ठाणे - उल्हासनगरमधील कुख्यात गुंड व भाजप नगरसेविकेचा पती दिपक सोंडेने व्यापाऱ्याला खंडणीसाठी धमकविल्याची घटना समोर आली आहे. सोंडेवर याआधीही विविध पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्ह्यांच्या नोंदी आहे. दरम्यान, दिपक सोंडेने याबाबत व्यापाऱ्याचे आरोप फेटाळले असून माझ्या मित्राचे नरेशकडे पैसे बाकी असल्याचे मी त्याच्याकडे त्या पैशांची मागणी केल्याचे सांगितले आहे.
हेही वाचा - राहुल-प्रियांकांकडून जनतेची दिशाभूल, अमित शाहांचा निशाणा
या प्रकरणी व्यापारी नरेश साजनदास रोहरा (वय 40, रा. आशाळेगाव, उल्हानसागर) यांनी हिल लाईन पोलीस ठाण्यात सोंडेसह चार अज्ञात साथीदारांविरोधात 1 कोटी रुपयांची खंडणी व खंडणी न दिल्यास जीवेठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
उल्हासनगरात कुख्यात गुंड दिपक सोंडे गुन्हेगारी क्षेत्रात नाव असून यापूर्वी त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी असे गंभीर गुन्हे दाखल आहे. मध्यंतरी काही काळ कुख्यात गँगस्टर सुरेश पुजारीने उल्हासनगर, अंबरनाथ, कल्याण, परिसरातील व्यापाऱ्यांकडून खंडणीचे सत्र सुरू केले होते. मात्र, खंडणीविरोधी पथक त्याच्या मागावर असल्याने त्याने तूर्तास तरी खंडणीसाठी व्यापारांना धमकी दिल्याचे समोर आले नाही. मात्र, पुन्हा उल्हानसागरातील सोंडेने व्यापाऱ्याकडे 1 कोटी रुपयांची खंडणीची मागणी करून न दिल्यास ठार मारण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे.
4 जानेवारीला सकाळच्या सुमाराला 5 नंबर परिसरातील कार्यलयासमोर आपल्या 4 साथीदारांना पाठवून व्यापारी नरेश साजनदास रोहरा धमकी दिली होती. त्यांनतर त्याच दिवशी दिपक सोंडेने मोबाईलवर संपर्क करून मला 1 कोटी रुपयाच्या खंडणी मागीतली व धमकी दिली असल्याचे रोहरा यांनी सांगितले.
हेही वाचा - अखेर महाविकास आघाडी सरकारचे खातेवाटप जाहीर !