ETV Bharat / state

ठाण्यात दुचाकी शोरूमसह गॅरेज चालकांवर कारवाई; ५० दुचाकी जप्त - thane

उल्हासनगरात रहदारीच्या रस्त्यावर अतिक्रमण केल्याने वाहतूक कोंडी होत होती. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ४ दिवसापूर्वी वाहतूक पोलीस व पालिका अधिकाऱ्यांनी बैठक घेतली होती. त्याअनुषंगाने आज उल्हासनगर शहर वाहतूक उपशाखेचे वाहतूक पोलीस निरीक्षक श्रीकांत धरणे व पालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी, कुमावत व त्यांच्या पथकांनी शहरातील कॅम्प नं. ३ येथील दर्बी हॉटेल रोड, अमन टॉकीज रोड आदी परिसरातील जवळपास ८ दुचाकी शोरूम व ४ गॅरेज दुकानांबाहेर विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या दुचाकींना जप्त केले.

vehicle seized ulhasnagar
दुचाकी जप्त करताना वाहतुक पोलीस कर्मचारी
author img

By

Published : Mar 19, 2020, 8:34 PM IST

ठाणे- उल्हासनगरात वाहतूक विभाग पोलीस आणि पालिकेच्या सयुक्त पथकाने कारावाई करत शोरूम व गॅरेज चालकांच्या ५० दुचाकी जप्त केल्या आहेत. शोरुम मालक व गॅरेज दुकानदार रस्त्यावर अतिक्रमण करून तिथे दुचाकी ठेवायचे. त्यामुळे, वाहतूक पोलिसांनी व पालिकेने या शोरूम व गॅरेज चालकांवर कारवाई केली आहे. या कारवाईमुळे शहरातील वाहन विक्रेत्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

उल्हासनगरात रहदारीच्या रस्त्यावर अतिक्रमण केल्याने वाहतूक कोंडी होत होती. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ४ दिवसापूर्वी वाहतूक पोलीस व पालिका अधिकाऱ्यांनी बैठक घेतली होती. त्याअनुषंगाने आज उल्हासनगर शहर वाहतूक उपशाखेचे वाहतूक पोलीस निरीक्षक श्रीकांत धरणे व पालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी, कुमावत व त्यांच्या पथकांनी शहरातील कॅम्प नं. ३ येथील दर्बी हॉटेल रोड, अमन टॉकीज रोड आदी परिसरातील जवळपास ८ दुचाकी शोरूम व ४ गॅरेज दुकानांबाहेर विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या दुचाकींना जप्त केले. वाहतूक पोलीस व पालिकेच्या सयुक्त कारवाईमुळे शोरूम व गॅरेज चालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. आता पुढची कारवाई रस्त्यावरील बेवारस वाहनांवर होणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्रीकांत धरणे यांनी दिली आहे.

हेही वाचा- कोरोना विरोधी लढ्यात पोलिसांचाही सक्रीय सहभाग; ठाणे पोलीस जनजागृतीसाठी रस्त्यावर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.