ETV Bharat / state

कौतुकास्पद..! रिक्षाचालकाने परत केले प्रवाशाचे दीड लाख रुपये - रिक्षा चालक न्यूज

मूळचे नांदेड येथील रहिवासी असलेले सुरेश पांडुरंग सांगळे हे तळोजा येथून खारघर दरम्यान रिक्षाने प्रवास करत होते. दरम्यान, ते त्यांची पिशवी रिक्षामध्ये विसरले. रिक्षा चालक सुरजकुमार झा यांनी दीड लाख रुपये असलेली पिशवी परत केली.

police-felicitated-honest Auto Driver
रिक्षा चालकाचा सत्कार
author img

By

Published : Mar 7, 2020, 9:37 AM IST

ठाणे - एका रिक्षा चालकाने प्रवाशाचे दीड लाख रुपये परत केले. सुरजकुमार अजय झा(वय-22) असे या रिक्षा चालकाचे नाव आहे. मोठी रक्कम परत केल्याने या प्रामाणिक रिक्षाचालकाचे कौतुक केले जात आहे. खारघर पोलिसांनी रिक्षाचालकाचा सत्कार केला.

मूळचे नांदेड येथील रहिवासी असलेले सुरेश पांडुरंग सांगळे हे तळोजा येथून खारघर दरम्यान रिक्षाने प्रवास करत होते. दरम्यान, ते त्यांची पिशवी रिक्षामध्ये विसरले. त्या पिशवीमध्ये दीड लाख रुपयांची रक्कम होती. सांगळे ज्या रिक्षात बसले होते, त्या रिक्षा चालकाने खारघर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांच्याकडे ती पिशवी जमा केली.

हेही वाचा - धक्कादायक! महापालिका शाळेत शाळकरी मुलींकडून केली जाते शौचालयाची स्वच्छता

त्यानंतर पोलिसांनी पिशवी मालकाचा शोध घेऊन ही पिशवी आणि रक्कम मूळ मालक सुरेश सांगळे यांच्या ताब्यात दिली. रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा पाहून खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तिदार आणि पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी रिक्षाचालक सुरजकुमार झा यांचा सत्कार करुन कौतुक केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.