ठाणे - कोरोनाची सुरुवात झाल्यावर भीतीमुळे परराज्यात आपल्या घरी गेलेले नागरिक पुन्हा मोठ्या संख्येने ठाण्यात परतत आहेत. यामधील काही नागरिकांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. खबरदारी म्हणून परराज्यातून ठाणे रेल्वे स्थानकात येणाऱ्या नागरिकांची ठाणे महापालिकेच्या वतीने सॅटिस पुलावर अँटिजेन टेस्ट सुरू करण्यात आली आहे.
अँटिजेन टेस्टमध्ये मागील २ दिवसांत १०० हून अधिक रुग्ण आढळले आहेत. तर परराज्यातून आलेल्या १ हजारहून अधिक प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. आज देखील मोठ्या संख्येने परप्रांतीय मजूर आणि नागरिक ठाणे शहरात दाखल झाले होते. ठाणे महानगरपालिकेकडून त्यांची अँटिजेन चाचणी केली जात आहे. ही कोविड चाचणी महत्वाची असून ती केलीच पाहिजे, असे महापालिका सहाय्यक आयुक्त जाधव यांनी सांगितले.
शेवटी उदरनिर्वाहाचा प्रश्न
फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल महिन्यात लाखो परप्रांतीय मिळेल त्या वाहनाने आपल्या घरी परतले होते. काही दिवस राहून उत्पन्नाचे साधन नसल्याने त्यांची स्थिती बिकट झाली होती. त्यामुळे त्यांना पुन्हा मुंबई, ठाणे या ठिकाणी परत यावे लागले. आता मिळेल ते काम करून आपले घर चालवण्याचा प्रयत्न परप्रांतीय करत आहेत.
हेही वाचा- खारघर मोबाईल शॉप चोरी प्रकरण; ४५ लाखांच्या मुद्देमालासह चोरटे गजाआड