुळे सुमारे ५ लाख यंत्रमागांची धडधड ठप्प झाल्याने कापड उद्योग शेवटची घटका मोजू लागला आहे.

जीवघेण्या कोरोना व्हायरसने डिसेंबरमध्ये चीनच्या वुहान शहरात थैमान घालून हजारो नागरिकांचे बळी घेतल्याचे जगासमोर आले. त्यानंतर जागतिक पातळीवर या कोरोनाने थैमान घातल्याने अनेक देशांनी चीन देशाशी आयात निर्यात बंद केली. त्यामुळे चीनचा वस्त्रोद्योग व्यवसायासोबतच अन्य व्यवसायातील दबदबा कमी झाला. ही संधी भारताच्या पथ्यावर पडणारी होती. भारतात देशांतर्गत व अरब राष्ट्रांमध्ये सुती कापडाची मागणी वाढू लागली होती. त्यामुळे अनेक वर्षांपासून मंदीच्या विळख्यात सापडलेल्या यंत्रमाग व्यवसायाला सुगीचे दिवस येणार असे कापड व्यावसायिकांना वाटत होते. मात्र याच काळात कोरोनाने भारतातही हातपाय पसरण्यास सुरुवात केली. त्यामुळे सतर्क झालेल्या केंद्र व राज्य सरकारांनी जीवितहानी टाळण्यासाठी तात्काळ जमावबंदी ,संचारबंदी व त्यापाठोपाठ राज्य ,जिल्हा ,तालुका व गांव पातळीवर सीमा (लॉकडाऊन) सीलबंद करण्याचा निर्णय जाहीर केला.

‘लॉकडाऊन’मुळे भिवंडीतील यंत्रमाग उद्योग मृत्यू शय्येवर

मात्र या निर्णयामुळे भिवंडी शहर व ग्रामीण परिसरातील ५ लाख यंत्रमागांची धडधड ठप्प झाली आहे. देशभरातील सुती कापड निर्यात भिवंडी शहरातून ७ टक्के केली जात होती. ती आता ३ टक्क्यांवर येऊन ठेपली आहे. आशिया खंडासह फ्रांस ,इटली ,अमेरिका ,रशिया आदी देशांमध्येदेखील भिवंडीतील सुती कापड निर्यात केले जात होते. तर लॉकडाऊनमुळे यंत्रमाग कारखाने बंद ठेवावे लागले आहेत. या व्यवसायाशी निगडीत असलेले साखळी पद्धतीने चालणारे छोटे व्यावसायिक जसे बीम चालक, वारपीन ,ट्विस्टिंग, डबलिंग ,वाईडींग ,फोल्डिंग, साईजिंग ,प्रोसेस हाऊस ,ट्रान्सपोर्ट आदी हजारो नागरिक बेरोजगार झाले आहेत. या व्यवसायावर अवलंबून असलेल्यांचा रोजगार एका झटक्यात हातचा निघून गेल्याने शेकडो कुटुंबांवर रोजच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर यंत्रमाग कारखान्यात काम करणाऱ्या सुमारे चार लाख कामागरांपैकी २ लाख कामगारांनी लॉक डाउनच्या पूर्वीच आपले घर गाठले आहे. तर २ लाख कामगार आजही भिवंडीत अडकून पडले आहेत.

जर १४ एप्रिलला लॉकडाऊन उठवण्यात आले तर हे अडकलेले यंत्रमाग कामगार आपल्या कुटुंबियांच्या व्याकुळतेने त्यांना भेटण्यासाठी जीवाचा आटापिटा करीत आपले घर गाठण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे कामगारांअभावी लॉकडाऊन संपल्यावरदेखील यंत्रमाग व्यवसाय सावरेल याची सुतराम शक्यता वाटत नाही. भिवंडी शहराची मुख्य ओळख यंत्रमाग नगरी म्हणून अशी आहे. मात्र सद्य स्थितीत संपूर्ण यंत्रमाग कारखाने बंद असल्याने शहराची अर्थ व्यवस्थाच कोलमडून पडली आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने यंत्रमाग व्यवसायासाठी विशेष पॅकेज घोषित करून यंत्रमाग व्यासायिकांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे.

कोरोना व्हायरसमुळे कापड उद्योगाला घरघर ..

व्यवसायाचे अभ्यासक म्हणून ओळख असलेले भिवंडीतील माजी आमदार रशीद ताहीर यांच्या म्हणण्यानुसार देशातील शेती या व्यवसायानंतर सर्वात जास्त रोजगार उपलब्ध करणारा व्यवसाय हा यंत्रमाग व्यवसाय आहे. मात्र या व्यवसायाकडे सरकार वस्त्रोद्योगनिती अवलंबत नसल्याने या उद्योगाची दुर्दशा झाली आहे. त्यातच वीज बिलात झालेली वाढ ,जीएसटी आणि नोटबंदी यामुळे यंत्रमाग व्यवसाय डबघाईला आलेला आहे. त्यातच कोरोनाचे संकट ओढवले आहे. त्यामुळे यंत्रमाग व्यवसाय आणखी काही वर्षे रुळावर येईल असे वाटत नाही.

तर भिवंडी पॉवरलूम विव्हर्स फेडरेशनचे अध्यक्ष युसूफ हसन मोमीन यांनी 'ई टीव्ही भारत' शी बोलताना सांगितले की आज कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे यंत्रमाग कारखाने बंद आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून यंत्रमाग व्यवसाय मंदीच्या व्हायरसने संक्रमित झालेला आहे. यापूर्वी भिवंडीत ८ लाखांच्या पेक्षा अधिक यंत्रमाग होते. मात्र काही कारखाना मालकांनी कारखाने बंद करून यंत्रमाग सामुग्री २८ रुपये किलोच्या भावाने भंगारात विकून यंत्रमाग व्यवसाय बंद केला आहे. असे असताना कोरोनाने धुमाकूळ घातल्याने उरलेले यंत्रमाग स्मशानात गाढावे लागणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

लॉकडाऊनमुळे लाखो नागरिक बेरोजगार ?

भिवंडी शहरातील गौरव टेक्सटाईलचे प्रोप्राइटर महावीर प्रसाद झंवर यांच्या म्हणण्यानुसार लॉकडाऊनमुळे यंत्रमाग कारखाने बंद असल्याने लाखो नागरिक बेरोजगार झाले आहेत. लॉकडाऊन संपल्यावर देखील यंत्रमाग चालवणे कठीण होणार आहे. यापूर्वी कारखानदार व्याज अथवा दागिने गहाण ठेवून वीज बिल भरत होते. मात्र भविष्यात आणखीन संकट उभी राहणार आहेत . कारखाने बंद असल्याने मजुरांचे मोठे हाल होत आहेत. लॉकडाऊनच्या अगोदर काही मजूर उसनवारीने पैसे घेऊन आपल्या मूळगावी गेले आहेत. तर अडकून राहिलेले मजूर लॉक डाऊन उठताच मूळ गांवी निघून जाणार आहेत. त्यामुळे यंत्रमाग व्यवसाय यापुढेही बंदच राहणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.