ETV Bharat / state

कल्याण डोंबिवलीत नवे ५४ कोरोना पॉझिटिव्ह.. बाधितांचा आकडा एक हजार पार - corona virus highlight thane

आज कल्याण डोंबिवलीत ५४ रुग्णांची भर पडली आहे. आढळून आलेल्या रुग्णांची नोंद पाहता कोरोना महापालिका हद्दीतील बाधितांच्या संख्येने 1 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. तर, आतापर्यत २९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे ३५५ रुग्णांना आतापर्यत सुट्टी देण्यात आली आहे. तर, सध्याच्या स्थितीत ६५० रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

कल्याण डोंबिवलीत  कोरोनाचे नव्याने ५४ रुग्ण

author img

By

Published : May 31, 2020, 8:46 PM IST

ठाणे - कल्याण डोंबिवलीत आज(रविवार) कोरोनाचे नव्याने ५४ रुग्ण आढळून आल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. तर, आजच्या रुग्णांमध्ये कल्याण पूर्वेकडील कोरोनाबाधितांची संख्या अधिक असून त्यापैकी एका ७० वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आज(रविवार) नव्याने आढळून आलेल्या रुग्णांची नोंद पाहता कोरोना महापालिका हद्दीतील बाधितांच्या संख्येने 1 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. तर, आतापर्यत २९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे ३५५ रुग्णांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, सध्याच्या स्थितीत ६५० रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये ९ अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.

आजही रुग्णामध्ये सर्वाधिक बाधित रुग्ण कल्याण पूर्वेत चाळीत राहणारे असून आज ५४ रुग्णांपैकी २८ कोरोनाबाधित रुग्ण या भागात राहणारे आहेत. डोंबीवली परिसरात १४ रुग्ण आढळून आले आहेत. तर, कल्याण पश्चिम परिसरातहीं ६ रुग्ण आढळून आले आहेत. इतर परिसराच्या मानाने सर्वात कमी रुग्णांची संख्या कल्याण पश्चिममध्ये आहे. मात्र, डोंबिवली पूर्व परिसरातही बाधित रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षणीय आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.