नवी मुंबई - डी आय जी निशिकांत मोरे यांच्यावर विनयभंग केल्याचा आरोप लावणाऱ्या पीडित मुलीला शोधण्यास पोलिसांना यश आले आहे. संबधित मुलगी घरातून आत्महत्या करणार असल्याची चिठ्ठी लिहून बेपत्ता झाली होती. ही तिच्या मुलगी 19 वर्षीय मित्रासोबत आढळून आली आहे. या तरुणीला देहरादून परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे.
5 जून 2019ला या अल्पवयीन मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशी निशिकांत मोरे यांनी तिचा विनयभंग केल्याची तक्रार घेण्यास पोलीस टाळाटाळ करत होते. प्रसारमाध्यमांच्या दबावानंतर तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यांनंतर दिनकर साळवे या व्यक्तीकडून मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ड्रायव्हर आहे, असे सांगून समोर व फोन करून धमकी दिल्याचा आरोप पीडित मुलीच्या वडील व भावाने केला होता. संबधित प्रकरणामुळे वैफल्यग्रस्त होऊन मुलगी घर सोडून निघून गेली होती. तिचा काहीही पत्ता लागत नसल्याने पीडित मुलीचे कुटुंब प्रंचड तणावाखाली होते. मुलीने घर सोडण्यापूर्वी रेल्वेखाली जीव देऊन आत्महत्या करणार असल्याची चिठ्ठी लिहली होती. या चिठ्ठीमध्ये पिडीतेने संबंधित प्रकरणात मला प्रचंड मानसिक त्रास होत असून "माझ्या माझ्या आत्महत्येस डीआयजी निशिकांत मोरे हेच जबाबदार असल्याचेही लिहिले होते.
पोलिसांची पाच पथके या मुलीचा शोध घेत होती. पोलीस अंत्यत धीम्या गतीने तपास करत असल्याचा आरोप मुलीच्या पालकांनी केला होता. मात्र संबधित मुलगी तिच्या मित्रासोबतच देहरादूनमध्ये आढळून आल्याने या प्रकरणाला एक नाट्यमय वळण प्राप्त झाले आहे.
काय प्रकरण आहे?
5 जून 2019 ला पीडित मुलीचा वाढदिवस होता. यावेळी पोलीस महानिरीक्षक निशिकांत मोरे यांनाही आमंत्रित करण्यात आले होते. वाढदिवस साजरा करताना भावाने तिच्या चेहऱ्यावर केक लावला व तिच्या चेहऱ्यावर लागलेला केक मोरे यांनी बोटाने काढून खाल्ला होता. मोरेंच्या पत्नीनेच याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. हा व्हिडीओ पीडित मुलीच्या पालकांना पाठवून त्या त्रास देत होत्या. शिवाय हा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला होता. यामुळे पीडित मुलीने डीआयजी मोरेंविरुद्ध विनयभंगाची तक्रार दाखल केली. तक्रार दाखल करू नये म्हणून पीडितेच्या कुटूंबियांना विविध प्रकारे धमक्याही दिल्या जात होत्या. अखेर 6 महिने उलटून गेल्यावर .काही दिवसांपूर्वी पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांच्या हस्तक्षेपानंतर मोरे यांच्यावर पोक्सोअंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून महानिरीक्षक निशिकांत मोरे फरार झाले होते. त्यांचा अटकपूर्व जामीन पनवेल न्यायालयाने फेटाळून लावला होता. माझ्या पतीवर केलेले आरोप खोटे असून हा प्रकार आर्थिक व्यवहारातून झाला असल्याचे डीआयजी मोरे यांच्या पत्नी निशिका मोरे यांनी सांगितले होते. मुलीचे संपूर्ण कुटूंब खोटे बोलत आहे. आम्ही आमचे 20 लाख रुपये परत मागितल्याने त्यांनी मुलीला पुढे करून हा सगळा प्रकार केला आहे, असेही निशिका मोरे म्हणाल्या होत्या