ठाणे: भिवंडी तालुक्यातील दापोडे रोड असलेल्या सपना लेडीज बारमध्ये ऑर्केस्ट्राच्या नावाने सुरू असलेल्या डान्स बारमध्ये रात्री उशिरापर्यंत बार सुरू असायचे. येथे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तोकड्या कपड्यांवर बारबाला अश्लील हावभाव करत डान्स करत असल्याची माहिती नारपोली पोलिसांना मिळाली होती. या आधारावर पोलिसांनी ४ एप्रिल रोजी रात्री साडे अकराच्या दरम्यान बारवर छापा टाकला. यावेळी 10 बारबाला तोकड्या कपडयांमध्ये 'जादू है नशा है, मदहोशीया है', या हिंदी गाण्यावर अश्लील नृत्य करीत असल्याचे आढळून आल्या. पोलिसांचा अचानक छापा पडल्याने ग्राहक, बार कर्मचारी आणि बारबालांमध्ये एकच खळबळ उडाली.
गुन्हा दाखल: त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करत बार मॅनेजर अविनाश गोपीनाथ सूर्यवंशी (वय २५), वेटर शंभुनाथ गिरी (वय ४९), पवित्र भास्कर भुयान (वय ४५) यांच्यासह १० बारबालांना आज (शुक्रवारी) पहाटेच्या सुमारास ताब्यात घेतले. पोलीस हवालदार भरत नवले यांच्या तक्रारीवरून नारपोली पोलीस ठाण्यात भादंवि कलम २९४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा अधिक पोलीस उपनिरीक्षक रोहन शेलार करीत आहेत.
लवली बारवरही छापेमारी: यापूर्वीही नोव्हेंबर २०२२ रोजी मुंबई-नाशिक महामार्गावर ऑर्केस्ट्राबारच्या नावाखाली 'लवली' बारमध्ये पोलिसांनी छापेमारी केली होती. येथे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तोकड्या कपड्यांवर बारबाला विभत्स वर्तन करत द्विअर्थी गाण्यांवर नृत्य करत होत्या. ग्राहकांशी अश्लील चाळे करत असतानाच भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. या छापेमारीत ११ बारबालासह बार चालक, मॅनेजर, कॅशियर, वेटर अश्या १६ जणांविरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात होते.
भिवंडीत २३च्या जवळपास ऑर्केस्ट्रा बार: भिवंडी महापालिका हद्दीसह ग्रामीण भागातील मुंबई–नाशिक महामार्गावर व गोदाम पट्यात सुमारे २३च्या जवळपास बार आहे. त्यामध्ये लैला, देवदास, पारो, किनारा, सिंगर, लवली, बॉम्बे पेलेस, नाईट लव्हर्स, सपना, अप्सरा, ड्रीम लव्हर्स, सम्राट, सुकुर, शिल्पा, सिल्वर पेलेस, इन्जोय, डब्लूडब्लूएफ, आशीर्वाद, सिरोज, संगीत आदी ऑर्केस्ट्रा डान्सबारचा समावेश आहे. विशेष म्हणजे, काही महिन्यापूर्वी भिवंडीतील एका डान्स बारमधील बारबालावर पैश्याची उधळण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर उशिरापर्यत सुरू असलेल्या ऑर्केस्ट्रा बारवर पोलीस प्रशासनाची करडी नजर आहे. तरी देखील पुन्हा उशिरापर्यत ऑर्केस्ट्रा बार सुरू राहत असल्याचे नारपोली पोलिसांनी केलेल्या छापेमारीतून समोर आले आहे.
हेही वाचा: Proposal to Reject Sharad Pawar Resignation : शरद पवार यांनी आपला कार्यकाळ पूर्ण करावा-प्रफुल पटेल