ETV Bharat / state

नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव द्या, ठाण्यापर्यंत साखळी आंदोलन

नवी मुंबईत होणाऱ्या विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे, या मागणीसाठी भाजपही रस्त्यावर उतरली आहे. कृती समिती आणि आगरी कोळी भूमिपुत्र यांनी ठाण्यातील कळवा छत्रपती शिवाजी महाराज चौकात मानवी साखळी आंदोलन केले.

आंदोलक
आंदोलक
author img

By

Published : Jun 10, 2021, 3:41 PM IST

Updated : Jun 10, 2021, 4:48 PM IST

(नवी मुंबई) ठाणे - या ठिकाणी विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी आता भाजप देखील रस्त्यावर उतरून मानवी साखळी तयार करण्यात आलेली आहे. दि.बा. पाटील यांच्या नावाची वर्णी लागावी यासाठी राज्य सरकारने भूमीपुत्राच्या मागे उभे राहणे गरजेचे आहे, असे भाजप आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांनी सांगितले आहे. त्यामुळे ठाण्यात विविध ठिकाणी आशा प्रकाच्या मानवी साखळी करून आंदोलक रस्त्यावर उतरले होते.

बोलताना आंदोलक

नवी मुंबई ते ठाणे साखळी

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे यासाठी कृती समिती आणि आगरी कोळी भूमिपुत्र यांनी ठाण्यातील कळवा छत्रपती शिवाजी महाराज चौकात मानवी साखळी आंदोलन केले. नामकरणावरून सेनेने राजकारण न करता लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव पुढे करावे तसेच बाळासाहेब ठाकरे यांचे नाव मोठे आहे ते कुठेही देऊ शकता. मात्र, या ठिकाणी पाटील यांनी केलेल्या कामाबाबत आम्हाला अभिमान आहे. तसेच आज शांतपणे राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन केले भविष्यात मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. या आंदोलनात नवी मुंबई ते ठाण्यापर्यंत सर्वच ठिकाणी दि.बा. पाटील यांचे पोस्टर हातात घेऊन आंदोलक उभे राहिले होते.

हेही वाचा - भिवंडीत अतिधोकादायक इमारतीच्या बाल्कनीचा भाग कोसळला, सुदैवाने जीवितहानी नाही

Last Updated : Jun 10, 2021, 4:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.