ETV Bharat / state

परमबीर सिंग यांना अटक होण्याची शक्यता, कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांच्यासह ३३ जणांवर विविध कलमानुसार अकोला शहरातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दोन दिवसापूर्वी पोलीस निरिक्षक भीमराव घाडगे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा आज कल्याण पश्चिम शहरातील बाजारपेठ पोलीस ठाण्यात तपासाकरता वर्ग करण्यात आला आहे.

परमबीर सिंग
परमबीर सिंग
author img

By

Published : Apr 30, 2021, 10:10 PM IST

ठाणे - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांच्यासह ३३ जणांवर विविध कलमानुसार अकोला शहरातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दोन दिवसापूर्वी पोलीस निरिक्षक भीमराव घाडगे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा आज कल्याण पश्चिम शहरातील बाजारपेठ पोलीस ठाण्यात तपासाकरता वर्ग करण्यात आला असून, कल्याणचे साहय्यक पोलीस निरीक्षक अनिल पोवार यांनी तपास सुरु केला आहे. यामुळे परमबीर सिंग यांच्यासह इतर अधिकाऱ्यांना कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

अ‍ॅट्रॉसिटीसह विविध 22 कलमान्वये गुन्हा दाखल

पोलीस निरीक्षक घाडगे यांच्या तक्रार अर्जावरून परमबीर यांच्यासह ३३ जणांविरोधात अकोल्यातील कोतवाली पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री अ‍ॅट्रॉसिटीसह विविध २२ कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हा दाखल करून आज कल्याणातील बाजारपेठ पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. परमबीर सिंग हे ठाणे शहर पोलीस आयुक्तपदी असताना त्यांनी हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी पोलीस महासंचालक तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालकांकडे केली आहे.

पोलीस अधिकाऱ्यांसह महापालिका अधिकाऱ्यांचाही आरोपींमध्ये समावेश

परमबीर सिंग यांच्यासह २७ पोलीस अधिकाऱ्यांनी भीमराव घाडगे यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार त्यांनी (ऑनलाइन तक्रार) कोतवाली पोलीस ठाण्यात दिली आहे. यामध्ये पराग मणेरे, संजय शिंदे, सुनील भारद्वाज, विजय फुलकर या चार पोलीस अधिकाऱ्यांसह कल्याण डोंबिवली महापालिकेचे दोन तत्कालीन आयुक्तांसह चार ते पाच अधिकारी असा एकूण ३३ जणांचा समावेश आहे.

हेही वाचा - जनजीवन सुरळीत होण्यासाठी आणखी वर्षभराचा कालावधी - डॉ. तात्याराव लहाने

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.