ETV Bharat / state

कल्याणमध्ये बनावट डिझेल तयार करणाऱ्या गोदामावर पोलिसांची धाड; ६ अटकेत - कल्याण बनावट डिझेल बातमी

कल्याण ग्रामीण परिसरातील आडीवली गावात घातक रासायन भेसळ करून बनावट डिझेल तयार करणाऱ्या गोदामावर कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने धाड मारली.

crime
बनावट डिझेल तयार करणाऱ्या गोदामावर पोलिसांची धाड
author img

By

Published : Dec 17, 2020, 3:07 PM IST

Updated : Dec 17, 2020, 3:26 PM IST

ठाणे - कल्याण ग्रामीण परिसरातील आडीवली गावात घातक रासायन भेसळ करून बनावट डिझेल तयार करणाऱ्या गोदामावर कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने धाड मारली. यात ३० लाखांच्यावर बनावट डिझेलचा साठा गोदामातून जप्त केला. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांच्या तक्रारीवरून डिझेल भेसळखोरांवर विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करून आतापर्यत ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

बनावट डिझेल तयार करणाऱ्या गोदामावर पोलिसांची धाड

पवन यादव (वय, २६), कृष्ण शुक्ला (वय, २८), रोहन शेलार (वय, ३४), पंकज राजकुमार सिंग (वय, २७), विपुल वाघमारे (वय, २८), संदेश राणे असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

बिन भोबाट सुरू होता बनावट डिझेल तयार करण्याचा गोरखधंदा

कल्याण ग्रामीणमधील आडीवली ढोकळी परिसरात एका गोदामात बनावट डिझेल तयार करणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर बुधवारी दुपारच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला. यावेळी गोदामात घातक ज्वालाग्राही रसायनच्या सहाय्याने बनावट डिझेल तयार करताना भेसळबाजांच्या टोळीला रंगेहात ताब्यात घेतले.

लुब्रीकेटींग ऑईल अँड ग्रीन प्रोसिंग नावाने सुरू होता गोरखधंदा

छाप्यादरम्यान लुब्रीकेटींग ऑईल अँड ग्रीन प्रोसिंग नावाने हा गोरखधंदा सुरु असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले असून याठिकाणी बनावट डिझेल विविध घातक रसायन भेसळ करून काम सुरू होते. विशेष म्हणजे तब्बल 18 तास छापेमारीची कारवाई सुरु होती. छाप्यादरम्यान एक टेंपो आणि ट्रकसह ३० लाख २१ हजार ७०० रुपये किंमतीचा ५ हजार लिटरच्या ८ टाक्यामधून बनावट डिझेल साठा जप्त केला.

हेही वाचा - कोरोना संसर्गाचा अवयव प्रत्यारोपण शस्रक्रियांनाही फटका, मात्र लॉकडाऊनच्या काळात पुणे विभागच पुढे

भेसळखोराकडून बनावट डिझेल करण्याचे प्रात्यक्षित

एका भेसळखोराकडून छापेमारीवेळी बनावट डिझेल तयार कसे केले जाते , याचे प्रात्यक्षित पोलिसांना दाखवले. तर आज भेसळखोरांच्या टोळीतील ६ आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार असून, या प्रकरणात मोठे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. हे बनावट डिझेल कुणाला विकले जात होते? केमिकल कुठून आणले जात होते? याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

Last Updated : Dec 17, 2020, 3:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.