ETV Bharat / state

दोन तासात चोरटा जेरबंद; मोबाईल लंपास करणारा कॅमेऱ्यात कैद - ठाणे मोबाईल चोरी

भिवंडीतील लाहोटी कंपाऊंड येथे कापड मार्केटमधील 'बंटी शॉप'मध्ये एका ग्राहकाचा मोबाईल चोरणाऱ्या सराईत चोरट्याला सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अवघ्या २ तासांमध्ये पोलिसांनी शोधून काढले. कृष्णा सुरेश पवार (२२, रा. चव्हाण कॉलनी, भिवंडी) असे या चोरट्याचे नाव आहे.

police caught thief with the help of cctv footage
सीसीटीव्हीच्या आधारे दोन तासांतच लागला चोरट्याचा शोध
author img

By

Published : Jan 13, 2020, 12:44 AM IST

Updated : Jan 13, 2020, 10:15 AM IST

ठाणे - भिवंडीतील लाहोटी कंपाऊंड येथे कापड मार्केटमधील 'बंटी शॉप'मध्ये एका ग्राहकाचा मोबाईल चोरणाऱ्या सराईत चोरट्याला सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अवघ्या २ तासांमध्ये पोलिसांनी शोधून काढले. कृष्णा सुरेश पवार (२२, रा. चव्हाण कॉलनी, भिवंडी) असे या चोरट्याचे नाव आहे.

सीसीटीव्हीच्या आधारे दोन तासांतच लागला चोरट्याचा शोध

भिवंडीतील लाहोटी कंपाऊंड येथे कापड मार्केटमधील बंटी शॉपमध्ये शनिवारी सायंकाळच्या सुमारास, निशांत गणेश पाटील हा युवक त्याच्या मित्रांसोबत कपडे घेण्यासाठी आला होता. कपडे घेतल्यानंतर त्याने दुकानातील टेलरकडे ते शिवण्यासाठी दिले. त्यावेळी टेलर अंगाचे माप घेत असताना त्याने हातातील १५ हजार रुपये किंमतीचा मोबाईल कापडांच्या गठ्ठ्यावर ठेवला. ही बाब लक्षात येताच, संधी साधून चोरट्याने मोठ्या शिताफीने निशांतची नजर चुकवून मोबाईल घेऊन दुकानातून पोबारा केला.

हेही वाचा - 'छत्रपतींशी तुलना करु पाहणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही'

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे तसेच ए.पी.आय. जमीर शेख, पोलीस हवालदार सुरेश चौघुले यांच्या पथकाने तत्काळ तपास सुरू केला. यानंतर सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्याला पकडण्यात आले. यानंतर चौकशीदरम्यान त्याने मोबाईल चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून दोन मोबाईल जप्त केले आहेत. तसेच रविवारी न्यायालयात हजर केल्यांनंतर त्याची रवानगी अधारवाडी कारागृहात करण्यात आली आहे.

ही मोबाईल चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाल्याने चोरट्याची मोबाईल चोरी उघड झाली आहे. या घटनेबद्द्ल भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पुढीत तपास सुरू आहे.

Intro:kit 319Body:सराईत मोबाईल चोरटा सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांच्या जाळ्यात

ठाणे : शहरातील लाहोटी कंपाऊंड येथील एका कापडाच्या दुकानातून तरुणाचा महागडा मोबाईल लंपास केल्याची घटना घडली होती. हि घटना भिवंडीतील लाहोटी कंपाऊंड येथील कपडा मार्केटमधील बंटी शॉपमध्ये घडली आहे.
विशेष म्हणजे सराईत मोबाईल चोरट्याला भिवंडी शहर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अवध्या २ तासातच शोधून गजाआड केले आहे. कृष्णा सुरेश पवार ( २२ रा. चव्हाण कॉलनी,भिवंडी) असे गजाआड करण्यात आलेल्या मोबाईल चोरट्याचे नांव आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार शनिवारी सायंकाळच्या सुमाराला भिवंडीतील लाहोटी कंपाऊंड येथे कपडा मार्केटमध्ये तुर्भे ,नवी मुंबई येथून निशांत गणेश पाटील ( २९ रा.तुर्भे ) हा तरुण त्याच्या मित्रा सोबत बंटी शॉपमध्ये कपडे घेण्यासाठी आला होता. त्याने कपडे घेतल्यानंतर त्याच ठिकाणच्या टेलरकडे ते शिवण्यासाठी दिले. त्यावेळी टेलर अंगाचा माप घेत असताना त्याने हातातील १५ हजार रुपये किंमतीचा मोबाईल कापडांच्या गठ्ठयावर ठेवला. हि संधी साधून चोरटा कृष्णा याने निशांत याची नजर चुकवून मोबाईल घेऊन दुकानातून पोबारा केला.
मोबाईल चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद असल्याने चोरटा मोबाईल उचलून चोरून नेत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. या मोबाईल चोरीच्या घटनेचा गुन्हा भिवंडी शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच वपोनि. सुभाष कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय जमीर शेख ,पोलीस हवालदार सुरेश चौघुले आदींच्या पथकाने तात्काळ तपास करून चोरटा कृष्णा पवार यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने मोबाईल चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी दोन मोबाईल जप्त केले असून त्याला अटक करून रविवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी अधारवाडी कारागृहात केली आहे.

Conclusion:chor
Last Updated : Jan 13, 2020, 10:15 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.