नवी मुंबई (ठाणे) - वाशीमध्ये एका नराधम शेजाऱ्याने सात वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना घडली. याप्रकरणी वाशी पोलिसांनी नराधमांला अटक केली आहे.
पीडित मुलीच्या ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईल घेऊन देण्याच्या बहाण्याने, संबंधित नराधमाने मुलीच्या आईला मोबाईल खरेदी करण्यासाठी घराबाहेर नेले. त्यानंतर काहीतरी बहाणा करून संबंधित आरोपी हा पीडित मुलीच्या घरी आला. यानंतर त्याने संबंधित मुलीवर लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात या नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने पीडितेच्या आईने मागितली मदत -
वाशीत राहणाऱ्या दुसऱ्या इयत्तेत शिकत असलेल्या सात वर्षीय पीडित मुलीची आर्थिक स्थिती अत्यंत गरीबीची आहे. त्यामुळे सद्यस्थितीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या ऑनलाइन शिक्षणासाठी मुलीकडे स्मार्ट फोन नव्हता. पीडितेचा आईने शेजारी राहणाऱ्या एका कुटुंबाकडे मदत मागितली. त्यानुसार लोनवर मोबाईल मिळत असून तो घेण्यासाठी मदत करतो, असे भासवले. यानंतर तो पीडित मुलीच्या आईला मोबाईलच्या दुकानात घेऊन गेला. यावेळी त्याने मोबाईल खरेदी करून चेक करण्याचा बहाणा केला. तसेच आरोपी पीडितेच्या आईला दुकानात बसवून पीडित मुलीच्या घरी आला.
अत्याचार करुन पुन्हा परतला -
आरोपी घरी आला असता त्यादरम्यान पीडित मुलगी व आरोपीची मुलगी दोघीही मैत्रिणी असल्याने खेळत होत्या. आरोपीने स्वतःच्या लहान मुलीला घराबाहेर काढले व संबंधित महिलेच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर आरोपी पुन्हा मोबाईलच्या दुकानात आला मोबाईलसह महिलेला घेऊन घरी आला.
हेही वाचा - अल्पवयीन मुलीशी अश्लील भाषेत बोलणाऱ्या कंडक्टरला एका वर्षाची शिक्षा आणि १५ हजारांचा दंड
पीडितेने आईला घडलेला प्रकार सांगितला -
आई घरी आल्यावर पीडित मुलगी रडू लागली व घडलेला प्रकार सांगितला. मात्र, आर्थिक स्थिती बेताची असल्याने मुलीची आईदेखील भयभीत झाली. तिने तक्रार देण्याचे टाळले. मात्र, या घटनेनंतर मुलीला त्रास होऊ लागला. त्यामुळे संबंधित कुटुंबाने सात जुलैला वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल दिली.
वाशी पोलिसांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या -
संबंधित मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती वाशी पोलिसांना देताच पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक वास्त यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या घटनेची त्वरित दखल घेतली. वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश चव्हाण यांच्या पथकाने आरोपी अर्जुन इचके याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्यावर पॉस्कोंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला 14 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हेही वाचा - नोकरी गमाविल्याचे नैराश्य; डॉक्टर महिलेची १४ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या