ETV Bharat / state

'कल्याण मटका किंग' गोळीबार प्रकरण, मुनियाचे मारेकरी गुजरातकडे रवाना ? - कल्याण गोळीबार बातमी

कल्याणचा कुख्यात गुंड तथा मटका किंग मुनिया उर्फ जिग्नेश ठक्करचा गोळ्या झाडून खून झाला होता. मात्र, त्याच्या मारेकऱ्याचा शोध घेताना पोलिसांची चांगलीच दमछाक होत आहे.

kalyan
kalyan
author img

By

Published : Aug 3, 2020, 7:10 PM IST

ठाणे - कल्याणचा कुख्यात गुंड तथा मटका किंग मुनिया उर्फ जिग्नेश ठक्कर याला गोळ्या झाडून ठार मारून पसार झालेल्या चौघा मारेकऱ्यांना शोध घेण्यासाठी पोलिसांच्या नाकी नऊ येत आहे. हे चारही मारेकरी सोबत आणलेल्या वाहनातून गुजरातच्या दिशेने पळाले असावेत, असा पोलिसांचा कयास आहे. मात्र, या अंदाजाला म्हणावी तशी पुष्टी मिळत नसली तरी येत्या काही दिवसांत मुनियाचे मारेकरी लवकरच हाती लागतील, असा पोलिसांना विश्वास आहे.

कल्याण रेल्वे स्थानकासमोर असलेल्या नीलम गेस्ट हाऊसच्या गल्लीत शुक्रवारी (दि. 31 जुलै) रात्री पावणेदहाच्या सुमारास मटका किंग तथा खंडणीबहाद्दर गुंड मुनिया उर्फ जिग्नेश ठक्कर याची 5 गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ही हत्या मुनियाचा एकेकाळचा साथीदार धर्मेश उर्फ नन्नु नितिन शहा याच्यासह त्याचा ड्रायव्हर कम बाऊन्सर जयपाल उर्फ जापान या दोघांनी मिळून केली. घटनास्थळातून पळ काढताना धर्मेश उर्फ नन्नु आणि बाऊन्सर जयपाल उर्फ जापान यांच्यासह आणखी 2 जण होते. मटका किंग मुनियाची अशाप्रकारे हत्या झाल्यानंतर कल्याणच्या मटका, जुगार, गुन्हेगारी वर्तुळात खळबळ माजली आहे. ज्या ठिकाणी हे हत्याकांड घडले त्या नीलम गेस्टच्या गल्ली परिसरात तणावपूर्ण शांततेत हीच कुजबुज सुरू आहे.

स्थानिक पोलीस, तपासणी पथक, पोलीस उपायुक्तांचे खास पथक,गुन्हे शाखेच्या पथकासह एकूण 5 पथके वेगवेगळ्या दिशांना मुनियाच्या मारेकऱ्यांचा माग काढत आहेत. तथापी अद्याप या पथकांच्या हाती कोणताही धागा लागलेला नाही. मुनियाचा खून करुन सोबत आणलेल्या चारचाकी वाहनातून पळालेल्या मारेकऱ्यांनी मुरबाड-माळशेज मार्ग, भिवंडी-कसारा मार्ग किंवा पश्चिमेकडील मुंबई-अहमदाबाद मार्ग निवडला असावा. तसेच हे सर्व मारेकरी वेगवेगळ्या वाहनांतून गुजरातकडे पळाले असावेत, असा तपास यंत्रणांचा कयास आहे.

हल्लेखोर धर्मेश उर्फ नन्नु नितिन शहा याच्याविरुध्द खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, अशाप्रकारचे विविध 15 ते 20 गुन्हे दाखल आहेत. 3 वर्षांपूर्वी याच गुंडावर ठाणे पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली होती. पोलिसांनी मोक्काचे शस्त्र बाहेर काढल्याचे कळताच हा गुंड तब्बल दीड वर्ष भूमिगत झाला होता. याच दरम्यान त्याने गुजरात राज्यात दडी मारली होती. तेथेही खंडणीसह अन्य गंभीर स्वरूपाच्या डझनभर नोंदी असल्याचे समजते. गुजरातमध्येही या गुंडाने ठिकठिकाणी आपले अड्डे बनविले असल्याने तो आपल्या साथीदारांसह गुजरातकडे पळाला असावा, असा तपास यंत्रणेला संशय आहे. शिवाय पसार झालेल्या मारेकऱ्यांना शोधण्यासाठी तंत्रज्ञानाचाही आधार घेतला जात आहे.

तपासणी नाक्यांवरील शिथिलतेचा गुन्हेगारांना फायदा

राज्यात राष्ट्रीय महामार्गांवर 22 ठिकाणी सीमा तपासणी नाके आहेत. तसे मुरबाड-माळशेज, भिवंडी-कसारा, मुंबई-अहमदाबाद या मार्गांवरही तपासणी नाके असून या नाक्यांवर 24 तास पोलिसांचा पहारा असला तरीही जीवनावश्यक वस्तू, औषधे, दुधाच्या दळणवळणामुळे तपासणीत शिथिलता आलेली दिसून येते. मात्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण पट्ट्याकडे जाणाऱ्या मार्गांवरील नाक्यांवर सर्व वाहनांची तपासणी करण्यात येते. त्यामुळे मारेकऱ्यांनी गुजरातकडे पळून जाण्याचा मार्ग निवडला असावा, असा तपास यंत्रणांचा कयास आहे.

गुन्हेगारी झाकण्यासाठी मुनिया राजकारणात

मटका किंग, कुख्यात गुंड जीग्नेश ठक्कर उर्फ मुनिया याच्याविरुध्द खंडणी, जबरी चोरी, असे एकूण 5 गुन्हे दाखल आहेत. बालपणीचा मित्र पण गुन्हेगारी वर्चस्व तथा आर्थिक वादामुळे सद्या एकमेकांचे वैरी झाले. धर्मेश शहा आणि जिग्नेश ठक्कर हे यापूर्वी दोघेही खंडणीच्या एका गुन्ह्यात सहआरोपी आहेत. आपल्यावर असलेल्या गुन्हेगारीचा कलंक पुसण्यासाठी जीग्नेश ठक्कर उर्फ मुनिया याने एका राजकीय पक्षाचा बुरखा धारण केला होता. कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचा कथित अध्यक्ष जिग्नेश ठक्कर हा गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत मिरवला होता. त्याचा सत्कार करतानाचा फोटो सद्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.