ठाणे - संस्कार संस्था, कोकण विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आणि कृषी पणन मंडळ महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्याने न्यू इंग्लीश स्कूल मैदान राम मारूती रोड येथे आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव १ मे ते १० मे पर्यत सुरू राहणार आहे.
१ मे ला सिने-नाट्य अभिनेते संतोष जुवेकर यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले . यावेळी पटकथा लेखक अरविंद जगताप, विजू माने, हे ही उपस्थित होते. महोत्सवाला ५० स्टॉल्स आहेत. महिला विकास परिषदेच्या महिला बचत गटासाठी १० स्टॉल्स राखीव आहेत. या महोत्सवात रत्नागिरी, देवगड या सह विविध ठिकाणच्या हापूस आंब्यासह पायरी आंबे सुध्दा असणार आहे. कोकणातील विविध उत्पादने, मसाले, पापड, आदिचे स्टॉल्स ही येथे आहेत. ठाणेकरांनी या महोत्सवाला आवर्जून भेट दयावी, असे आवाहन आयोजक आमदार संजय केळकर यांनी केली आहे .
दरवर्षी ठाण्यात या आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील आंब्याच्या विविध जातीचे आंबे या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध असतात. या ठिकाणी करोडोंच्या आंब्यांची विक्री होते. अनेक नागरिक या महोत्सवाची वाट बघत असतात.