ठाणे - ठाणे महानगरपालिकेच्या कोविड रुग्णालयात काल(मंगळवार) रात्री दारू, तंबाखूजन्य पदार्थ नेणाऱ्या व्यक्तीला सुरक्षा विभागाच्यावतीने पोलिसांच्या ताब्यात देऊन कोटपा-2003 कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
काल 5 ऑक्टोबर रोजी कोविड रुग्णालयात दारू, तंबाखू इत्यादी प्रतिबंधित वस्तू नेताना एका व्यक्तीस सुरक्षा अधिकारी मच्छिंद्र थोरवे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पकडले. संबंधित व्यक्तीस उपआयुक्त केळकर यांच्यासमोर हजर करून सूचनेनुसार सदर व्यक्तीला पुढील कारवाईसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करून कायद्याचे उल्लघंन करणाऱ्यांवर सिगारेट - तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंध कायदा 2003 (कोटपा) अंतर्गत कडक कारवाई करण्यात येते. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्याकडून दंड वसूल करण्याबरोबरच फौजदारी कारवाई देखील करण्यात येते. सदर प्रकरणी कोटपा कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येत आहे.
हेही वाचा - दुचाकीवरून धूम स्टाईलने नागरिकांचे मोबाईल पळविणारा चोरटा गजाआड