ठाणे - अल्पवयीन मुलीवर एका 20 वर्षीय नराधमाने इमारतीच्या टेरेसवर नेऊन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कल्याण-कसारा रेल्वे मार्गावरील आंबिवली या गावात ही घटना घडली आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत. साहिल बागवान (वय, 20) असे आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित चिमुरडी एका खासगी शाळेत शिक्षण घेत आहे. शनिवारी दुपारच्या सुमारास ती घराबाहेर खेळण्यासाठी जात असताना तिला नराधमाने पैशाचे आमिष दाखवून इमारतीच्या टेरेसवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला. हा धक्कादायक प्रकार तेथील एका रहिवाशी महिलेच्या निदर्शनास आल्याने तिने पीडित मुलीसह नातेवाईकांना घेऊन खडकपाडा पोलीस गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून आरोपीला आज विशेष न्यायालयात हजर केले असता, त्याला 18 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक कोकाटे या तपास करत आहेत.