ETV Bharat / state

कल्याण ऑनर किलिंग : बापानेच केले मुलीचे ३ तुकडे, धड शोधण्यात पोलिसांना यश, शीर अद्यापही बेपत्ता - ठाणे हत्या न्यूज

रविवारी 8 डिसेंबरच्या सकाळी ठाण्याच्या कल्याण स्थानकाबाहेर आढळलेल्या बॅगमधील मुलीच्या मृतदेहाचा उलगडा झाला आहे. आंतरजातीय मुलासोबत असलेले प्रेमसंबंध मान्य नसल्यानेच बापानेच मुलीचे ३ तुकडे करून तिची निर्घृण हत्या केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी आरोपी बापाला अटक करण्यात आली असून पोलिसांना धड शोधण्यात यश आले आहे. मात्र, शीर अद्यापही बेपत्ताच आहे.

owner-killing-in-thane-father-killed-his-daughter
'ऑनर किलिंगने' हादरले ठाणे, बापानेच केले मुलीचे ३ तुकडे,  पोलिसांनी शोधले धड शीर अद्यापही बेपत्ताच
author img

By

Published : Dec 14, 2019, 8:37 PM IST

Updated : Dec 14, 2019, 11:14 PM IST

ठाणे - रविवारी 8 डिसेंबरच्या सकाळी कल्याण स्थानकाबाहेर आढळलेल्या बॅगमधील मुलीच्या मृतदेहाचा उलगडा झाला आहे. आंतरजातीय मुलासोबत असलेले प्रेमसंबंध मान्य नसल्यानेच बापानेच मुलीचे ३ तुकडे करून तिची निर्घृण हत्या केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी आरोपी बापाला अटक करण्यात आली असून पोलिसांना धड शोधण्यात यश आले आहे. मात्र, शीर अद्यापही बेपत्ताच आहे. अरविंद तिवारी (वय ४५), असे या आरोपी बापाचे नाव आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी अवघ्या 30 तासातच रिक्षाचालक आणि काही शाळकरी मुलांच्या सहकार्याने त्याला अटक केली. खालिद मोनीन आणि मोहंमद सलीम खान, अशी रिक्षाचालकांची नावे आहेत. पोलिसांनी या दोघांचा सत्कार केला.

पोलिसांनी शोधले, धड शीर अद्यापही बेपत्ताच

रविवारी सकाळच्या सुमारास कल्याण स्थानकाबाहेर एका बॅगमध्ये एक 20 ते 25 वयोगटातील मुलीचा कमरेपासून खालचा भाग आढळून आला होता. शीर व धड नसलेला अर्धवट अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपी टिटवाळ्यातून ट्रेनमध्ये चढल्याचे निष्पन्न झाले होते. दरम्यान, पोलिसांनी टिटवाळ्यातील रिक्षाचालकांकडे चौकशी केली असता तो टिटवाळ्यातील नांदप रोडवरील इंदिरा नगर भागात रिक्षामध्ये बसल्याचे स्पष्ट झाले होते. अखेर पोलिसांनी तपास करत आरोपीला अटक केली असून त्याने मुलीचे आंतरजातीय मुलाबरोबर असलेले प्रेमसंबंध मान्य नसल्याने तिची हत्या केल्याची त्याने कबुली दिली. तसेच तिच्या मृतदेहाचे ३ तुकडे करून शीर व धड प्लास्टिकच्या गोणीत भरून कल्याण-भिवंडी रोडवरील दुर्गाडी ब्रीजवरून खाडीत फेकून दिले असल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने २ दिवस शोध घेण्याचा प्रयत्न केला असता धड मिळाले. मात्र, शीर मिळू शकले नसल्याची माहिती महात्मा फुले चौक पोलिसांनी दिली.

अंगावर शहारे आणणारा खुनाचा थरारक घटनाक्रम -

आरोपी अरविंदला ४ मुली असून मृत मुलगी ही टिटवाळ्याच्या साईनाथनगर चाळीत सोबत राहत होती, तर पत्नी आणि ३ मुली मूळगावी राहत आहे. मृत मुलगीही चार महिन्यांपूर्वीच भांडुपच्या एका कॉल सेंटरला काम करीत होती. याच ठिकाणी सोबत काम करणाऱ्या एका तरुणासोबत तिचे प्रेमसंबंध निर्माण झाले. याची कुणकुण आरोपी बापाला मिळताच त्याने मुलीला विरोध केला. त्यामुळे दोघांमध्ये वादही झाले होते. या वादातून मुलीने त्या तरुणाशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्याने बापाने तिचा हत्येचा कट रचला.

५ डिसेंबरलाही बाप-लेकीत वाद झाला होता -

गेल्या ५ डिसेंबरच्या रात्री बाप-लेकीत वाद झाल्याने बापाने तिची हत्या केली. ६ डिसेंबरला बाहेर जाऊन हत्यार आणि प्लास्टिकच्या गोणी आणल्या. त्यांनतर घरातच तिचे ३ तुकडे करून ३ प्लास्टिकच्या गोण्यामध्ये भरले. मुलगी गावी गेली असल्याने मी तुमच्या घरात झोपणार असल्याचे त्याने शेजाऱ्यांना सांगितले. दरम्यान, ७ डिसेंबरला सकाळच्या सुमाराला धड आणि शीर असलेल्या प्लास्टिकच्या गोण्यासोबत घेऊन टिटवाळ्यावरून लोकलने कल्याण आला. त्यांनतर कल्याण रेल्वे स्थानकाबाहेर एका रिक्षाने जाऊन दुर्गाडी पुलावरून दोन्ही गोण्या खाडीत फेकल्या होत्या.

गेल्या ८ डिसेंबरला पुन्हा एका बॅगमध्ये कमरेपासून खालचा भाग घेऊन टिटवाळ्याहून कल्याणला आला. पुन्हा ही बॅगही खाडीत फेकण्यासाठी कल्याण स्थानकाबाहेर रिक्षा पकडण्यासाठी आला. मात्र, त्यावेळी रिक्षाचालकाला त्या बॅगमधून दुर्गंधी आल्याने त्याने हटकले असता तो बॅग सोडून पळून गेला. त्यानंतर रिक्षाचालकाने पोलिसांना याबद्दल माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन बॅगमधील कमरेपासून खालचा भागाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला आणि रिक्षाचालकांच्या माहितीनुसार रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपी टिटवाळ्यातून ट्रेनमध्ये चढल्याचे निष्पन्न झाले होते.

Intro:kit 319Body:ऑनर किलिंग ; बापानेच केले मुलीचे ३ तुकडे, धड शोधण्यात पोलिसांना यश; मात्र शीर अद्यापही बेपत्ताच

ठाणे :- २२ वर्षीय मुलीचे प्रेमसंबंध एका आंतरजातीय मुलासोबत आहेत. मात्र, मुलीच्या बापाचा आंतरजातीय मुलासोबत प्रेमसंबंधाला प्रखर विरोध होता. त्यांनी मुलीला समजवण्याचा प्रयत्न करत, तो मुलगा आपल्या कुटुंबासाठी योग्य नाही. त्यामुळे तू त्याच्याशी प्रेमसंबंध तोडून टाक, असे सांगितले. मात्र, त्या मुलीने त्या मुलासोबत लग्न करणार असल्याचे बापाला सांगितले. याच रागातून बापाने मुलीचे तीन तुकडे करून तिची घरातच निर्घृण हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

पोलिसांनी आरोपी बापाला बेड्या ठोकल्या असून अरविंद तिवारी (४५) असे त्याचे नाव आहे. तर प्रीन्सी असे निर्घृण हत्या झालेल्या मुलीचे नाव आहे. विशेष म्हणजे आरोपी बापाला पोलिसांनी अवघ्या 30 तासातच रिक्षा चालक आणि काही शाळकरी मुलांच्या सहकार्याने अटक केली. खालिद मोनिन आणि मोहंमद सलीम खान अशी रिक्षाचालकांची नांवे आहेत. पोलिसांनी या दोघांचा सत्कार केला.

मागच्या रविवारी सकाळच्या सुमारास कल्याण स्टेशन बाहेर एका बॅगमध्ये एक 20 ते 25 वयोगटातील स्त्री जातीचा अर्धा म्हणजेच कमरेपासून खालचा भाग आढळून आला होता. गौर वर्णीय त्या महिलेच्या पायामध्ये पिवळी लेगिंग घातलेली होती. शीर व धड नसलेला अर्धवट अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. सदर आरोपी रेल्वे स्टेशनमधून बाहेर आला व पुन्हा स्टेशनमध्ये गेला होता. त्यामुळे पोलिसांनी रेल्वे स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपी टिटवाळ्यातून ट्रेनमध्ये चढल्याचे निष्पन्न झाले होते. पोलिसांनी टिटवाळा गाठत रिक्षाचालकांकडे चौकशी केली असता आरोपी टिटवाळ्यातील नांदप रोडवरील इंदिरा नगर भागात रिक्षामध्ये बसल्याचे स्पष्ट झाले. अखेर पोलिसांनी आरोपी अरविंद रमेशचंद्र तिवारी याला अटक केली. त्यावेळी त्याने मुलगी प्रिन्सि हिचे एका आंतरजातीय मुलाबरोबर प्रेम संबंध मान्य नसल्याने तिची हत्या केल्याची कबुली दिली .तिच्या मृतदेहाचे तीन तुकडे करून शीर व धड प्लास्टिकच्या गोणीत भरून कल्याण - भिवंडी रोडवरील दुर्गाडी ब्रिज वरून खाडीत फेकून दिले असल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने दोन दिवस शोध घेण्याचा प्रयत्न केला असता धड मिळाले मात्र शीर मिळू शकले नसल्याची माहिती महात्मा फुले चौक पोलिसांनी दिली.

अंगावर शहारे आणणारा खुनाचा थरारक घटनाक्रम !
आरोपी अरविंदला चार मुली असून मृत मुलगी हि टिटवाळ्याच्या साईनाथ नगर चाळीत सोबत राहत होती. तर पत्नी आणि तीन मुली मूळगावी राहत आहे. मृत प्रीन्सीही सुमारे चार महिन्यापूर्वीच भांडुपच्या एका कॉल सेंटरला काम करीत होती. याच ठिकाणी सोबत काम करणाऱ्या त्या तरुणावर तिचे प्रेमसंबंध निर्माण झाले. याची कुणकुण आरोपी बापाला मिळताच त्याने मुलीला विरोध केला. त्यामुळे दोघांमध्ये वादही झाले होते. या वादातून मुलीने त्या तरुणाशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्याने बापाने तिचा हत्येचा काट रचला.
५ डिसेंबर रोजीही बाप - लेकीत वाद झाला होता. त्या रात्रीच बापाने तिची हत्या केली. ६ डिसेंबरला बाहेर जाऊन हत्यार आणि प्लास्टिकच्या गोणी आणल्या त्यांनतर घरातच तिचे तीन तुकडे करून तीन प्लास्टिकच्या गोण्यामध्ये भरले. त्यादिवशी शेजाऱ्यांना सांगितले कि, मुलगी गावी गेली असल्याने मी तुमच्या घरात झोपणार आहे. ७ डिसेंबरला सकाळच्या सुमाराला धड आणि शीर असलेल्या प्लास्टिकच्या गोण्यासोबत घेऊन टिटवाळ्यावरून लोकलने कल्याण आला. त्यांनतर कल्याण रेल्वे स्थानकाबाहेर उतरून एका रिक्षात कल्याण हुन कोनगाव दिशेने निघाला. मध्येच दुर्गाडी पुलावर रिक्षा उभी करून त्याने दोन्ही गोण्या खाडीत फेकल्या होत्या.
८ डिसेंबरला पुन्हा एका बॅगमध्ये कमरेपासून खालचा भाग घेऊन टिटवाळ्याहुन कल्याणला आला. पुन्हा हि बॅगही खाडीत फेकण्यासाठी कल्याण स्थानकाबाहेर रिक्षा पकडण्यासाठी आला . त्यावेळी रिक्षाचालकाला त्या बॅगमधून दुर्गंधी आल्याने त्याने हटकले असता तो बॅग सोडून पळून गेला. त्यानंतर रिक्षाचालकाने पोलिसांनी माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन बॅगमधील कमरेपासून खालचा भागाचा मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला. आणि रिक्षाचालकांच्या माहितीनुसार पोलिसांनी रेल्वे स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपी टिटवाळ्यातून ट्रेनमध्ये चढल्याचे निष्पन्न झाले होते.

बाईट ; अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे
Conclusion:kalyan
Last Updated : Dec 14, 2019, 11:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.