ETV Bharat / state

भिवंडीत २०२ किलो गोमांसासह चार जणांना अटक; एक फरार - ठाणे

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित मांस विक्री दुकानावर छापा टाकला असता तिथे बैलाचे मुंडके, कातडे आणि मांसाचे तुकडे आढळून आले. तसेच आणखी ४ ते ५ गोवंश जनावरांची कत्तल करण्यात आली असल्याचे देखील निदर्शनास आले.

भोईवाडा पोलीस स्टेशन
author img

By

Published : Apr 29, 2019, 4:59 AM IST

ठाणे - भिवंडीतील एका मांस विक्री दुकानात बेकायदेशीरपणे बैलांचे मांस विक्री करत असल्याची माहिती भोईवाडा पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी २०२ किलो बैलांचे मांस जप्त केले आहे. तसेच या प्रकरणी ४ जणांना अटकही करण्यात आली आहे.

भोईवाडा पोलीस स्टेशन

संपूर्ण राज्यात बेकादेशीरपणे उघड्यावर गोमांस विकण्यास शासनाकडून बंदी असूनही भिवंडी शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात गाय, बैल, म्हैस आदी जनावरांच्या कत्तली करून त्यांची मांसविक्री होत असल्याचे अनेकवेळा समोर आले आहे. अश्याच एका घटनेत मांस विक्रेता फैक याने दलालाच्या मदतीने गुरुनाथ पाटील यांच्याकडून शेतीउपयुक्त नर जातीचा बैल खरेदी केला आणि त्याची कत्तल करून ते मांस दुकानात विक्रीसाठी ठेवले होते. या प्रकाराची माहिती बजरंग दलाचे कार्यकर्ते दादा गोसावी यांनी भोईवाडा पोलिसांना दिली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधीत मांस विक्री दुकानावर छापा टाकला असता तिथे बैलाचे मुंडके, कातडे आणि मांसाचे तुकडे आढळून आले. तसेच आणखी ४ ते ५ गोवंश जनावरांची कत्तल करण्यात आली असल्याचेदेखील निर्देशनास आले. सदर मांस पोलिसांनी जप्त केले असून तपासणीसाठी न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे.

या प्रकरणी मांस विक्रेता फैक फारूक पटेल ( ५१ ) अब्बास अब्दुल वहाब कुरेशी (१९ ) दलाल समीर सादीक खोत ( ४०) आणि बैल मालक तथा तथा माजी जि.प. सदस्य गुरुनाथ सीताराम पाटील ( ५२ ) यांना अटक केली आहे. मात्र, त्यांचा एक साथीदार अनवर कुरेशी ( ३५ ) फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या गोवंश कत्तल प्रकरणी अटक करण्यात आलेल्या चौघांनाही भिवंडी न्यायालयात हजर केले असता ३० एप्रिलपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

भिवंडीत २०२ किलो गोमांससह चार जणांना अटक; एक फरार  

ठाणे:- शेतीउपयुक्त नर जातीच्या बैलाची कत्तल करून ते गोमांस बेकायदेशीरपणे भिवंडीतील सौदागर मोहल्ल्यातील अलकबीर या बीफ दुकानातून विक्री केले जात असल्याची खबर भोईवाडा पोलिसांना मिळाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे यांच्या मार्गदर्शनखाली एपीआय संजय पुजारी यांनी पोलीस पथकासह छापा टाकत, त्या दुकानातून २०२ किलो गोमांस जप्त केल्याची घटना समोर आली आहे.

याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी बीफ विक्रेता फैक फारूक पटेल ( ५१ रा. सौदागर मोहल्ला ) यास ताब्यात घेऊन अटक केली. त्यानंतर अधिक तपास करून पोलिसांनी कसाई अब्बास अब्दुल वहाब कुरेशी (१९ रा. ईदगाह रॉड ) व दलाल समीर सादीक खोत ( ४० रा.बंदर मोहल्ला ), बैल मालक तथा माजी जि.प. सदस्य  गुरुनाथ सीताराम पाटील ( ५२ रा.काटई गांव ) या चौघांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. तर या गोवंश कत्तलीमधील कसाई अनवर कुरेशी ( ३५ रा.कसाईवाडा ) हा फरार झाला आहे.

संपूर्ण राज्यात बेकादेशीरपणे उघड्यावर गोमांस विकण्यास शासनाकडून बंदी असूनही भिवंडी शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात गाय,बैल , म्हैस आदी जनावरांच्या कत्तली करून मांसविक्री होत असल्याचे अनेकवेळा समोर आले आहे. अश्याच एका घटनेत बीफ विक्रेता फैक याने दलालाच्या मदतीने गुरुनाथ पाटील यांच्याकडून शेतीउपयुक्त नर जातीचा बैल खरेदी करून त्याची कत्तल करून ते मांस ग्राहकांना विक्रीसाठी दुकानात लावले होते. सदरच्या गोवंश जनावराची माहिती बजरंग दलाचे कार्यकर्ते दादा गोसावी यांनी भोईवाडा पोलिसांना दिली असता पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात बैलाचे मुंडके व कातडे तसेच मांसाचे तुकडे दुकानात आढळून आले. या ठिकाणी आणखीन चार ते पाच गोवंश जनावरांची कत्तल झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे सदरचे गोमांस पोलिसांनी जप्त करून त्याची तपासणी करण्यासाठी न्यायवैद्यक प्रयोग शाळेत पाठवण्यात आले आहे.या गोवंश कत्तल प्रकरणी अटक करण्यात आलेल्या चार जणांना भिवंडी न्यायालयात हजर केले असता त्यांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

I’m protected online with Avast Free Antivirus. Get it here — it’s free forever.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.