ETV Bharat / state

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव द्या, प्रकल्पग्रस्तांसह भाजपचे आंदोलन

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव द्या, या मागणीसाठी भाजप, स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी मानवी साखळ करत आंदोलन केले.

आंदोलक
आंदोलक
author img

By

Published : Jun 10, 2021, 4:26 PM IST

Updated : Jun 10, 2021, 5:40 PM IST

नवी मुंबई - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे, या मागणीसाठी आज (दि. 10 जून) भाजप व स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या माध्यमातून मानवी साखळी आंदोलन करत एल्गार करण्यात आला.

बोलताना आमदार पाटील

बाळासाहेब ठाकरेंच्या नावाला प्रकल्पग्रस्तांचा विरोध

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे, अशी मागणी शिवसेना व महाविकास आघाडीच्या माध्यमातून करण्यात आली. मात्र, त्याला सिडकोनेही अनुमती दिली आहे. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यास स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी विरोध केला आहे. आमचे नेते दि.बा. पाटील आहेत. ज्यांनी प्रकल्पग्रस्तांसाठी प्राण पणास लावले आहेत. त्यामुळे त्यांचेच नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा आग्रह स्थानिक भूमीपत्रांचा आहे.

भाजप, पनवेल, उरण व नवी मुंबई या परिसरातील स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी नेते दि.बा. पाटील यांचेच नाव द्यावे, अशी मागणी उचलून धरली आहे. जोपर्यंत दि.बा.पाटील यांचे नाव विमानतळाला देत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, अशी भूमिका घेत प्रकल्पग्रस्तांनी साखळी आंदोलन केले आहे.

भाजपची भूमिका बेगडी शिवसेनेचे आरोप

दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे. त्यासाठी भाजपचे नेते रस्त्यावर उतरले आहेत. मात्र, भाजपची ही भूमिका बेगडी असल्याचा आरोप शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी करीत आहेत.

हेही वाचा - 6 महिन्यांच्या चिमुकल्याचे अपहरण करणाऱ्या 5 जणांना बेड्या

Last Updated : Jun 10, 2021, 5:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.