ETV Bharat / state

Political Journey : डोंबिवलीचे भाजप आमदार वींद्र चव्हाण यांची मंत्रीमंडळात लागणार वर्णी, जाणून घ्या राजकीय प्रवास - महाराष्ट्र प्रदेश महामंत्री

शिंदे सरकारमध्ये भाजपच्या वतीने पुन्हा एकदा डोंबिवलीचे भाजप आमदार रवींद्र चव्हाण ( Dombivli BJP MLA Ravindra Chavan ) यांची मंत्रीमंडळात वर्णी लागल्याचे संकेत मिळत आहे. या पार्श्ववभूमीवर त्यांच्या जीवनातील राजकीय प्रवासावर ( Political Journey ) एक नजर.

Etv BharFormer Minister of State Ravindra Chavanat
Etv Bharaमाजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण t
author img

By

Published : Aug 5, 2022, 11:46 AM IST

ठाणे - शिंदे सरकारमध्ये भाजपच्या वतीने पुन्हा एकदा डोंबिवलीचे भाजप आमदार रवींद्र चव्हाण ( Dombivli BJP MLA Ravindra Chavan ) यांची मंत्रीमंडळात वर्णी लागल्याचे संकेत मिळत आहे. आमदार तथा माजी राज्यमंत्री चव्हाण यांचा जन्म तळ कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पेंडूर गावात झाला. तर त्याचे बालपण मुंबईत भांडुप परिसरात गेले. त्यानंतर चव्हाण हे आई वडिलांच्या सोबत डोंबिवलीत स्थाईक झाले. त्यांना तरुण वयात डोंबिवलीतील सुशिक्षित, सुसंस्कृत आणि शांतताप्रिय लोकांचा सहवास लाभला आणि मुख्यत रा.स्व.संघ आणि भाजपाचे भारतीयत्वाचे संस्कार त्यांच्यावर झाले.

त्यानंतर राजकीय प्रवास सुरु झाला - २००२ साली भारतीय जनता युवा मोर्चाचे कल्याण उपजिल्हाध्यक्ष पदावर त्यांची नेमणूक झाली. तर २००५ साली डोंबिवलीतील सावरकर रोड प्रभागातून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत ( Kalyan Dombivli Municipal Corporation ) नगरसेवक म्हणून प्रथम निवडून आले. २००७ साली कल्याण डोंबिवली महानगरपालिका स्थायी समिती सभापतीपदावर विराजमान झाले. नगरसेवक पदावर कार्यरत असतानाच २००९ साली डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचा ( Dombivli Vidhan Sabha Constituency ) पहिला आमदार होण्याचा मान त्यांना मिळाला. २०१४ व त्यानंतर २०१९ साली झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ( Maharashtra Assembly General Election ) कोकण पट्ट्यातील सर्वाधिक मताधिक्य मिळवून देऊन डोंबिवलीकरांनी सलग तिसऱ्यांदा त्यांना आमदार म्हणून निवडून दिले. दरम्यान, २०१६ साली महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून शपथ घेऊन महाराष्ट्र सरकारच्या ४ खात्यांची त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. त्यामध्ये बंदरे, माहिती व तंत्रज्ञान, वैद्यकीय शिक्षण तसेच अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण या खात्याचा राज्यमंत्री म्हणून युतीच्या काळात कार्यरत होते.

दुसऱ्यांदा मंत्री पदाची शपथ घेणार - राज्यात भाजप शिवसेना युती तुटली आणि राज्यात महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आले. सध्या आमदार असतानाच, त्यांना २०२० साली भाजपा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री ( Maharashtra Pradesh Chief Minister ) म्हणून नेमणूक झाली. अश्या कौटुंबिक राजकीय वारसा नसलेल्या भाजप आमदाराला आता पुन्हा शिंदे सरकार मध्ये मंत्रीमंडळात स्थान मिळत असल्याचे संकेत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून दिल्याने ते दुसऱ्यांदा मंत्री पदाची शपथ घेणार आहेत.

हेही वाचा -MNS BJP Morcha : कल्याण डोबिंवलीतील पाणी प्रश्नावरुन भाजपा-मनसेचा महापालिकेवर संयुक्त मोर्चा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.