ETV Bharat / state

धक्कादायक..! भिवंडीत नराधम बापाचा अत्याचार, अल्पवयीन मुलगी गर्भवती - ठाणे गुन्हे बातमी

या घटनेप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात नराधम बापाविरोधात गुन्हा दाखल करुन त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

Physical abuse on minor girl
नराधम बापाचा अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार
author img

By

Published : Dec 8, 2019, 8:30 PM IST

ठाणे - नराधम बापाने पोटच्या अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या अत्याचारामुळे मुलगी 6 महिन्यांची गरोदर आहे. भिवंडीतील किडवाईनगर नागांव परिसरात ही घटना घडली. या घटनेने परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा - नवी मुंबईतील रेल्वे स्थानकाला गर्दुल्ल्यांचा विळखा, महिला प्रवाशांमध्ये दहशत

या घटनेप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात नराधम बापाविरोधात गुन्हा दाखल केला असून नराधम बापाला पोलिसांनी अटक केली आहे. पीडित मुलगी ही घरात एकटीच असताना नराधम पित्याने वेळोवेळी मुलीवर बळजबरीने अत्याचार केला. दरम्यानच्या काळात मुलगी उत्तर प्रदेश येथे नातेवाईकांकडे लग्न कार्यक्रमासाठी गेली होती. त्यावेळी पीडित मुलीच्या मामीने तिची चौकशी केली असता, सदरचा घृणास्पद प्रकार समोर आला.

हेही वाचा - कल्याण रेल्वे स्थानकाबाहेर बॅगमध्ये महिलेचे डोके नसलेला मृतदेह आढळल्याने खळबळ

मुलीकडे अधिक चौकशी केली असता, आई व भाऊ, बहीण घराबाहेर गेल्यावर पिता तिला धमकावून तिच्याशी शारीरिक अत्याचार करत होता. या अमानुष घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसल्याने अखेर नातेवाईकांनी मुलीला धीर देऊन शांतीनगर पोलीस ठाण्यात नराधम बापाविरोधात गुन्हा दाखल केला.

या गुन्ह्याच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक दुर्गेश दुबे यांनी नराधम पित्यास तत्काळ अटक केली. त्याला रविवारी भिवंडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास 11 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

Intro:kit 319Body:भिवंडीत नराधम बापाचा सोळा वर्षीय मुलीवर अमानुष अत्याचार ; नराधम बाप गजाआड

ठाणे : नराधम बापाने पोटच्या सोळा वर्षीय मुलीवर अमानुष अत्याचार केल्याने मुलगी सहा महिन्यांची गरोदर असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हि घटना भिवंडीतील किडवाईनगर ,नागांव परिसरात घडली आहे. या घटनेने परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
या घटनेप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात नराधम बापा विरोधात गुन्हा दाखल होताच नराधम बापाच्या मुसक्या पोलिसांनी आवळून त्याला पोलीस कोठडीत डांबले आहे. महंमद कासीम अंसारी ( ४५ रा.किडवाई नगर ) असे १६ वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाचे नाव आहे.

पिडीत मुलगी हि एकटीच घरात असताना वासनांधीन नराधम पिता महंमद याने मुलीवर वेळोवेळी बळजबरीने अत्याचार केला. दरम्यानच्या काळात मुलगी उत्तर प्रदेश येथे नातेवाईकांकडे लग्न कार्यक्रमासाठी गेली होती. त्यावेळी पिडीत मुलीच्या मामीने तिची चौकशी केली असता सदरचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे. मुलीकडे अधिक चौकशी केली असता आई व भाऊ ,बहीण घराबाहेर गेल्यावर खुद्द पिताच तिला धमकावून तिच्याशी शरीर संबंध करीत असल्याचे तिने नातेवाईकांना सांगितले. या अमानूष घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसल्याने अखेर नातेवाईकांनी मुलीला धीर देऊन शांतीनगर पोलीस ठाण्यात नराधम बापाविरोधात मुलीच्या जबानीवरून भादंवि.कलम ३७६ सह लैंगिक अपराधापासून बाल संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४,८,९ (ह ) १० प्रमाणे गुन्हा दाखल केला.

या गुन्ह्याच्या आधारे एपीआय दुर्गेश दुबे यांनी नराधम अत्याचारी महंमद अंसारी यांस तात्काळ ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्याला रविवारी भिवंडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास ११ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Conclusion:bhiwandi rep
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.