ETV Bharat / state

आईवडिलांनी मध्यरात्री घराबाहेर काढलेल्या सोळा वर्षीय मुलीवर बलात्कार; नराधमाला अटक - arrested

याप्रकरणी बकरी व्यावसायिक बालकराम हैतरराम सागर (३२) या नराधमाला भिवंडी तालुका पोलिसांनी अटक केली

आईवडिलांनी मध्यरात्री घराबाहेर काढलेल्या सोळावर्षीय मुलीवर अमानूष बलात्कार
author img

By

Published : May 21, 2019, 7:57 PM IST

ठाणे - क्षुल्लक कारणावरून आईवडिलांनी मारहाण करून मध्यरात्रीच्या सुमाराला घराबाहेर काढलेल्या सोळा वर्षीय मुलीवर एका नराधमाने अमानूष अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडीतील डोंगरपाडा, चावींद्रा येथे घडली आहे. याप्रकरणी बकरी व्यावसायिक बालकराम हैतरराम सागर (३२) या नराधमाला भिवंडी तालुका पोलिसांनी अटक केली आहे.

आईवडिलांनी मध्यरात्री घराबाहेर काढलेल्या सोळावर्षीय मुलीवर अमानूष बलात्कार

भिवंडी शहरात सावत्र बापासोबत राहणाऱ्या सोळा वर्षीय मुलीचा काल रात्रीच्या सुमाराला कुटुंबीयांसोबत शुल्लक वाद झाला. त्या वादातून तिला आई, वडील, भाऊ व अन्य नातेवाईकांनी बेदम मारहाण करून मध्यरात्रीच्या सुमारास घराच्याबाहेर हाकलले. त्यामुळे पीडित मुलीने आधार मिळावा म्हणून राहत्या घरातून निघून अन्यत्र आसरा शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ती रडत रस्त्याने पायी चालत असताना नराधम बालकराम याच्या घराजवळ आली असता, त्यावेळी त्याने रडण्याचे कारण विचारले. मुलीने त्यासंदर्भातली हकीकत सांगितली. त्यामुळे रात्रीची वेळ असल्याने तू माझ्या घरीच झोप असे पीडित मुलीला सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून पीडित मुलगी त्याच्या घरी झोपली. मात्र, नराधम बालकराम याची नियत बिघडल्याने त्याने पीडित मुलीला ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर अमानूष अत्याचार केला.

त्यानंतर सकाळच्या सुमाराला पीडित मुलगी त्याच्या तावडीतून कशीबशी घरातून निघाली असता तिची भेट एका समाजसेवक महिलेसोबत झाली. त्यावेळी तिने तिच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितल्यानंतर तिला सोबत घेऊन शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मात्र, अत्याचाराची घटना भिवंडी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने सदरचा गुन्हा तालुका पोलिसांकडे वर्ग केला. भिवंडी तालुका पोलीस ठाण्याचे एपीआय पंकज घाटकर यांनी बलात्कारी बालकराम याला मंगळवारी अटक करून भिवंडी न्यायालयात हजर केले असता त्यास २७ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ठाणे :- क्षुल्लक कारणावरून आईवडिलांनी मारहाण करून मध्यरात्रीच्या सुमाराला घराबाहेर काढलेल्या सोळा वर्षीय मुलीवर आधार देण्याच्या बहाण्याने एका नराधमाने अमानूष अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हि घटना भिवंडीतील डोंगरपाडा,चावींद्रा येथे घडली आहे. या बलात्कार प्रकरणी बकरी व्यावसायीक  बालकराम हैतरराम सागर (३२) या नराधमाला  भिवंडी तालुका पोलिसांनी अटक केली आहे.

भिवंडी शहरातील नूरीनगर (पहाडीवर) येथे सावत्र बापासोबत राहणाऱ्या  सोळा वर्षीय मुलीचा  काल रात्रीच्या सुमाराला कुटुंबियांसोबत क्षुल्लक वाद झाला. त्या वादातून तिला आईवडील ,भाऊ व अन्य नातेवाईकांनी बेदम मारहाण करून मध्यरात्रीच्या सुमारास घराच्या बाहेर हाकलले. त्यामुळे पीडित मुलीने आधार मिळावा म्हणून राहत्या घरातून निघून अन्यत्र आसरा शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ती रडत - रडत डोंगरपाडाचे खाली रस्त्याने पायी चालत असताना नराधम बालकराम याच्या घराजवळ आली असता त्यावेळी त्याने रडण्याचे कारण विचारले. मुलीने आपबीती सांगितली. त्यामुळे  रात्रीची वेळ असल्याने तू माझ्या घरीच झोप असे पिडीत मुलीला सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून पीडित मुलगी त्याच्या घरी झोपली. मात्र नराधम बालकराम याची नियत बिघडल्याने त्याने पीडित मुलीला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर अमानूष अत्याचार केला.

त्यानंतर सकाळच्या सुमाराला पिडीत मुलगी त्याच्या तावडीतून कशीबशी घरातून निघाली असता तिची भेट एका समाजसेवक महिलेसोबत झाली. त्यावेळी तिने तिच्यावर गुदरलेला प्रसंग कथन केल्याने तिला सोबत घेऊन शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मात्र अत्याचाराची घटना भिवंडी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने सदरचा गुन्हा तालुका पोलिसांकडे वर्ग केला. भिवंडी तालुका पोलीस ठाण्याचे एपीआय पंकज घाटकर यांनी बलात्कारी बालकराम यास मंगळवारी अटक करून भिवंडी न्यायालयात हजर केले असता त्यास २७ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.