नवी मुंबई - नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून नवी मुंबईत संतापाची लाट उसळली आहे. शनिवारी नवी मुंबईतील काही निवडक संघटना व नागरिकांनी एकत्र येत मोर्चा काढला. सामाजिक संस्थांनी व कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन आणि घोषणाबाजी करत विधेयकाविरुद्ध रोष व्यक्त केला.
नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाविरोधात केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी शहरात मोर्चा काढण्यात आला. नेरुळ स्थानक परिसरातून या मोर्चाला सुरुवात झाली आणि केंद्र सरकारविरोधात घोषणा देत हा मोर्चा नवी मुंबई परिसरात निघाला.
हेही वाचा - उल्हासनदीवरील बंधाऱ्याची दुर्दशा; गावकऱ्यांचा जीवघेणा प्रवास
नागरिकत्व विधेयक पारित करण्यात आल्याने देशात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या कायद्याच्या मागे सरकारचा गुप्त अजेंडा आहे. यामुळे सदर कायदा मागे घेण्याची मागणी करण्यात आली. नागरिकत्व विरोधक कायदा हा मुस्लिम विरोधात नसला तरी देशहिताच्या विरोधात नक्कीच आहे, अशाही घोषणा यावेळी देण्यात आल्या.
हेही वाचा - ठाणे वाहतूक पोलिसांच्या कारवाईत 11 महिन्यात दोन कोटींचा दंड वसूल