नवी मुंबई - मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच आहे. आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास महामार्गावर गस्त घालणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला कंटेनरची जोरदार धडक बसली.या अपघातात पोलिसाचा जागीच मृत्यू झालाय. पनवेल हद्दीत हा अपघात झाला. सचिन सोनवलकर असं या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मुंबईहून पुण्याकडे जात असलेल्या मालवाहू ट्रकला मागून येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली. त्यानंतर चालकाचे नियत्रण सुटून कंटेनर पोलिसाच्या दुचाकीला धडकले. या अपघातात सोनवलकर यांचा जागीच मृत्यू झालाय. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक विभागाचे ठाणे डिव्हिजनचे पोलीस अधिक्षक दिगंबर प्रधान यांच्यासह ईतर अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास पोलीस करत आहेत.